Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यात बाचाबाची,

Maharashtra Breaking News Live Updates : आज बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, देशासहित महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील ताज्या अपडेट्स, देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Vishal Gangurde

नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यात बाचाबाची

नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आज भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकित बालाजी सूर्यवंशी आणि आनंद पावडे या दोघांमध्ये शिंदे गटाचे आमदार चांगले का वाईट यावरून वाद झाला.शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे नाव घेताच वाद उफाळून आला. याचे रूपांतर धक्का बुक्की पर्यंत जाणार तोच भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण साले आणि मिलिंद देशमुख यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळलाय. मात्र बैठकीनंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद देशमुख आणि भाजपा नेते प्रवीण साले यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना, अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी केले.

Ladki Bahin Yoajan: लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच अनुदान जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच अनुदान जमा होण्यास सुरुवात झालीय. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे दोन हफ्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तीन हजार रुपये अनुदान लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहेत. जालना जिल्हात लाडकी बहीण योजनेचे तीन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. २ लाख ७० हजार अर्ज पात्र झाले असून पात्र महिलांच्या खात्यावर अनुदान येण्यास सुरुवात देखील झालीय.

अकोल्यात दोन चिमुकल्यांचा कमळगंगा नदीत बुडून मृत्यू

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या हिरपूर गावात पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा कमळगंगा नदीत बुडून मृत्यू. दोन्ही मुलं 12 ते 14 वयोगटातील. नदीच्या गाळात फसल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह सापडले. शेख अयान आणि मोहम्मद अमीर मोहम्मद मोजद्दीन अशी दोन्ही मृतकांची नावे आहेत.

Ladki Bahin Yojana: पुणे जिल्ह्याचा लाडकी बहीण योजनेसाठी 9 लाख 73 हजार अर्ज

पुणे शहर,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातून लडकी बहीण योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. यापैकी 9 लाख 34 अर्जांना मंजुरी देण्यात आली असून तर 39 हजार अर्जांची छाननी सुरू आहे. ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, त्यांची पूर्तता क़रण्याच्या सूचना अर्जदारांना दिल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंंतर या अर्जांना मंजुरी दिली जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाने ही माहिती दिलीय.

Sambhaji Raje : मोठी बातमी! संभाजी राजे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे हे मनोज जरांज यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी दाखल झाले आहेत..आज दुपारी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी मनोज जरांगेंशी चर्चा करणार असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Manoj Jarange Patil : संभाजी राजे भेटायला येणार,  मनोज जरांगेंची माहिती

संभाजी राजे भेटायला येणार असल्याची माहिती मिळत आहे. ते आल्यानंतर चर्चा होईल त्यानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल. सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांना वाटतं सध्या बदलाची शक्यता आहे, मात्र 29 नंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

Rajya Sabha :  अभिषेक मनु सिंघवी यांना तेलंगणातून राज्यसभेची उमेदवारी

भिषेक मनु सिंघवी यांना तेलंगणामधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणातून होणाऱ्या पोटनिवडणुकिसाठी ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांचा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे अखेर ९ महिन्यानंतर कारागृहाबाहेर

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे अखेर ९ महिन्यानंतर कारागृहाबाहेर आले आहेत. नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळाप्रकरणी कारागृहात होते. कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार बँकेने केल्यानंतर हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे दिशाभूल करणारे,  मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद 

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू असून राज्य मागास प्रवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांचे सवाल कायम आहेत. शिक्षणाप्रमाणेच मराठा समाजातील तरूणांना सरकारी नोकरीत आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे दिशाभूल करणारे असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप केला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

Nagpur News : नागपूर भागात विजांच्या कडकडांटासह पावसाच्या जोरदार सरी

आज नागपुरात काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनके भागात आज पुन्हा विजांचा कडकडाटसह पावसाचं आगमन झालं.

वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील सावली तालुक्यातील केरोडा गावात घडली. मृतक महिलेचं नाव चित्रकला सुधाकर भुरसे असे आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अचानक सावली तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ही महिला जागीच ठार झाली. जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Laxman Hake :  जातीने श्रेष्ठ असतील तर ओबीसीतून आरक्षण कशासाठी; लक्ष्ण हाकेंचा जरांगेंना सवाल

मनोज जरांगे सभांमधून सांगतात. मराठे क्षत्रिय आहेत. लाढऊ आहेत. ९६ कुळी आहेत. असे सांगुन जरांगे पुरोगामी महाराष्ट्रात जातीय वाद का निर्माण करत आहेत. जातीची श्रेष्ठता सांगून जातींमध्ये भेदभाव निर्माण करत आहेत. ते जातीने श्रेष्ठ असतील तर त्यांना ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवं आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Ganesh Chaturthi : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'सह्याद्री'वर महत्त्वाची बैठक

गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथिगृहावर पार पडत आहे. गणपती आगमन तसेच विसर्जनावेळी खड्ड्यांचे समस्या उद्भवू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गणपती मंडळ त्याच बरोबर पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त ,महानगरपालिका आयुक्त, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर या बैठकीला उपस्थित आहेत.

Pune News : सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाचे उद्या उद्घाटन, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

पुण्यातील सिंहगड रोड असणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन अखेर उद्या पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अनेक दिवसांपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवला असल्यामुळे टीकेचे जोड उठली होती. याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन केले होते. अखेर या उड्डाणपुलाचे उद्घाटन उद्या होणार असून लवकरच वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात येणार आहे.

Pune News : पुणे दहशतवाद विरोधी पथक करणार इसिसशी संबंधित रिझवान अलीची चौकशी

पुणे दहशतवाद विरोधी पथक करणार रिझवान अलीची चौकशी करणार आहे. रिझवान अलीला काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती. रिझवान अली पुणे इसिस मॉडेलशी संबंधित वॉन्टेड दहशतवादी आहे.

Amravati News : अमरावती जिल्हात काँग्रेसची ताकद वाढणार; मोठ्या उद्योजकाचा पक्षात प्रवेश

अमरावती जिल्हात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. उद्योजक गुणवंत देवपारे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. अमरावतीत काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थित गुणवंत देवपारे यांचा पक्ष प्रवेश पार पडलाय. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते गुणवंत देवपारे यांना दर्यापूर मतदार संघातून काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Pune News :  पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय प्रकरण ; तिन्ही तरुणांचं बॅकग्राऊंड ATS तपासणार

कमला नेहरू रुग्णालयातून ताब्यात घेतलेल्या संशयीतांच्या संदर्भात ATS कडून देखील माहिती घेण्यास सुरुवात झालीय. ताब्यात घेतलेल्या सांशीयत तरुणांची ATS ने पुणे पोलिसांकडून माहिती मागवली.

Kalyan News :  कल्याणजवळील शहाड पुलावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक

कल्याणजवळील शहाड पुलावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झालंय. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ काँग्रेस आंदोलन करत आहे. शहाड पुलावरील खड्ड्यांत बसून रस्ता रोको करत काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे.

Kolhapur News : राधानगरीतल्या रानभाज्या महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद

कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे रानभाज्या महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राधानगरी तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रानभाज्या महोत्सवात 100 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश आहे.

Congress Protest : काँग्रेसकडून रवी राणा यांच्या विरोधात आंदोलन; जोरदार घोषणाबाजी

लाडकी बहिण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकासमोर राष्ट्रीय काँग्रेस आणि युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. रवी राणा यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक महिलांनी दिलाय.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतून ५ लाख ४ हजारांचा सोन्याचा ऐवज लुटला

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता समारोप रॅलीत चोरट्यांनी हात साफ केलाय. शांतता रॅलीतून पाच लाख चार हजारांचा सोन्याचा ऐवज लुटलाय. चोरट्यांनी रॅलीत शिरून नागरिकांच्या सोन्याची चैन, मंगळसूत्र चोरले. मोबाईलसह अनेकांचे पाकीट देखील चोरट्यांनी लांबविले. नाशिकच्या पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

Vidhan Sabha : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाची महायुती समन्वय समितीची बैठक

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाची महायुती समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रसाद लाड, उदय सामंत, शंभूराजे देसाई, तसेच महायुती सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. कोकणमधील मते आपल्याकडे वळवण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.

