Maharashtra Electric Vehicle Policy 2021
Maharashtra Electric Vehicle Policy 2021 Saam Tv
महाराष्ट्र

Electric Vehicle : ईलेक्ट्रिक वाहनात अनधिकृत बदल केल्यास होणार कारवाई

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा: महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ (Maharashtra Electric Vehicle Policy 2021) लागू केले आहे. ई-बाईक्स (Electric Bike) आणि ई-वाहने (Electric Vehicle) यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100 टक्के सूट दिलेली आहे. मात्र ईलेक्ट्रिक बाईक्सना आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे ईलेक्ट्रिक वाहनात अनधिकृत बदलास मनाई करण्यात आली आहे. (Action will be taken in case of unauthorized alteration of electric vehicle)

हे देखील पाहा -

प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी. अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक आणि उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा टाईप अप्रूवल टेस्ट रिपोर्ट (Type Approval Test Report) तसेच परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी. वाहन उत्पादक, वितरक आणि नागरीकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नयेत. जर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादित करणारे उत्पादक आणि विक्री करणारे वितरक यांच्याविरुध्द विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.

ज्या ई- बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅट पेक्षा जास्त असल्यास, अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिकची केल्यास अश्या वाहनधारकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन प्रादेशिक अधिकारी यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT