Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi expressway accident : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या कारचा समृद्धीवर भीषण अपघात, वाहन चालकाचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईहून नागपूरकडे जात असलेल्या कारला समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील डोनदच्या लोकेशन 174 वर अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Samruddhi Highway:

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईहून नागपूरकडे जात असलेल्या कारला समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील डोनदच्या लोकेशन 174 वर अपघात झाला आहे.

कारने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भिलाई येथील काहीजण कारने मुंबई येथून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर कारला अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातामध्ये कार चालक राजेश चव्हाण वय 54 जागीच मृत्यू झाला. तर कारमधील प्रवासी सतीश खेर वय 7, नमन खेर वय 10, निशी खरेवय 38, शुभम खेर वय 40 हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण, डॉ. शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. (Latest Marathi News)

रिक्षाने कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, सोलापुरात एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत मुलगी ही सोलापूर शहरात एका महाविद्यालयात शिकत होती. भाग्यश्री कांबळे, असं मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजला जात असताना तिचा मृत्यू झाला.

भाग्यश्री कांबळे रिक्षाने कॉलेजला जात होती. कोंडी गावातून महाविद्यालयाकडे निघालेल्या रिक्षाला कारने समोरून जोरदार धडक दिली. रिक्षा आणि कार या दोन्ही वाहनांच्या धडकेत भाग्यश्रीचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : बोटीतून करा इतिहासाची सफर, १६व्या शतकातील 'हा' किल्ला पाहा

Today Gold Rate : सोनं प्रति तोळा ₹९८०० नी झालं स्वस्त, तर चांदीत ५३ हजारांची घट; वाचा सुवर्णनगरीतील 22k, 24k चे दर

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

Home Remedies For Teeth: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? हे 5 घरगुती उपाय करा, दात मोत्यासारखे चमकतील

Arijit Singh : "मला माहित आहे..."; अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंग का सोडले? प्रसिद्ध गायकाने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT