वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक संजय डाफ
महाराष्ट्र

वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक

आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी नागपूर वनविभागाने ही कामगिरी यशस्वी केली

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - गेल्या आठवड्यापासून वनखात्याला चकमा देणाऱ्या वाघाच्या Tiger अवयवांची तस्करी Smuggling करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी Police जेरबंद केले आहे. मध्यप्रदेशातील Madhya Pradesh बिछवासहानी गावातून या आरोपीला अटक अटक करण्यात आली. काल म्हणजेच ३० जुलै २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी नागपूर वनविभागाने ही कामगिरी यशस्वी केली.

आरोपीच्या घरातून वाघाची संपूर्ण कातडी, चारही पायांचे पंजे आणि एक फोन जप्त करण्यात आला आहे.नागपूर वनविभागाला वाघाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच वनखात्याची चमू आरोपीचा मागोवा घेत होते.

हे देखील पहा -

२९ जुलै २०२१ रोजी त्यांना आरोपी सावनेर येथे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचला, पण त्यानंतर आरोपी  हा मध्यप्रदेशात गेल्याची  माहिती समोर आली. त्यानुसार वनखात्याचे पथक मध्यप्रदेशात पोहोचले. त्यानंतर त्याच दिवशी मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात धाड टाकली. वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या मोतीलाल के जा सलामे या आरोपीला वनखात्याच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

आरोपीच्या घरातून मृत वाघाची संपूर्ण कातडी, चारही पायाचे पंजे आणि आरोपीचा फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपीला सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे हजर करण्यात आले असता त्याला ३ ऑगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली.

न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत वाघाचे चारही पंजे आणि कातडी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. वाघ नेमका कुठला असावा यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाकडे छायाचित्र देखील पाठवण्यात आले आहेत. त्यावरुन वाघाचे वय आणि शिकार नेमकी कशामुळे झाली याची माहिती मिळू शकणार आहे. दरम्यान, आरोपीने हा वाघ छिंदवाडा येथील असल्याचे सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT