आचार्य तुषार भोसलेंची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली Saam TV
महाराष्ट्र

आचार्य तुषार भोसलेंची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांची टीका करताना पुन्हा जीभ घसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांची टीका करताना पुन्हा जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अतीशय खालच्या भाषेत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की "व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षाचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल? वो तो बस अपने 'मालिक' का धर्म निभा रहा है! असे ट्विट तुषार भोसले यांनी केलं आहे.

दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. वानखेडे काल सकाळी दिल्लीला दाखल झाले आहेत.

आर्यन खान प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. पंत म्हणून नेमण्यात आलेल्या प्रभाकर साईल खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचबरोबर या कारवाईतील मुख्य पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे किरण गोसावी फरार आहे. आज सकाळीही नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सर्वांसमोर मांडला होता. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एनसीबीने नवी मुंबईमध्ये केलेल्या कारवाईबाबतही पंचांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT