Bribe, Nashik Crime News, ACB Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : सहाय्यक पोलीस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यात सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची सध्या उपनगर पोलिस ठाण्यात नेमणूक हाेती. ही कारवाई जिल्हा रुग्णालयात गुरुवारी करण्यात आली. (Maharashtra News)

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनूसार शहर पोलिस दलातील आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक सागर गंगाराम डगळे (वय ३८) याच्या विरुद्ध तक्रार आली हाेती. एका व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्याला जाणे आवश्यक होते. पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा आणि जेवणाच्या खर्चासाठी लाचखोर डगळे याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यातील ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अनिल बागुल (पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सापळा पथक पो. ना. किरण अहिरराव, पो. ना.अजय गरुड, पो.ना. चंद्रशेखर मोरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक तसेच मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक), नारायण न्याहाळदे (अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक) यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT