abu azmi, narendra modi, amravati saam tv
महाराष्ट्र

Abu Azmi News : पुन्हा एक नटवरलाल देश विकू पाहतोय : अबू आजमी

15 लाख रुपये पंतप्रधान मोदी देणार होते, काय झालं त्याचे असा सवाल आजमी यांनी केला.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Abu Azmi News : आज पुन्हा एक नटवरलाल देश विकू पाहतोय. देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आजमी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर केली. आमदार अबू आजमी अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी एका सभेत त्यांनी माेदींवर निशाणा साधला. (abu azmi latest marathi news)

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आजमी यांची अमरावती (amravati) शहरात मुस्लिम भागात जाहिर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर (bjp) टीका करत खळबळजनक व्यक्तव्य केले. आजमी म्हणाले देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे. तसेच नवीन संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास तयार करणे सुरू आहे.

त्यामुळे जुनी संसद पाडण्याला विरोध केला पाहिजे या विरोधात उभे राहिले पाहिजे असं आवाहन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी केले. 15 लाख रुपये पंतप्रधान मोदी देणार होते, दोन करोड नोक-या देणार होते. काही दिलं नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे.

देश बरबाद होत आहे याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) आहेत अशी टीकाही आजमी यांनी केली. दरम्यान आज पुन्हा एक नटवरलाल देश विकू पाहतोय अशी टीका अबू आजमी यांनी करुन देशाला वाचविणे गरजेचे असल्याचे आजमी यांनी म्हटले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT