सोलापूर: भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी (Police) दाखल केलेल्या आरोप पत्रात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेच ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावर आता केंद्रीय मंत्री मंडळातील राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भिडे यांच्या फेर चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. (Bhima-Koregaon case)
भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली होती. त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही. संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल, कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील. संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे. गृह मंत्र्यांना भेटून संभाजी भिडेंची फेर चौकशीची मागणी करणार करणार आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
हे देखील पाहा
भीमा कोरेगाव हा विषय राज्याचा आहे म्हणून आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले.
संभाजी भिडेंचं नाव चार्जशीटमधून वगळलं
भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी (Police) दाखल केलेल्या आरोप पत्रात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) यांचे नावच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेच ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Bhima-Koregaon case)
भीमा कोरेगाव प्रकरण नेमकं काय?
पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला होता.
कोरेगाव-पुणे हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करुन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाचा सध्या तपास एनआयए करत आहे. एनआयएने २४ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना अटक केली.
दरम्यान भीमा- कोरेगावमध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर केला होता.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.