Aditya Thackeray speaks with MP Omraje Nimbalkar following the court verdict in the Pawanraje Nimbalkar murder case. saam tv
महाराष्ट्र

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

Aditya Thackeray Call Omraje Nimbalkar Pawanraje Case Verdict: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात 20 वर्षांनंतर लागलेल्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आदित्य ठाकरे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवर काय चर्चा झाली? जाणून घ्या सविस्तर.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज अखेर निकाल लागला. कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या धक्कादायक निकालानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या एक अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या फोनवर आदित्य ठाकरे आणि निंबाळकर यांची चर्चा झाली आणि आज लागलेल्या निकालाबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

२० वर्षांनंतर लागला निकाल

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज तब्बल दोन दशकांनंतर (२० वर्षांनी) कोर्टाने आपला अंतिम निर्णय सुनावला. मात्र, आवश्यक पुराव्यांचा अभाव असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे निंबाळकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, आगामी काळात ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले असून यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचे देखील नाव आहे. शिवसेनेच्या वर्धपान दिनाच्या मेळाव्यातून ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. या सगळ्याला काही तास होताच आदित्य ठाकरे आणि निंबाळकर यांच्यातील झालेला संवाद हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT