A political storm brews over Adani’s Mumbai airport projects as parties clash ahead of the BMC elections. Saam Tv
महाराष्ट्र

अदानींचं विमानतळ, भरकटलेलं राजकारण अदानींचं साम्राज्य वाढण्यामागचं कारण काय?

Mumbai Airport Row: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अदानींच्या विमानतळावरुन राजकारणाचं विमान भरकटलंय... राज ठाकरेंनी छेडलेल्या या विषयाला फडणवीसांसह भाजपनंही उत्तर दिलंय.. त्यावरुन कसा कलगितुरा रंगलाय..

Bharat Mohalkar

राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत मुंबईतील अदानींच्या धडकी भरवणाऱ्या साम्राज्याचा नकाशा महाराष्ट्रासमोर मांडला.. एवढंच नाही तर मुंबई विमानतळही अदानींना विकण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला... त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या घरांचा मुद्दा उपस्थित करत प्रत्युत्तर दिलंय...

फडणवीसांच्या टीकेनंतर राज ठाकरेंनी तातडीनं माध्यमांसमोर येत अदानींच्या विमानतळाच्या मुद्द्यावरुन पलटवार केलाय.. अदानींवर गेल्या दहा वर्षातच एवढी मेहेरबानी का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.. तर अमित साटम यांनी राज ठाकरेंवर पैसे घेऊन गायब होण्याचा आरोप केलाय..

खरंतर देशातील 8 विमानतळांपैकी फक्त नवी मुंबई विमानतळ अदानींनी बांधलंय.. एवढंच नाही तर वैमानिकांच्या प्रशिक्षणासोबतच दुरुस्तीमध्येही अदानींनी उतरण्याची तयारी सुरु केलीय. मुंबई महापालिका निवडणुकीत अदानीचं वाढत साम्राज्य टीकेचा केंद्रबिंदू राहिलाय. मात्र अदानी आणि त्याचं विमानतळ हा निवडणुकीतला प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असला तरी मुंबईकर मतांच्या रुपाने ठाकरेंचं विमान उडवणार की महायुतीचं... हे १६ तारखेला कळेलचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT