Gunratna sadavarte/Jayashree Patil
Gunratna sadavarte/Jayashree Patil Saam TV
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप, अकोल्यात सदावर्तेंसह पत्नी जयश्रींनाही अटकपूर्व जामीन

अॅड. जयेश गावंडे

अकोला : ST कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ऍड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील (Gunaratna Sadavarte and Jayashree Patil) यांनी अकोट न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर बुधवारी अंतिम सुनावणी पार पडली होती. दरम्यान, आज या जामीनाचा निकाल आला त्यानुसार वकील सदावर्ते आणि पत्नी जयश्री यांना अटकेपासून न्यायालयाने दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

अकोल्यातील अकोट शहर पोलीस ठाण्यात ST कर्मचाऱ्यांकडून (ST Employee) निधी गोळा करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यासह अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चार आरोपीपैकी अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांना अटक करण्यात आली आहे. तर गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांच्या अटकेत आहेत.

वकील सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री पाटील, औरंगाबादचा (Aurangabad) अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० व ५०० रुपये गोळा करून ७४ हजार ४०० रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे हे पोलीस कोठडीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT