Abhijeet Bichukale, Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Abhijeet Bichukale : बेडकाने बैलाची... साता-यात येताच असं का म्हणाले अभिजीत बिचुकले (पाहा व्हिडीओ)

लेडी मुख्यमंत्री असावी हा मुद्दा मी पहिल्यांदा हाती घेतली असेही बिचुकलेंनी नमूद केेले.

ओंकार कदम

Abhijeet Bichukale News : साताऱ्याचे कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale Latest News) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना पत्र लिहून गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 टक्के सवलत द्यावी अशी मागणी केली आहे. बिचुकले यांनी माध्यमांशी बाेलताना हा विषय मार्गी लागावा यासाठी पाठपूरावा करणार असल्याचे म्हटलं आहे. (Maharashtra News)

अभिजीत बिचुकले म्हणाले ज्याप्रमाणे राज्य सरकारने महिलांना एसटीत 50 टक्के सवलत दिली आहे. त्याच पद्धतीने महिलांचा महत्त्वाचा विषय असणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत सुद्धा सरकारने 50 टक्के सवलत द्यावी. मी ही मागणी पुर्ण हाेण्यासाठी कंबर कसणार आहे. ही माझी व्यक्तीगत मागणी नाही. अनेक महिला संघटना या विषयावर आंदाेलन छेडणार आहेत असेही बिचुकलेंनी नमूद केले.

बिचुकले म्हणाले यापुर्वी अनुदान मिळत हाेते. परंतु या सरकारने ते काढून घेतले. जे निवडून आले ते समाजहितासाठी काही करीत नाहीत. एकही आमदार गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दराबाबत बाेलत नाही. याचा अर्थ एकाही लाेकप्रतिनिधीस जनतेचा कळवळा नाही असेही बिचुकलेंनी नमूद केले.

लेडी मुख्यमंत्री असावी हा मुद्दा मी पहिल्यांदा हाती घेतली. माझी पत्नी अलंकृता यांचे नाव समाेर आणले. आता काही नेते हा मुद्दा उचलत आहेत. तुम्ही माझी काॅपी करु नका. मी तर बैल आहे असे म्हणत बेडकाने बैला सारखे हाेऊ नये असे माझ्यावर संस्कार झालेत असेही बिचुकलेंनी सातारा येथे नमूद केेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT