ACB officials arrest a tehsil office clerk after being caught accepting a bribe in Sangamner. Saam Tv
महाराष्ट्र

तहसीलदार कार्यालयातील लिपिक ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रांगेहाथ पकडला

Sangamner Tehsil Office Clerk Caught Taking Bribe: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

Omkar Sonawane

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेला लिपिक कैलास खाडे याने मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश करून देण्यासाठी संबंधित नागरिकाकडे १३ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने कैलास खाडे याला रंगेहाथ पकडत तात्काळ अटक केली. या कारवाईमुळे संगमनेर तहसीलदार कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

सांगलीमध्ये कनिष्ठ अभियंता ACB च्या जाळ्यात

सांगलीतील जत पंचायत समिती मधील कनिष्ठ अभियंता संजय सुतार यांना 88 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. शाळेतील वर्ग खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती बिल तयार करून ते जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी 88 हजार रुपयांची लाच संजय सुतार यांनी मागितली होती. तक्रारदार यांनी मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील खोल्यांचे बांधकाम दुरुस्तीचे काम घेतले होते.

ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवावे लागणार होते. हे बिल तयार करून ते मंजुरीसाठी पाठवण्यासाठी संजय सुतार यांनी ही लाच मागितली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT