Mumbai pune Expressway Saamtv
महाराष्ट्र

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; एयर बॅग उघडूनही...

Mumbai Pune Expressway: अपघात इतका भीषण होता की एयरबॅग्ज उघडूनही तरुणाचा जीव वाचू शकला नाही.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Mumbai Pune Highway Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे सत्रच सुरू आहे. नुकतीच मुंबई पुणे महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावर कारने एका अज्ञात वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune EXpressway) खालापूर नजीक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास मुंबईकडे चाललेल्या कारने पुढे चाललेल्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने हा अपघात घडला. ज्यामध्ये कारमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये कारचा पुर्ण चक्काचूर झाला असून एयरबॅग्ज उघडूनही तरुणाचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. (Latest Marathi News)

भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू...

छत्तीसगढमधील (Chhattisgarh) राष्ट्रीय महामार्गावरही एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडच्या बलौदा बाजारात भीषण अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअपची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात (Accident News) ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT