Aditya Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Chiplun : या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारलाच विचारा : आदित्य ठाकरे

गेले दाेन दिवस आदित्य ठाकरे हे काेकण दाै-यावर आले आहेत.

अमोल कलये

चिपळूण : रिफायनरीच्या (refinery project) जमिनीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलेले आहे का? या प्रश्नावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी हाे असं उत्तर दिलं. आपल्याला चांगले प्रकल्प महाराष्ट्रात (maharashtra) हवे आहेत. हे प्रकल्प जेव्हा आपण आणत असतो तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण सर्व काही करू. दुसरं लोकेशन आणत असताना स्थानिक भूमीपुत्रांचे न्याय, हक्क कसे अबाधित राहितील. त्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाऊ असेही मंत्री ठाकरे यांनी येथे नमूद केले. (aditya thackeray latest marathi news)

चिपळूणमधील सावर्डेतील सह्याद्री स्कुल ऑफ आर्टला मंत्री ठाकरे यांनी भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच (कै.) गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी मंत्री ठाकरेंनी आदरांजली वाहिली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना आज पुन्हा एकदा मंत्री आदित्य ठाकरेंनी रिफायनरीबाबत भुमिका विषद केली.

मंत्री ठाकरे म्हणाले काेकणात माेठा प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे. रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करताना भूमिपुत्रांचा प्राधान्याने विचार केला जाईल. रिफायनरीतून भूमिपुत्रांना राेजगार मिळण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र माेदी (narednra modi) यांना पाठविलेल्या पत्रास उत्तर येण्यास दिरंगाई हाेत आहे असा प्रश्न मंत्री आदित्य ठाकरेंना माध्यमांनी विचारला असता त्यांनी त्याचे उत्तर केंद्र सरकारलाच विचारा असे म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT