Bhandara Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident News : एक्सीलेटरवर पाय जोरात पडला, कार वेगाने गेली अन् तलावात कोसळली; भंडाऱ्यात भीषण अपघात

Bhandara Car Accident : भंडाऱ्यात भीषण अपघात झाला आहे. कार अनियंत्रित होऊन तलावात कोसळली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Alisha Khedekar

  • कार थेट तलावात कोसळली.

  • एक्सीलेटर चुकून दाबला गेल्याने कार अनियंत्रित

  • पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

  • कोणालाही दुखापत नाही

शुभम देशमुख, भंडारा

नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात एक थरारक घटना घडली. भाविकाची कार अनियंत्रित होऊन थेट तलावात कोसळली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आणि एका स्थानिक तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचवले.

गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील रहिवासी श्रीकृष्ण नथू रहांगडाले हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी चांदपूरला आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना, पार्किंगमधून सॅन्ट्रो कार बाहेर काढत असताना हा अपघात झाला. कार वळवत असताना अचानक एक्सीलेटरवर पाय जोरात दाबला गेल्याने कारचा वेग वाढला आणि ती थेट समोरच्या तलावात जाऊन कोसळली. कार तलावात बुडत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.

यावेळी गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेले सिहोरा पोलीस स्टेशनचे हवालदार सुनील कासदा,पोलीस शिपाई रवींद्र सव्वालाखे,साहिल कोहळे (वय १७)या तिघांनीही क्षणाचाही विलंब न लावता तलावात उड्या घेतल्या. पाण्याचा अंदाज घेत त्यांनी बुडत्या कारपर्यंत पोहत जाऊन चालक श्रीकृष्ण रहांगडाले आणि त्यांचा मुलगा ओम रहांगडाले यांना सुखरूप बाहेर काढले.

दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्यानंतर, स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली कार ओढून बाहेर काढण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे.गर्दीच्या वेळी प्रसंगावधान राखून दोघांचे प्राण वाचवल्याबद्दल पोलीस हवालदार सुनील कासदा, रवींद्र सव्वालाखे आणि तरुण साहिल कोहळे यांचे परिसरातून आणि पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

Maharashtra News Live Update: मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, विषारी दारूमुळे १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT