Latur News Saam Tv
महाराष्ट्र

Latur: जुलै उजाडताच अधिग्रहणे झाली बंद, अल्प पावसामुळे अधिग्रहणाची वाढती मागणी

ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - जुलै महिना उजाडताच लातूर (Latur) जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाईच्या कृती आराखड्याची मुदत संपली आहे. सध्या ना पाऊस, ना पाणी अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात १४ गावे, ५ वाडयावर २० अधिग्रहणाद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

जिल्ह्यात जवळपास १४७ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या अल्प पावसामुळे पेरण्याही ४० टक्याच्यापर्यंत झाल्या आहेत. उर्वरीत ६० पेरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. जर जमिनीत पावसाचे पाणीच मुरणार नसल विहिर, बोअरला कोठून येणार अशी परिस्थिती आहे. यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्यात जाणवत होत्या. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्याकडून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे येण्याचे प्रमाणही वाढू लागले होते.

हे देखील पाहा -

जिल्ह्यातील ३२ गावांसाठी व १२ वाडया, तांडयावरील नागरिकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर ४९ अधिग्रहाणाचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील १० गावांना व ५ वाडयांना १५ अधिग्रहणाद्वारे, ५ निलंगा तालुक्यातील १ गावास २ अधिग्रहणाद्वारे, तर उदगीर तालुक्यातील ३ गावांना ३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

त्यानुसार ग्रामीण भागातील नागरीकांना २० अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. लातूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जून पर्यंतचा पाणी टंचाईचा कृती आराखडा मंजूर करून घेतला होता. या आराखडयाची जून अखेर मुदत संपली आहे. त्यामुळे जुलै महिना उजाडताच जिल्ह्यात सुरू असलेले अधिग्रहणे बंद झाली आहेत. जिल्ह्यात सध्या ना पाऊस, ना पाणी अशी परिस्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पूल अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची अजून एक नवीन उपाय योजना

School Holiday: महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

उद्धव ठाकरे-काँग्रेसमधला दुरावा मिटणार? मनसेसोबतच्या युतीवर मोठा निर्णय? VIDEO

Todays Horoscope: या राशींना आज कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, वाचा राशीभविष्य

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

SCROLL FOR NEXT