Bhandara Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : भंडाऱ्यात भीषण दुर्घटना, मॅग्नीजच्या खाणीत कामगारांवर कोसळला ढिगारा

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील एका मॅग्नीजच्या खाणीमध्ये भीषण अपघात झाला. या खाणीच्या आत काम करणाऱ्या कामगारांवर मॅग्नीजचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला आहे.

Yash Shirke

शुभम देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यात एका खाणीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये दोन कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक कामगार गंभीररित्या जखमी झाला आहे. तर चार कामगार अपघातातून सुखरुपपणे बचावले आहेत. ही घटना भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चिखला मॅग्नीज माईन्स आहे. या खाणीमध्ये लेव्हल ३ मध्ये ही दुर्घटना घडली. सकाळपाळीचे ७ कामगार हे चिखला मॅग्नीज माइन्सच्या गदेघाटमध्ये काम करत होते. त्याच दरम्यान मॅग्नीजचा ढिगारा या कामगारांच्या अंगावर कोसळला. या ढिगाऱ्याखाली हे लोक अडकले.

खाणीमध्ये ही दुर्घटना अंडरग्राउंडमध्ये १०० मीटरच्या आत घडल्याची माहिती समोर आली आहे. यात ढिगाऱ्याखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू झाला. एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या कामगारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेमध्ये विजय नंदलाल (वय ५०), अरुण चोरमार (वय ४१) यांचा मृत्यू झाला आहे. तर शंकर विश्वकर्मा हा कामगार जखमी झाला आहे. सकाळपाळीतल्या ७ कामगारांपैकी ४ कामगारांना ढिगाऱ्याखालून सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. दरम्यान या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT