Abu Azmi Aurangzeb Statement Saam Tv
महाराष्ट्र

Abu Azmi Aurangzeb : 'औरंगजेब क्रूर शासक नव्हता' आझमींच्या वक्तव्यावरुन वाद, नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

Abu Azmi Controversy : सपा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरून आता नवा वाद पेटलाय. नेमका काय वाद आहे आणि यावरून ठाकरे आणि शिंदे कसे एकत्र आले आहेत. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

Abu Azmi : महाराष्ट्रात सध्या शिवकालीन घटनांवरुन वाद उकरले जात आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आग्रा सुटकेवरुन शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं होतं. तर नागपूरच्या प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन धमकी दिली होती. अशात अबू आझमी यांनी इतिहासाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची चर्चा होत आहे.

संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटला मोठा प्रतिसाद मिळतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदार अबू आझमी यांनीही वादग्रस्त विधान केलंय. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं त्यांनी म्हटलंय.

अबू आझमींवर कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय... तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय.. ऐतिहासिक घटनांच्या संदर्भावरुन राज्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.. पण पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही हे ही तेवढंच खरं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT