Beed Accidental News
Beed Accidental News Saam TV
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीच भाविकांवर काळाचा घाला; ज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू

विनोद जिरे

बीड: नवरात्रोत्सवासाठी (Navratri festival) तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या तरुण भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ज्योत आणण्यासाठी जात असताना झालेल्या दुचाकीच्या अपघातात बीडच्या (Beed) पाटण सांगवी गावातील २ तरुणांचा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

अमोल खिलारे वय ३५ व महेश भास्कर भोसले वय ३० असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. मात्र अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी गावा-गावातून तरुण दरवर्षी घटस्थापनेच्या अगोदर देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला (Tuljapur) जात असतात.

पाहा व्हिडीओ -

यावर्षी देखील अनेक गावातील नवरात्रोत्सव मंडळातील तरुण ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला रवाना झाले आहेत. मात्र, अशीच देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला निघालेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील उपसरपंच अमोल सुरेश खिलारे व कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक महेश भास्कर भोसले यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

हे दोघे ज्योत आणण्यासाठी निघाले असताना या दोघांच्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान या अपघाती निधनाने पाटण सांगवी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

SCROLL FOR NEXT