Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, बच्चू कडू यांचं नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन, मोंथा चक्रीवादळाचे संकट, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Nagpur : नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा 

नागपुरातील मोर्च्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा रस्त्यावर झोपून सरकार विरोधी जोरदार घोषणा दिल्या.

nagpur : अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाले

बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले आहेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात आता जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर मोठा पोलीस तैनात करण्यात आलाय.

निवडणुकांवर गुणरत्न सदावर्ते यांचं राज ठाकरेंना चॅलेंज  

मतदार याद्यामधील घोळावरून विरोधकांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. विरोधकांकडून त्याबाबत मोर्चा काढला जाणार आहे. त्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राड ठाकरेंना चॅलेंज दिलंय.

पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत: पोलीस मदतीला सरसावले

पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके आणि त्यांचे पोलिस विद्यार्थ्यांच्या वतीने अतिवृष्टी मुळे.....

शेत पिकाचे नुकसान झालेल्या आत्महत्या ग्रस्त कुटुंबास 65,500 रुपयांची मदत सुपूर्त केली.

चालत्या बसमधून उडी घेत महिलेची आत्महत्या,छत्रपती संभाजीनगरमधील घटना

कन्नड ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये घडला प्रकार

राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर रोडवर गल्लेबोरगाव येथून बसलेल्या महिलेची आत्महत्या

देवेंद्र फडणवीस चोरी करून झालेले मुख्यमंत्री; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि अत्यंत संयम आणि सभ्यतेने वागले पाहिजे ही आपली परंपरा. ते असभ्य वर्तन करत आहेत. एक तारखेला मत चोरीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय मोर्चा.

संध्याकाळ सहावाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करा; उच्च न्यायालयाचे आदेश

उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच दिवाळी सुट्या दरम्यान तातडीने सुनावणी घेत आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा बच्चू कडू यांना महत्त्वपूर्ण आदेश

रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वच 59 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढवणार

आगामी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वच म्हणजे 59 जागांवर निवडणुक लढवण्याची तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे. तस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठणकावुन सांगितल आहे. त्यांनी हे आव्हान खा. सुनिल तटकरे यांना दिल आहे. आमची राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी आहे, त्यामुळे सुनील तटकरे यांनी स्वतःला स्वतःचीच राष्ट्रवादी असल्यासारख वागू नये असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

महाडमध्ये रेल्वे यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

महाड शहरात रेल्वे यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने आमरण आंदोलन सुरु केले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला ते चवदार तळे महाडमध्ये आहे. महाडमध्ये MIDC आहे मात्र रेल्वे सुविधा नसल्याने महाडचा विकास खुंटला आहे. असा आरोप करीत महाडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी रेल्वे महाडमध्ये यायला पाहिजे अशी भुमिका आंदोलनकर्ते पराग वडके यांनी मांडली आहे. खा. सुनिल तटकरे राजकारण करीत आहेत. ते महाडमध्ये रेल्वे यावी यासाठी केंद्रात आवाज का उठवत नाहीत असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला आहे.

अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयात दाखल

- एडवोकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयात दाखल

- डीसीपी प्रवीण मुंडे यांची भेट घेत देणार निवेदन

- वोट चोरी संदर्भात मविकास आघाडीने जो मोर्चा आयोजित करण्यात आलाय तो होऊ नये यासाठी निवेदन देणार

- मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार नसल्याचे सांगत तक्रार करणार

खारघर सेक्टर 7 मधील इमारतीला लागली आग

खारघर सेक्टर 7 मधील रवेची हाईट्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. खारघर अग्निशमन दलाला दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी सदर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे आग विझवन्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु असून आगीच नेमकं कारण अजून समजू शकलं नाही...

शेतकरी अप्पर तहसील कार्यालयावर चढले, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी हिंगोलीत रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन शोले स्टाईल आंदोलन केल आहे, गोरेगावच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या छतावर चढले आहेत, निवडणुकीत कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान सरकारने शंभर टक्के पिक विमा देऊन अतिवृष्टीच्या नुकसानीमध्ये वाढ करण्याची मागणी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली असून तातडीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अन्यथा आम्हाला उड्या माराव्या लागतील असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे

खारघरमधील इमारतीला भीषण आग

खारघरमधील इमारतीला लागले आग

रावेची बिल्डिंगला दुसऱ्या मजल्यावर आग लागलेली आहे

पनवेल महानगरपालिकेच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत

'काल माझ्या घरी हक्कभंगाची नोटीस आली' - सुषमा अंधारे

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी हक्कभंगाची नोटीस आणि ५० कोटींच्या दाव्याची नोटीस आली आहे. 'काल माझ्या घरी हक्कभंगाची नोटीस आली. ५० कोटींच्या दाव्याचीही नोटीस मिळाली. या दोन्ही नोटिसांचं मी सहर्ष स्वागत करते.' असं अंधारे म्हणाल्या.

रूपाली चाकणकरांचा तटकरेंनी राजीनामा घ्यावा - अंधारेंची मागणी.

सीडीआर लीक करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिले? - अंधारेंचा सवाल.

Ahilyanagar: खड्ड्यांनी घेतला तरुणाचा बळी, नागरिकांचा संताप

खड्ड्यांनी घेतला तरुणाचा बळी...

कोपरगावमध्ये नागरिकांचा संताप...

रास्तारोको करत भीक मागो आंदोलन...

नगर–मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली...

प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक...

नगर मनमाड महामार्गाची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचंड दुरावस्था...

Nashik: समाजवादी पार्टीचे भीक मागो आंदोलन

नाशिकच्या मालेगाव मधील सामान्य रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने सर्व सामान्य जनता, रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी यांनी देखील वारंवार आरोग्यमंत्री यांना औषध उपलब्ध करून देण्यासाठी मागणीचे पत्र दिले मात्र यावर कुठलाच मार्ग निघाला नसल्याने समाजवादी पार्टी कडून मालेगावच्या मोसमपूल भागात भीख मांगो आंदोलन करून येणाऱ्या पैशातून उद्या DD काढून तो आरोग्य मंत्री यांना पाठवला जाणार आहे.

Manmad: मनमाडमध्ये समाजवादी पार्टीकडून भीख मागो आंदोलन

महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री यांना समाजवादी पार्टीकडून भीख

मोसमपूल चौकात सरकारच्या विरोधात भीख मागो आंदोलन

नाशिकच्या मालेगाव मधील सामान्य रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे

यामुळे समाजवादी पार्टीचे भीख मागो आंदोलन

Nagpur: नागपुरातील जामठा स्टेडियम परिसरामध्ये शेतकऱ्यांचे रेलरोको आंदोलन

नागपूर -

नागपुरातील जामठा स्टेडियम परिसरामध्ये आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे रोखण्याच्या प्रयत्न केलेला आहे.

अनेक शेतकरी व प्रहारसे कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर आलेले आहेत.

Nanded: नांदेडमध्ये भटके विमुक्त, बलुतेदार ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड-

भटके विमुक्त, बलुतेदार ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्चात, वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाक, नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी नेते सहभागी.

नांदेडच्या नवीन मोंढा मैदानातून या मोर्चाला सुरुवात.

नांदेड शहरातील विविध मार्गाने मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

जिल्हाधिकारी कार्यालया समोर ओबीसी मोर्चाचे रूपांतर सभेत.

मोर्चात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी

Jalna: जालना जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा चिंतेत

जालना जिल्ह्यातल्या वाकुळनी, माहेर भायगावसह आसपासच्या भागात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी

परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पीक पाण्याखाली

जालना जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू;कपाशी सह सोंगणी करून ठेवलेला मका पिकाला प्रचंड तडाखा

सप्टेंबर महिन्यात याच परिसरामध्ये शेकडो हेक्टर शेतीमध्ये पाणी साचल्याने कपाशी आणि सोयाबीनचे नुकसान झालं होतं

Pune Rain: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

दुपारनंतर आज ही पावसाला सुरुवात

पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाचा जोर अधिक तर काही ठिकाणी तुरळक सरी

अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची तारांबळ

Latur: लातूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस

काही दिवसाच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, काल सायंकाळपासून जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात तुफान पाऊस झाला. विशेषता रेनापुर तालुक्यात संतधार पावसाने शेती पिकांच प्रचंड मोठं नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी रेणा नदी पात्रात वाहून गेल्यात.

Raigad: लाभाच्या वस्तू वाटपावरून रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद काही क्षमताना दिसत नाही. इंदापुर येथे शिवसेने आयोजित केलेल्या बांधकाम मजुरांना लाभाच्या वस्तु वाटपाचा कार्यक्रम रद्द झाला आहे आणि यानंतर कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीने खोडा घातला असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. हा कार्यक्रम रद्द झाल्याने लाभार्थ्यांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नाव घेत तर लाभार्थ्यांनी कोणाचही नाव न घेता हा कार्यक्रम रद्द झाल्याबाबत संताप व्यक्त केला.

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र

पुण्यातील लोकमान्य नगर मधील पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती उठवण्याबाबत पत्र

इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नसल्याचा रवींद्र धंगेकर यांनी केला आरोप

काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत असं धंगेकर यांचे म्हणणे

धंगेकर यांनी त्यांच्यात पत्रात काय म्हटलं आहे?

लोकमान्य नगर पुणे येथील महाडा वसाहत सन १९६१ ते ६२ च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे ६० वर्षापूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या वसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून सद्यस्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरावस्था झालेल्या इमारतीमध्ये राहत आहेत. या ठिकाणी ५३ इमारती असून सर्व इमारतीमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत, यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनविकास अलिम टण्यात आला आहे.

Raigad: रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादीतील वादाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना

० रायगडच्या इंदापुरमध्ये कल्याणकारी योजनांचा लाभ वितरणाचा कार्यक्रम रेंगाळला

० इंदापुर येथे शिवसेने ओयोजित केलेल्या कार्यक्रमाला लाभार्थी पोहोचले मात्र लाभाच्या वस्तु पोहचल्या नाहीत

० सकाळ पासून शेकडो लाभार्थी लाभाच्या वस्तुंच्या प्रतिक्षेत

० इंदापुर येथील कार्यक्रमावर राष्ट्रवादीने अक्षेप घेत एजंसीवर दबाव टाकल्याचीची चर्चा

Bacchu Kadu: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

जालना मंठा रोडवरील चितळी पुतळी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको....

बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे. ती शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे आंदोलन करत आहे..

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यात देखील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे...

Lasalgaon: लासलगाव परिसरात दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या

नाशिकच्या लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या शास्त्रीनगर येथे दोन मंदिरांमधील दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि चांदीच्या मूर्ती लंपास केल्याची घटना घडली आहे, श्री स्वामी समर्थ मंदिर आणि सर्वेश्वर मंदिर या दोन्ही मंदिरांतील दानपेट्या फोडून चोरट्यांनी अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे याशिवाय श्री स्वामी समर्थ मंदिराच्या कपाटातून चांदीच्या मूर्तींची चोरी केली तर सर्वेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चक्क उचलून नेत चोरी करून मंदिराच्या बाजूला शिवनदीच्या पात्रात फेकून दिली ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे मंदिर परिसरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरी करत असतांना दिसत आहेत चोरीच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे शोध सुरू केला आहे

Ngpur: नागपूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक, टायर पेटवुन रोड रोखले..

दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखला.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे.

मात्र, सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही. आज संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली आहे.

हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

धाराशिवकरांनी राजकीय अपप्रवृत्तींची काळजी करू नये- आमदार राणाजगजीतसिंह पाटील

धाराशिवकरांनी राजकीय अपप्रवृत्तींची काळजी करू नये, आपल्या अपेक्षांना न्याय मिळवून देणारच

धाराशिव शहरातील रस्ते कामाला स्थगिती दिल्यानंतर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची फेसबुक पोस्ट

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतर रस्ते कामाच्या निधीला स्थगिती

राजकीय अपप्रवृत्ती म्हणत राणाजगजीतसिंह पाटलांचा नेमका निशाणा कोणावर ?

एक शुक्राचार्य समोर आला, दोन बाकी; राणाजगजितसिंह पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट

पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर रोख असल्याची चर्चा

Manmad: मनमाड परिसरात पावसाची हजेरी

दोन दिवसांच्या विश्रांती नंतर हवामान विभागाने नाशिक जिल्यात दिलेल्या पावसाच्या इशाऱ्या नंतर आज सकाळ पासून पावसाने हजेरी लावली आहे,पहाटे काही वेळ जोरदार सरी बरसल्या नंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे,मध्यम स्वरूपात पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.तर सततच्या पावसाने बळीराजा मेटाकुटीला आलाय.

Jalgaon: जळगावच्या गिरणा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा

भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यांतील शेतीचे मोठे नुकसान

पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर, एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांकडून जेसीबीचा वापर !

मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीत मोठी वाढ, आंबेवडगाव ते डांभुर्णी दरम्यान असलेल्या गोगडी नाल्याला पूर !

गिरणा परिसरात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी !

भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पावसामुळे पूरस्थिती !

सातगाव डोंगरी आणि अजिंठा डोंगर परिसरात मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

गिरणा आणि मन्याड धरणातून विसर्ग वाढला, गिरणा नदीला पूर !

सोलापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या गळाला दोन माजी आमदार

राजन पाटील व यशवंत माने या दोन माजी आमदारांचा भाजपात होणार प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज जम्बो पक्ष प्रवेश

लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील ही भाजपात प्रवेश करणार

माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्रही भाजपच्या वाटेवर

nashik-chandvad-पुलाचा भराव गेला वाहून,ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास.

सततच्या पावसानेे आलेल्या पुरामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदर्डी - भडाणे शिवारातील पांझण पुलाचा भराव वाहून गेल्याने परिसरातील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क तुटला असून, अवघ्या एक फुटाच्या छोट्याश्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.विद्यार्थी, शेतकऱ्यांना 5 ते 8 किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

nashik-nimgaon-पावसाने विश्रांती दिल्याने पाण्यात असलेली मका गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठया प्रमाणावर शेती पिकाला बसला आहे,नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील निमगाव परिसरात झालेल्या पावसाने मका पाण्यात गेली,पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांची मजूर लावत मका गोळा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे

बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून

इचलकरंजीतील कबनूर इथ मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाइप घालून निघृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पंकज संजय चव्हाण, रोहित जगन्नाथ कोळेकर , विशाल राज लोंढे आणि आदित्य संजय पोवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या खून प्रकरणातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात अटक केली.

आम आदमी पार्टीचा राज्यातील पहिला उमेदवार जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषदांच्या निवडणुका अद्याप जाहीरही झालेल्या नाही मात्र बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पक्षाने राज्यातील पहिली उमेदवारी जाहीर केली असून बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मनीषा मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसच बुलढाण्यातील सर्व नगरपरिषदा ,जिल्हा परिषद जागा आम आदमी पक्ष लढणार असल्याची माहिती ही आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश पाटील यांनी दिली आहे. बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने या शहरात उच्चशिक्षित नागरिक मतदार असल्याने आम आदमी पक्षाला मोठे यश मिळेल अशी अपेक्षा आम आदमी पक्षाला आहे. आम आदमी पक्षाने बुलढाणा नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिल्याने आतापासूनच अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत....

सांगली... ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर..

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. माजी नगराध्यक्ष असणारे आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जयंत पाटलांकडून जाहीर करण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयंत पाटलांकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत महाघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, तर काँग्रेसची भूमिका आद्यप स्पष्ट नाही. त्यामुळे जयंत पाटलांकडून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करत निवडणुकीचे रणशिंग फुकत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील जयंत पाटलांनी यावेळी दिले आहेत.

अरबी समुद्रात तीन बोटींचा संपर्क तुटला

अरबी समुद्रात उठलेल्या वादळांमुळे मासेमारी साठी गेलेल्या तीन बोटींचा संपर्क तुटला आहे. उरण मधील न्हावा शेवा गावातील या तीन बोटी असून यावर जवळपास ५० खलाशी आहेत. कोस्ट गार्ड आणि बोट मालकांशी बेपत्ता बोटींचा संपर्क होत नसल्याने ५० खलाशांच्या जिवीताची चिंता सद्या त्यांच्या कुंटूंबियांना लागली आहे. श्री गावदेवी मरीन आणि चंद्राई नावाच्या दोन बोटी सत्यवान पाटील यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी आपल्या दोन बोटींचा अद्याप संपर्क होत नसल्याचे सांगितले आहे. कोस्ट गार्ड , नेव्ही , मत्स विभाग यांच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या बोटींचा शोध घेतला जात आहे.

गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाघोलीमधील फुलमळा भावडी रोड येथे कुटुंबासह दुचाकीवरून गवंडी काम करण्यासाठी जाणाऱ्याचे कार मधून अपहरण केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवंडी काम करणारे नवनाथ जाधव (रा. भावडी रोड) हे पत्नी, मुलासह काल सकाळी सव्वा नऊला दुचाकीवरून काम करण्यासाठी जात असताना स्विफ्ट कार चालकाने त्यांना थांबविले.

कारमधून उतरलेल्या अनोळखी व्यक्तींनी जाधव यांना जबरदस्तीने नेले. यावेळी विरोध करणारी पत्नी व मुलाला मारहाण, शिवीगाळ करण्यात आली.घडलेल्या प्रकाराबाबत पत्नी लताबाई जाधव यांनी वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार मधील तीन अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार दिली आहे.

हवामान विभागाचा इशारा, 

अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल आहे. त्यामुळे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

गेले दोन दिवस समुद्रात वादळसदृश परिस्थिती स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकां देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. वादळसदृश वातावरण असल्याने मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. देवगड बंदरात उभ्या असलेल्या नौकांचे ड्रोनच्या माध्यमातून नयनरम्य दृश्य चित्रित केलंय वैभव केळकर यांनी

समुद्रकिनाऱ्यालगत रात्रीच्या सुमारास ड्रोन उडवले

पालघरच्या पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या सातपाटी , शिरगाव , मुरबे या समुद्रकिनाऱ्यालगत रात्रीच्या सुमारास ड्रोन उडवले जात असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे . रात्री साडेअकरा ते मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पर्यंत मागील काही दिवसांपासून रोज नागरिकांना या भागात ड्रोन दिसून येत असल्याने मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीने सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . हे ड्रोन नेमकी कशासाठी उडवले जात आहेत आणि याची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का अशी विचारणा करत परवानगी आधीच प्रस्तावित जिंदाल बंदरा च्या बेकायदेशीर सर्वेसाठी हा ड्रोन सर्वे सुरू असल्याचा आरोप संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे . दरम्यान जिंदाल च्या मुरबे येथील बंदराची जन सुनावणी मागील आठवड्यातच पार पडली असताना लगेचच हा बेकायदेशीर सर्वे कसा सुरू करण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे . तर असे ड्रोन दिसून आल्यास त्वरितच पोलीस प्रशासनाला माहिती देण्याच आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पश्चिम किनारपट्टीवरील ग्रामस्थांना करण्यात आलय . मात्र असं असलं तरी या ड्रोन सर्वे मुळे सध्या स्थानिकांकडून बंदर विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जातोय.

nashik-nimgaon-पावसाने विश्रांती दिल्याने पाण्यात असलेली मका गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठया प्रमाणावर शेती पिकाला बसला आहे,नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील निमगाव परिसरात झालेल्या पावसाने मका पाण्यात गेली,पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांची मजूर लावत मका गोळा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे

संतधार पावसामुळे रेणापूर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

लातूरच्या रेनापुर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाल आहे, काढून ठेवलेल्या शेती पिकासह नागरिकांच्या घरात पाणी गेल आहे, तर तालुक्यातील गरसुळी येथे उत्तम कांबळे यांना पावसामुळे घर पडल्याने मोठे नुकसान झालं आहे , तर तिकडे रेनापुर शहरात देखील नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने, घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि त्यांना कर्जमुक्त करावा या मागणीला घेऊन प्रहार नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या हजारो समर्थक आणि शेतकऱ्यांसह काल नागपुरात धडक दिली आहे. हैदराबाद - जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून त्यांनी बंद पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकतील अशी चेतावणी बच्चू कडू यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त वाढविण्यात आला असून एकंदरीतच परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप या आलेलं आहे.

nashik-chandvad-अतिवृष्टीने जनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर,पावसाने शेतात सडला चारा.

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी मकाचा चारा काढता आला नाही तर काही ठिकाणी काढून ठेवलेला चारा सुरक्षितस्थळी हलविता न आल्याने चारा शेतात भिजून सडू लागला आहे.त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. आधीच अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिके वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून ,आता चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने पशुधन कसे जगवावे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.

जालना जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पावसामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या

जालना जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.या पावसामुळं रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. पावसाचे हस्त नक्षत्र संपल्यावर बळीराजा ज्वारीची पेरणी करत असतो मात्र जिल्ह्यात हस्त नक्षत्रातच पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू,हरभऱ्याची पेरणी झालेली नाही. या पावसामुळे रब्बीची पेरणी लांबल्याने पुढील रब्बी हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. मागील सात दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून खरिपातील कपाशी पिकाचं देखील अतोनात नुकसान झालं आहे..

चार दुचाकी चोरणारे दोघेजन जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

धाराशिव जिल्ह्यातील कळंब मधुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जेरबंद केल आहे.त्याच्याकडुन एक लाख 55 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी देखील ताब्यात घेतल्या आहेत.या चोरीच्या दुचाकी विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी अर्जुन साहेबराव काळे,नितीन विश्वास शिंदे या चोरट्यांना ताब्यात घेतले अन्य साथीदारांचा पोलिसांकडुन शोध सुरू करण्यात आला आहे.

आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ओबीसीचा महा एल्गार मोर्चा.

02 सप्टेंबर रोजी शासनाने काढलेला जीआर रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी ओबीसीचा महाएल्गार मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.

अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल

अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यात धुमाकुळ घातल्यानंतर आता मागील सात दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. या पावसामुळं शेतकऱ्याच वेचणीला आलेलं पांढर सोन शेतातच भिजून काळवंडू लागलंय. यामुळ जालना जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडलाय.जालन्यातील अनेक शेतकऱ्यांचा वेचनीला आलेला कापूस शेतातच भिजत असल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. भिजलेला कापूस या शेतकऱ्यांना कमी दराने बाजारात विकावा लागणार आहेत. एकीकडे जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे तर आता शेतकऱ्यांना कमी दराने कापूस बाजारात विकावा लागणार असल्याने दुहेरी फटका बसत आहे

रब्बीसाठी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 10 हजार रुपये मिळणार

यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चार लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे या सोबतच रब्बी हंगामातील पेरणी करिता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 584 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुणे म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

२० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

त्यामुळे इच्छुकांना घर खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे

सुधारित वेळापत्रकानुसार अर्जांची संगणकीय सोडत आता ११ डिसेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार

२० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत

दिनांक २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल

MAVAL : मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

मावळ तालुक्यातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, आणि राष्ट्रीय काँग्रेस या पाच पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे.. या आघाडीचा उद्देश स्पष्ट आहे, मावळ तालुक्यातील सत्तेवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रभावाला पर्याय उभा करणे. या नव्या आघाडीने ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अशा सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पक्षाची ताकद ज्या भागात आहे त्याला तिकीट देऊन निवडणूक लढविणार आहे. दरम्यान विकासाच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी पाणीपुरवठा रस्ते आणि शिक्षण या सर्व क्षेत्रातील समस्यावर आता एकत्रितपणे लढा उभारला जाईल. आमचे विचार वेगवेगळे असले तरी  मावळचा विकास करणे हेच आमचे ध्येय धोरण आहे..

PUNE | ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच, धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच, धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

१३ पानी अहवालासमवेत ४३१ पानांचे कागदपत्रे अहवालात जोडले

पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग येथे १४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे.

ट्रस्टने बांधकाम व्यावसायिकास जागेची विक्री करण्यास परवानगी मागताना केलेल्या अर्जात या मंदिराचा उल्लेख केला नाही, असा आक्षेप ‘जैन बोर्डिंग बचाव कृती समिती ने केला होता

ट्रस्ट जागेच्या आवारात जैन मंदिर आहे का, याची पाहणी करून २७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्तांना दिले होते. 

सह धर्मादाय आयुक्त यांनी अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला असून, त्यामध्ये बोर्डिंगच्या जागेत भगवान महावीर यांचे मंदिर असल्याची खातरजमा केली आहे

PUNE | कोरोना काळात आयसीयू बेडची संख्या वाढविणाऱ्या अधिकारी आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त

कोरोना काळात आयसीयू बेडची संख्या वाढविणाऱ्या अधिकारी आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त

आयएएस अधिकारी पवनीत कौर यांची आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

सध्याचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांची सात महिन्यामध्ये राज्य सरकारने केली बदली

पवनीत कौर या २०१४ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हापरिषदेच्या मुख्य अधिकारी, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त, अमरावतीच्या जिल्हाधिकारी, भूवैज्ञानिक सर्वेक्षण व विकास संस्थेच्या संचालकपदी काम केले आहे. त्या पुण्यातील यशदामध्ये उपसंचालक या पदावर कार्यरत होत्या

प्रदीप चंदन यांची मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) प्रकल्प अधिकारी म्हणून बदली

NASHIK : चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्यूनर गाडी पलटी

सुरत वरून शिर्डी कडे साईबाबाच्या दर्शनाला येत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव रायते शिवारात अपघात झाला आहे.

NAGPUR : आंदोलनामुळे रस्ता जाम असतांना रुग्णवाहिकेला मात्र आंदोलकांनी वाट मार्ग काढून दिली

आंदोलनामुळे रस्ता जाम असतांना रुग्णवाहिकेला मात्र आंदोलकांनी वाट मार्ग काढून दिली..

शेतकरी आक्रमक झाले आहे....सातबारा कोरा झाल्याशिवाय निघणार नाही,  अशी भूमिका शेतकरी यांनी घेतली आहे...

रत्नागिरीत ९ नोहेंबर पर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आलाय.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला गेलाय.अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा आदेश दिलाय.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

लव्ह स्टोरीचा भयंकर अंत! तरुणाची निर्घृण हत्या; मुलीचा बाप अन् भाऊ हाती लागला अन् गूढ उकललं

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

SCROLL FOR NEXT