मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार नितेश राणे सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत. याचिकेनंचर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली होती.
अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एक विचित्र अपघात झालाय. एका ट्रकने १० ते १२ चारचाकी आणि दुचाकींना उडवलंय. या अपघातात अंदाजे १५ ते १६ जण जखमी झालेत. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळालीय. नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल येथे हा विचित्र अपघात झालाय.
धारावी परिसरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. या राड्यात अरविंद वैश्य (वय २६) नावाच्या तरुणाची हत्या झालीय. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. दोन गटांच्या भांडणात पडल्याच्या रागामुळे या युवकाची हत्या झालीय. चाकूने भोसकून या युवकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.
भिडे पूल पाण्याखाली असल्याने नदीपात्रातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. आता जंगली महाराज रोडसह इतर छोटे रस्त्यावर वाहतूक चालू होती. वाहनांची गर्दी या रोडवर झालीय. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झालीय. अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेवकांच्या विविध मागण्यांसाठी आयटक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात आला. रिमझिम पावसात या विराट मोर्चाला संविधान चौकातून सुरूवात झाली. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करित जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला यावेळी आशा सेविकांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडले.राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
विशेष CBI कोर्टाने इंद्राणीला परदेशी जाण्याकरता दिली होती परवानगी दिली होती. मात्र परवानगीला CBI ने दिलं उच्च न्यालायात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांना परदेश वारी करण्यास मज्जाव केलाय.
मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आता १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
पुणे सत्र न्यायालयात आता १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री आहेत. शेतकऱ्याला जमिनीच्या वादातून पिस्तूल रोखत धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या अनेक भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीसांनी ही धडक कारवाई केली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८९ लिटर देशी दारू उद्ध्वस्त तर ३ जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन
जप्त केले आहे. मंदाबाई गुडावत, ईश्वर जठार, हिराबाई भिडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर भागात आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत भावाने मिळून जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारख पसरलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. खरंतर सैराट या मराठी चित्रपटाची पुनरावृत्ती झाली. या तरुणीने प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील सुकळी गावातील रहिवाशी अससलेल्या एका युवकाने आत्महत्या केलीय. शेतीच्या वादात न्याय मिळत नसल्याने युवकाने उचलले टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा अंबादास चंद्रवंशी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
एक आठवड्यात शेतकऱ्यांना पिक विमा द्या अन्यथा राज्याला हादरवणार अस उग्र आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. सरकारला पळो की सळो करून सोडू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला. तुपकर यांनी त्यांच्या आंदोलनाची सुरुवात मेहेकर येथून सुरू केलंय.
दिल्लीला जाणाऱ्या तामिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांना नर्मदापुरम येथे रोखण्यात आले. त्यांना दिल्लीवरून न जाऊ देता अंदमान एक्स्प्रेसमध्ये परत तामिळनाडुला पाठवण्यासाठी बसवण्यात आले. आज सकाळी 10.34 ला नागपूर रेल्वे स्थाबकावर आली असतांना यातील 65 शेतकऱ्यांनी रोखून धरली. साधारण 11.45 वाजताच्या सुमारास हे ट्रेनवरील चढलेल्या शेतकऱ्यांची समजूत काढत परत पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. यात प्राथमिक माहितीनुसार या 65 शेतकऱ्यानं नर्मदापुरम येथून वेगळा कोच आंदमान एक्स्प्रेसच्या जोडून पाठवण्यात आले.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील मेढा मरडमुरे रोडवरील शेडगेवाडीच्या नागरी वस्तीच्या जवळ पद्मावती मंदिराच्या वाटेवर सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जमीन खचली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरी वस्तीतील लोक भीतीच्या छाये खाली आहेत.
पुणे सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई. वाघांची शिकार करून कातडी विकणारे मोठं रॅकेट केलं उध्वस्त . आठ कोटी रुपयांना विकायाला निघालेली वाघाची कातडी करण्यात आली जप्त. जळगावजवळील जंगलामध्ये सीमा शुल्क विभागाने केली कारवाई.
'महाराष्ट्रात जे काही आता चालू आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. फक्त मतांसाठी मन दुषित केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण नाही. ', असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. 'राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे. तुमच्यातले मतभेद बाजूला ठेवा. जातीपातीतला विष कालवून जर मत मिळणार असेल तर महाराष्ट्राचे भविष्य काही चांगलं नाही.', असे देखील त्यांनी सांगितले. पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
दिंडोरी मेळाव्याच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या होर्डिंगवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोटो. नरहरी झिरवाळ यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बॅनरवर पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मेळावा सुरू झाला.
मनोज जरांगे पाटील यांचा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. 7 ऑगस्ट रोजी सोलापुरातून शांतता रॅलीने दौऱ्याला सुरवात होणार असून सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर आणि नाशिक येथे जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार आहे. मराठा समन्वय धनाजी साखळकर यांनी ही माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्कजवळ एक स्कूलबस आणि आलिशान गाडीचा भीषण अपघात झाला. समोरासमोर जोरदार धडक दिल्याने या अपघातात या स्कूलमध्ये बसमधील दोन विद्यार्थी जखमी झालेत. या विद्यार्थ्यांवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. एका खाजगी शाळेचे पंधरा विद्यार्थी घेऊन ही बस जात होते. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका आलिशान गाडीने या स्कूल बसला जोरदार धडक दिली.
शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स पाठवले आहे. अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हे समन्स बजावले आहे. वायकर यांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी कीर्तीकर यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकर यांना न्यायालयाचे निर्देश दिले आहेत.
खामगावरून शिर्डीकडे जाणारी बस समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात डिव्हायडरवर धडकून पलटी झाली. या बसमध्ये एकूण ३४ प्रवाशी होते. त्यामधील ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धरणगावजवळील फौजी ढाब्यासामोर हा अपघात झाला.
उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरण: पोस्टमार्टममधून धक्कादायक खुलासा
यशश्री शिंदेच्या शवविच्छेदन अहवालात महत्वपूर्ण माहिती समोर आली असून आरोपी मोहम्मद दाऊद शेखने हत्येच्या उद्देशानेच धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यशश्री शिंदे हिच्या पाठीवर अनेक वार झाले असून यशश्रीवर अत्याचार झाले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे या भगवान भक्ती गडावर दाखल झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या हस्ते भगवान भक्ती गडावर असणाऱ्या भगवान बाबांच्या मूर्तीचा महाअभिषेक सुरू आहे.
शिर्डीमध्ये विखे पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालत दूध दर वाढीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन केले. शिर्डी नगरपरिषदेसमोर आंदोलन केले असून दुधाला किमान 40 रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विखे पाटलांच्या मतदारसंघात ठाकरे गटाने केले आंदोलन...
राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी...
ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसापासून पावसाची सतत धार सुरू असल्याने नदी नाले प्रवाहित झाले आहेत तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात शेतामध्ये पाणी साचून असल्याने पिके खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे नदी नाले प्रवाहित झाले असल्याने धरणांच्या पाणीसाठांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणाची पाणी पातळी तीन मीटरने वाढले आहे
आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही प्रकरणे एका दिवशी ऐकतो. एका पाठोपाठ एक ही प्रकरणे ऐकू असे म्हणत सुप्रीम कोर्टाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटीस जारी केली आहे.
पुण्यात नदीचे पाणी शिरल्याने चिखल गाळ व इतर प्रकारची स्वच्छता करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन करण्यात आले आहे. पुणे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र ज्या पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे आदेश दिले त्या अधिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.
दरम्यान दुसऱ्याने केलेल्या चुकीचे खापर सहाय्यक आयुक्तांच्या डोक्यावर फुटल्याचे आणि सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचा राजकीय बळी गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे
राज्य विरोधी बोलणाऱ्या विद्वानांना शरद पवार यांची शिकवण असते. मनोज जरांगे पाटील यांना आत्ता तरी कळले असेल, समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण आहे? राज्यात असंतोष पसरवण्याच काम शरद पवार करतात, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून आज ते विधानसभा संदर्भात सूचना देतील. पुणे शहरातील आठही मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार आहे. मनसेमुळे महायुतीचं टेन्शन वाढले असून कोथरूडमधून किशोर शिंदे उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रतोद पदी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील महिला खासदारांचा कामकाजात सहभाग वाढविण्यासाठी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या 25 पेक्षा जास्त महिला खासदारांचा समावेश असलेल्या गटाचे महिला प्रतोदपद वाघ यांच्याकडे असणार आहे.
मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी या ओबीसी बांधवानी केली आहे.
गेली पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पुराचे पाणी घुसले होते. सध्या पावसानं जिल्ह्यात विश्रांती घेतल्यानंतर आता शहरातलं पाणी देखील ओसरू लागले आहे. शहरातील रस्त्यांवर पुराचे पाणी आल्यानंतर पाण्यासोबत कचरा आणि माती देखील वाहून आली होती. त्यामुळे रस्त्यांवर दलदल झाली होती. आज सकाळपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी आलं होतं, त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारून रस्ते स्वच्छता सुरू केलेली आहे. तसेच या परिसरात डास, माशा होऊ नये यासाठी औषध फवारणी देखील सुरू केलेली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यामध्ये भाजपच्यावतीने राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनकल्याण संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे.भाजपाचे नेते तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही जनकल्याण संवाद यात्रा सुरू झाली असून यात्रेच्या माध्यमातून जवळपास दीडशे किलोमीटर ही यात्रा जाणार असून सुमारे 60 ते 70 गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जाणार आहेत,जत तालुक्यातल्या उमदी येथून या जनकल्याण संवाद यात्रेची सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात सहा दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे.
बिहार राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका!
बिहारमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. पटना उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केल्याच्या विरोधात बिहार सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी स्वीकारली. या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सविस्तर सुनावणी होणार
केंद्रीय अर्थ संकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला आणि राज्याला सुद्धा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उद्या आम्हाला गाजर दाखवणार आहेत त्यांचा खरा चेहरा समोर आल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने आज देण्यात आली. आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही असा आरोप करत आंदोलन केले.
उरण मधील माणिक डोकं येथे 27 वर्षीय मुलीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. न्हावे गाव येथील श्रद्धा भोईर असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्याच गावात राहणारा प्रीतम म्हात्रे या मुलाने एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याचे समोर आले आहे.
मनमाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाला आहे. हमाल-मापारी व व्यापारी यांची बाजार समिती काल बैठक होऊन तोडगा काढण्यात आला. प्रचलित पद्धतीने हमाली-तोलाईचे पैसे कपात होणार असल्याचा निर्णय यामध्ये झाला. 6 दिवसाच्या बंदनंतर कांदा लिलाव सुरू झाला असून जर योग्य तो तोडगा नाही निघाला तर महिन्याभरानंतर पुन्हा बाजार समितीत बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी शिष्टमंडळ मातोश्रीवर भेटीसाठी आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मुख्य मागणी आहे. याबाबत सत्ताधारी त्यासोबतच विरोधकांनी आपली भूमिका मांडावी असं या सकल मराठा समाजाच्या शिष्ट मंडळाची मागणी आहे. यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती... त्यानंतर ते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला आले आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आला आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन भाजपने दावा ठोकला आहे. कुठल्याही परिस्थितीत मावळ विधानसभेची जागा भाजप खेचून आणणार असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शहरात बॅनरबाजी केली आहे. बच्चू कडू महाराष्ट्राचे भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय.
गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपासमारीमुळे या कुत्र्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी नेस्को एक्झिबिशन सेंटरची महिला अधिकारी तसेच सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आलाय.
या दोघांकडूनही नेस्को सेंटरमधील भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास प्राणी प्रेमींना मज्जाव करण्यात येत होता. इतकंच नाही,तर त्यांनी प्राणीप्रेमींना धमकावलं देखील होतं.
वर्ध्यात गेल्या नऊ दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निम्न वर्धा धरणाचे तीन दरवाजे 40 सेंटीमीटरने आज सकाळी 9 वाजता उघडण्यात आले असून वर्धा नदीपात्रामध्ये 101.23 घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वर्धा नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वलंबा चिखली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळली आहे. सुदैवाने पर्यटकांनी वेळीच कारमधून बाहेर उड्या घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचं मोठं नुकसान झालं आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पर्यटक कोणत्या भागातील होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुंबईकरांना भल्यापहाटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. तीन हात नाका, आनंद नगर जकात नाका, मुलुंड टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या 3 किलोमीटपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल अर्धा ते पाऊण तास ही वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबईच्या धारावी परिसरात मध्यरात्री ३:३० वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी इसमाने गोळीबार केलाय. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
भंडारा जिल्ह्यात दोन दिवस पावसाने कहर केला. नदी, नाले, ओसंडून वाहू लागले. यात शेतीपिकांचे देखिल नुकसान झाले अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठं नुकसान झालं तर तुमसर शहरातील इंदिरा नगर येथील राहत असलेल्या प्रभाकर पाध्ये यांचा घर पावसामुळे कोसळला. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. पण त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं. आता दुसऱ्याच्या घरी त्याला आसरा घ्यावा लागला. शासनाने लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता पिढीत कुटूंब करीत आहे.
परभणीच्या एसटी महामंडळाला विठुराया पावला आहे. आषाढी एकादशीच्या काळात एसटी महामंडळाला एक कोटी 60 लाखांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात तब्बल 32 लाखांची भर पडली आहे. परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी 250 विशेष बसचे सोडण्यात आल्या होत्या.
जून महिन्यात झालेल्या पावसावर मनमाड व परिसरातील अनेक शेतक-यांनी टोमॅटोची लागवड केली,लागवडीसाठी मोठा खर्च शेतक-यांनी केला.टोमॅटो बाजारत विक्रीला जाताच सुरवातील ८०० रुपया पेक्षा जास्त दराने विक्री झाली मात्र सगळीकडे आवक वाढू लागल्याने अवघ्या आठ दिवसाच्या आत टोमॅटोच्या दरात घसरण होऊन दर ५०० रुपये प्रतिक्रेट वर आल्याने शेतक-यां मध्ये नाराजी पसरली असून लागवडीसाठी झालेला खर्च तरी वसूल होईल की नाही याची चिंता शेतक-यांना लागून राहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय. आता या धरणात 6. 65 टक्के पाणीसाठा झाला असून 3 दिवसात अडीच फुटांनी ही पाणी पातळी वाढली. नांदूर मधुमेश्वर कालव्यातून सोडलेले पाणी दहा हजार 260 क्युसेक ने येत होते यात घट होऊन धरणात 6 हजार 977 क्युसेक वेगाने पाण्याची आवक ही नाथसागराच्या वरच्या भागातून सुरू आहे. सध्या धरणात 1497.43 फूट पाणीसाठा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.