Pune News : पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बांगलादेशी तरुण शिरल्याची शक्यता 

पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमधील रुग्णांना बाहेर काढले जात आहे. बांगलादेशी तरुण या रुग्णालयात शिरल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जातेय. पोलिसांकडून मात्र या माहितीला दुजोरा नाही. घटनास्थळी पोलिसांकडून पथके रवाना झालेत.

Maharashtra Politics :  लक्ष्मण हाके यांना शासनाकडुन वाय प्लस सुरक्षा व्यवस्था

लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण वाचवण्यासंर्दभात पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभुमीवर ओबीसींनी काय भुमिका घ्यावी? यावर मत मांडणार आहे. लक्ष्मण हाके यांना शासनाकडुन वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

Pune News : कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाला तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई

उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे असलेल्या डिंभे धरणाच्या जलाशयावरती स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने तिरंगा रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आकर्षक ही विद्युत रोषणाई मन प्रसन्न करून टाकत आहे. डिंभे धरण सध्या ओव्हर फ्लो झालं असून बळीराजाचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटलाय.

Maharashtra Politics : लाडकी बहीण योजनेवर रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत महिला काँग्रेसचे काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले आहे.

Mumbai News : राज्यातील निवासी डॉक्टरांचे आज देखील आंदोलन

कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांचे आज देखील आंदोलन

अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व निवासी डॉक्टरांचे आजही काम बंद आंदोलन

आज सायन रुग्णालयाबाहेर डॉक्टर कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निदर्शने

काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा येथे भेट घेतली.

हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

काँग्रेसचे दोनही आमदार पक्षाला रामराम ठोकणार

क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच पक्षाला रामराम ठोकणार.

PM मोदी लाल किल्ल्यावर ११ व्यांदा ध्वजारोहण करणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी लाल किल्यावर सलग 11 व्यंदा ध्वजारोहण करणार

लाल किल्ल्यावर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात

बांगलादेशमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर

Nashik : नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी सर्व कत्तलखाने राहणार बंद 

- 15 ऑगस्ट दिनी नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने राहणार बंद

- कत्तलखाने बंद ठेवण्याचे मनपा प्रशासनाकडून आदेश

- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महापालिका हद्दीत जनावरांची कत्तल न करण्याच्या सूचना

- जनावरांची कत्तल करताना आढळल्यास कारवाई करण्याचा देखील इशारा

Srinagar accident : अकोल्यातील भाविकांवर श्रीनगरमध्ये काळाचा घाला, अपघातात तिघेजण ठार

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा इथल्या चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. श्रीनगर येथे ट्रक आणि कारच्या अपघातात तिघेजण ठार झाले आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह एका पुरूष भाविकांचा समावेश आहे.

Pune News : पुणे शहरात झिका विषाणूचा धोका कमी

पुणे शहरात झिका विषाणूचा धोका कमी झाला आहे. गेल्या काही दिवसापासून झिकाच्या नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. शहरात 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकही नव्या रुग्णांची नोंद झाली नाही. सध्या पुणे शहरात झिका विषाणूचे एकूण 75 रुग्ण आहेत. पण नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा मिळाला आहे.

Pune News : कोलकात्यातील घटनेनंतर ससून रुग्णालय अलर्ट मोडवर, महिला डॉक्टरांच्या सुरक्षेत करणार वाढ

कोलकात्यात निवासी महिला डॉक्टरच्या हत्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयाचे बी.जे वैद्यकीय महाविद्यालय अलर्ट मोडवर

बी.जे वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी महिला डॉक्टरांच्या सुरक्षेत करण्यात येणार वाढ

ससून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत करण्यात येणार वाढ

निवासी महिला डॉक्टरांसोबत रात्री महिला सुरक्षारक्षकांची करण्यात येणार नेमणूक

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली आहे. या अटकेला आव्हान देऊन केजरीवाल यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने केलेली अटक चुकीची आहे, अस म्हणत तत्काळ जामीन मिळावा अशी केजरीवाल यांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT