jalna , ACB, Bribe  Saam Tv
महाराष्ट्र

ACB Trap : विद्यार्थ्यांकडून जादा पैसे घेतल्याने संस्थाचालकासह प्राचार्यास अटक

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या १२ बोर्डाच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी बोर्डाकडून ४७५ रुपय शुल्क ठरवून दिले असताना. प्राचार्य आणि संस्थाचालकाकडून १५०० रुपयांची मागणी केली जात होती.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या संस्थाचालकासह दोन जणांना आरिक्त शुक्लच्या नावाखाली लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. (Jalna Latest Marathi News)

शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची (students) लुबाडणूक करणाऱ्या संस्था चालका विरुद्ध झालेल्या या कारवाईने (jalna) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील उर्दू माध्यमाच्या डॉ. नसीम उर्दू जुनिअर कॉलेज मध्ये हा प्रकार घडला आहे. (Breaking Marathi News)

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या १२ बोर्डाच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी बोर्डाकडून ४७५ रुपय शुल्क ठरवून दिले असताना. प्राचार्य आणि संस्थाचालकाकडून १५०० रुपयांची मागणी केली जात होती. विद्यार्थी आणि पालकाना संस्थेकडून वसूल केला जाणाऱ्या अतिरिक्त १०२५ नियम बाह्य शुक्ल मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे या बाबत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. (Maharashtra News)

या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या (acb) पथकांनी धावडा गावातील डॉ.नसीम उर्दू जुनिअर कॉलेजमध्ये संस्थाचालक, प्राचार्य यांच्यासह एकाला अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली लाच स्विकारताना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधित कायद्या अंतर्गत पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT