Nitesh Rane vs Sanjay Raut On Disha Salian Case  saam tv
महाराष्ट्र

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Nitesh Rane vs Sanjay Raut On Disha Salian Case: ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणात क्लीन चिट मिळालीय. मात्र महत्त्वाचं पुरावे सादर केल्यावर ठाकरेंच्या अडचणी वाढतील, असा दावा सालियान कुटुंबाच्या वकीलाने केलाय. SIT नं प्रतिज्ञा पत्रात नेमकं काय म्हटलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लीन चिट मिळालीय. दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केली. SIT च्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलयं? पाहूयात.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण

SITच्या प्रतिज्ञापत्रात काय?

दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये घातपात नाही

दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार लैंगिक, शारीरिक अत्याचाराच्या खुणा नाही

सीसीटीव्ही तपासल्यानंतर काहीही तथ्य आढळलं नाही

उपस्थितांचे कॉल रेकॉर्ड तपासले, काहीही संशयास्पद आढळलं नाही

दरम्यान दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी तपास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत त्यांनी चुकीचा रिपोर्ट सादर केल्याचा दावा केलाय. तसचं आदित्य ठाकरेंविरोधात काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात, असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानच्या वडीलांनी आणि विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत.

दुसरीकडे आदित्य ठाकरेंना क्लिनचिट मिळाल्यानं संजय राऊतांनी नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केलीय. तर नितेश राणेंनी पिक्चर अभी बाकी है..अशी सूचक प्रतिक्रीया दिलीये.

आता 16 जुलैच्या सुनावणीत नेमकं काय होतं? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं. तसचं आदित्य ठाकरेंना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी दिशा सालियन प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Director Physical Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिलासा; कोर्टाकडून 'या' अटींसह अंतरिम जामीन

Beed : बीडमध्ये पुन्हा हाणामारी! गुंडांचा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, हॉटेलचीही केली तोडफोड

SCROLL FOR NEXT