Wardha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Crime News : खुनाच्या गुन्ह्यात 4 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत; पुलगाव पोलिसांची कारवाई

तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोम्बींग ऑपरेशन राबविताना अटक करण्यात आली.

Shivani Tichkule

चेतन व्यास, वर्धा

Wardha News : तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोम्बींग ऑपरेशन राबविताना अटक करण्यात आली. ही कारवाई पुलगाव पोलिसांनी केली. राया मुन वय 36 वर्ष, रा. हिंगणघाटफैल पुलगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

आरोपी राया याने ९ मे २०१९ रोजी मृतक सुरेश व्यंकट दाभणे याला जुन्या वादातून जबर मारहाण केली होती. यात सुरेशचा मृ़त्यू झाला होता. त्यामुळे आरोपी राया याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Wardha Crime News)

राया पोलिसांना चकमा देत फरार होता पोलीस त्याच्या शोधात होती. अखेर आरोपी राया हा बरांडा परिसरातून हिंगणघाट फैलकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी (Police) परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने राया मून याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

TCS Case Nida Khan : धर्मांतरण, महिलांच्या लैंगिक शोषणातील आरोपी निदा खानला कोठडी

Pune: प्रेमसंबंधातून १६ व्या वर्षी लग्न, दोन वर्षांनी तरुणीचा मृत्यू; जेवणातून विष देऊन मारल्याचा आई-वडिलांचा आरोप

Bhindi Rice Recipe: रात्रीच्या जेवणासाठी करा 'भेंडी राईस', लहानमुलेही चाटून पुसून खातील, ही आहे भन्नाट रेसिपी

PM मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT