Daryapur News Saam TV
महाराष्ट्र

Daryapur News: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मॉर्निंग वॉक करताना अपघाती मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Daryapur News: दर्यापूर तालुक्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. दिव्या टापरे (वय वर्षे २१) असे मृत तरुणीचे नाव आहे. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे असलेल्या मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक करताना तिचा अपघात झाला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार दिव्या रोज पहाटे तिच्या मैत्रिणींबरोबर मॉर्निंग वॉकला (Morning Walk) जात होती. नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास तिने मुख्य रस्त्याने मॉर्निंग वॉक करायला सुरूवात केली. याच दरम्यान भातकुली मार्गाने दर्यापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने तिला जोरात धडक दिली. या अपघातात दिव्या फार जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

तिच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दिव्याला पोलीस बनायचे होते. यासाठी तिचा सराव सुरु होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पोलीस (Police) होऊन आई बाबांसाठी तिला काही तरी करायचे होते. मात्र तिचे हे स्वप्न आता फक्त स्वप्नच राहीले आहे. मुलीच्या निधनाने टापरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT