aam aadmi protest in kalyan buldhana pimpri chinchwad on arvind kejriwal arrest  saam tv
महाराष्ट्र

I Stand With Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचे कार्य भाजपला झाेंबलं; 'आप'चे कल्याण, बुलढाणासह पिंपरी चिंचवडमध्ये आंदाेलन

AAM Aadmi Party News : देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणा यांना पुढे करून कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख / संजय जाधव / गाेपाल माेटघरे

Aam Aaadmi Party Protest :

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सामान्य जनतेसाठी काम केले. त्यांचे काम भाजपाला खपलेले नाही. याचा फटका भाजपाला बसेल म्हणून सुडापोटी त्यांच्यावर कारवाई केल्याचा आराेप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी केले. कल्याण येथे आपने केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात आंदाेलन केले. त्यावेळी जाेगदंड बाेलत हाेते. (Maharashtra News)

कल्याण तहसील कार्यालय बाहेर आज आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सामान्यांसाठी काम केल्याने भाजपला झाेंबत असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

बुलढाण्यात " आप "ने नाेंदविला निषेध

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्हा आम आदमी पक्षाकडून काळया फिती लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन करु असा इशारा 'आप'ने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिंपरी चिंचवडला 'आप', इंडिया आघाडीचे आंदाेलन

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्याला बाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणा यांना पुढे करून कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Periods Care : पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, उद्भवतील गंभीर समस्या

Panic Attack Remedies : पॅनिक अटॅक आल्यावर घाबरू नका, पटकन करा 'हा' उपाय

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT