मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना काळाचा घाला; दाम्पत्याच्या जागीच मृत्यू ! Saam Tv
महाराष्ट्र

मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना काळाचा घाला; दाम्पत्याच्या जागीच मृत्यू !

मुलाच्या लग्नाची पत्रिका देऊन घरी परतणाऱ्या आई-वडिलांवर काळाने घाला घातला आहे. जिप उलटून झालेल्या अपघातात (Accident) वराचे आई आणि वडील यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर : मुलाच्या लग्नाची पत्रिका देऊन घरी परतणाऱ्या आई-वडिलांवर काळाने घाला घातला आहे. जिप उलटून झालेल्या अपघातात (Accident) वराचे आई आणि वडील यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री लातूर जिल्ह्यातील बिदर – उदगीर मार्गावर सेवालाल तांड्याजवळ हा अपघात झाला आहे.

सूर्यकांत पाटील (वय 50) आणि जयश्री पाटील (वय 45) (रा. मेथी मेलकंदावाडी, मु. भालकी, जि. बिदर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचे पुत्र साईनाथ याचा विवाह (ता. 26) डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

हे देखील पहा-

नेमकं काय घडलं?

बिदरला लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी सूर्यकांत पाटील आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे गेले होते. आमंत्रण दिल्यानंतर रात्री उशिरा ते भालकीकडे परत येत होते. यावेळी बिदर- उदगीर मार्गावरील एक तांड्याजवळ त्यांच्या जिपला भीषण अपघात झाला, यामध्ये जिप उलटून त्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

आपल्या आई-बाबांना येण्यास उशीर होत आहे म्हणून त्यांचा मुलगा साईनाथने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागत नसल्यानेका उशीर झाला हे कळायला काही मार्ग नव्हता. कुटुंबातील सदस्यांनी दोघांची रात्रभर त्यांची वाट पाहिली. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी लग्नघरात ही दुर्दैवी बातमी सर्वांना माहिती पडली.

रस्त्याच्या कडेला गाडी उलटून अपघात झाल्याने आपल्या आई वडिलांचा मृत्यू झाल्याचे पाटील कुटुंबीयांना समजले, ही घटना कळताच शोककळा पसरली, त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि भावंडे असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT