Beed: अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जाताना, भरारी पथकाच्या गाडीला भीषण अपघात  
महाराष्ट्र

Beed: अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जाताना, भरारी पथकाच्या गाडीला भीषण अपघात

अवैध वाळू वाहतुकी विरोधात कारवाईसाठी जात असताना, भरारी पथकातील एका गाडीचा भीषण अपघात झाला

विनोद जिरे

बीड: अवैध वाळू वाहतुकी विरोधात कारवाईसाठी जात असताना, भरारी पथकातील एका गाडीचा भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. यामध्ये मंडळाधिकारी जागीच ठार झाले, तर तहसीलदार गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर असणाऱ्या, सावळेश्वर फाट्यावर आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान घडली आहे. नितीन जाधव असे अपघातात (accident) मृत्यू झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार असणारे सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत. (Accident squad vehicle while going action against sand extraction)

हे देखील पहा-

बीडच्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू (sand) माफियांचा धुमाकूळ सुरू असून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. हा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथक स्थापन केले आहेत. या दरम्यान बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा येथील मंडळाधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकी विरोधात कारवाईसाठी मध्यरात्री गस्त घालत होते.

यादरम्यान आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान तहसीलदार व मंडळाधिकारी बसलेल्या गाडीचा सावळेश्वर फाटा या ठिकाणी अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली ब्रेझा गाडी रस्त्याची खाली जाऊन झाडाला धडकली. यामध्ये मंडळाधिकारी नितीन जाधव हे जागीच ठार झाले. तर तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT