Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र पाऊस, हवामान अपडेट्स, दिवाळी, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Thane : माजी सैनिक दत्तात्रय अर्जुन उतेकर ठरले वर्ल्ड मास्टर्स इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वविजेते 

ठाण्याचे रहिवाशी आणि फक्त 66 वर्षीय माजी सैनिक दत्तात्रय अर्जुन उतेकर वर्ल्ड मास्टर्स इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वविजेते ठरले. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या २०२५ वर्ल्ड मास्टर्स इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ६६ किलो गटात दत्तात्रेय अर्जुन उतेकर वर्ल्डविजेते ठरले .

अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर असणार आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरात पाऊस

मुंबई पूर्व उपनगरात परतीच्या पावसाने पुन्हा लावली हजेरी लावली.

विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, पवई परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस

मुंबईतील पश्चिम उपनगरात कांदिवली बोरिवली परिसरात जोरदार पाऊस

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा

कांदिवली बोरिवली परिसरात मागील पंधरा मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

Devendra Fadnavis : राजभवनात 'मोदीज मिशन' पुस्तकाचं प्रकाशन 

राजभवनात 'मोदीज मिशन' पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी दर्शवली.

कन्नडला टोमॅटो दोन रुपये किलो व्यापाऱ्यांकडून लूट

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उगवलेला टोमॅटो केवळ दोन ते तीन रुपया किलो दराने विकला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवार चार वाजेच्या सुमारास अचानक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

रायगडच्या माणगावमध्ये कोसळल्या पावसाच्या सरी

रायगडमध्ये परतीच्या पावसाचा जोर कमी होत नसून माणगावमध्ये आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गेली चार दिवस परतीच्या पाऊस सरी कोसळत असल्याने भातपिकच्या कापणीत अडचणी निर्माण होत असल्याने येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे.

भंडाऱ्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील काही भागात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला. सध्या भातपीक कापणी आणि माळणीचा हंगाम सुरू आहे. अशात लाखांदूर तालुक्यात परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतात कापून ठेवलेल्या भातपीक कडपा आणि मळणी केलेले धान सुखवायला ठेवलेले धान अचानक आलेल्या पावसात भिजलेत. अचानक परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी आता पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहेत.

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

कर्डिले कुटुंबीयांची सांत्वन पर घेतली भेट..

भाजपा आमदार कर्डीले यांच सात दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने झाले होतें निधन....

पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

बाजूला असलेल्या दुकानाला देखील आगेचा फटका

टायरचं व गॅरेज दुकान जळून खाक

कुठलीही जीवितहानी नाही

मुख्य पनवेल अग्निशमन दलाला आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश

महिला डॉक्टर यांनी पोलीस उपाधीक्षकांना लिहिलेले पत्र "साम टीव्ही"च्या हाती

महिला डॉक्टर यांनी पोलीस उपाधीक्षकांना लिहिलेले पत्र "साम टीव्ही"च्या हाती

पोलिसांकडून महिला डॉक्टर यांच्यावर होता दबाव

आरोपीला रुग्णालयात आणलं की पोलिसांकडून अहवाल प्राप्त व्हावा यासाठी होता दबाव

डॉ यांनी पोलीस उपअधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात केली होती तक्रार

डॉ यांनी प्रथम या सर्व प्रकरणाची तक्रार पोलिस निरीक्षक महाडिक यांना केली होती

पोलिस निरीक्षक यांच्याकडून डॉक्टर यांना उडवा उडवी चे उत्तरे

पत्रात तीन पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे

वंचितचा मोर्चा हा निवडणूकीसाठी स्टंटबाजी : आरएसएस

वंचितचा हा मोर्चा निवडणूकी च्या तोंडावर राजकिय स्टंटबाजी असल्याची टीका स्वयंसेवकांनी केली आहे.पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले असताना आरएसएस कार्यालयावर मोर्चा म्हणजे निव्वळ राजकिय स्टंटबाजी असल्याची टीका स्वयंसेवकांनी केली आहे.

हिंगोलीत मुसळधार पावसाचा हाहाकार

हिंगोलीत तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरील पावसाचे पाणी हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात साचल्याने पूर परिस्थिती सारखे चित्र निर्माण झाले होते तर हिंगोली बस स्थानकाच्या परिसरात अशोक चव्हाण व मेघना बोर्डीकर यांच्या स्वागताचे पोस्टर्स वादळी वाऱ्याने कोसळल्याची घटना घडली आहे दरम्यान यामध्ये कुणालाही इजा झाली नाही मात्र वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती तर शहरातील रस्त्यांवर देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच पाहायला मिळालं

दिवाळीच्या सुट्टीनंतर जिल्हा परिषदेत शुकशुकाट

दिवाळीच्या सुटी संपल्या असून आज कार्यक्यालयीन कामकाजाचा दिवस आहे .. मात्र बुलढाणा जिल्हा परिषदेत धक्कादायक प्रकार म्हणजे कोणताही अधिकारी कर्मचारी कर्तव्यावर हजर नाही.. मोजकेच कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचे दिसले ..त्यामुळे जिल्हा परिषद सहा परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला .. बुलढाणा जिल्हा परिषदेत 16 विभागाचे अंतर्गत 650 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी काम करतात , मात्र आज दिवाळी सुटी संपल्यावर ही आज कार्यालयीन दिवस असताना जिल्हा परिषदेत काम करणारे कोणीच नाही . माहितीनुसार काही अधिकारी कर्मचारी सुटीचा अर्ज देऊन गेले आहे, मात्र ज्यांचा सुटीचा अर्ज नाही त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे ..

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई करावी विजय कुंभार यांची पंतप्रधानांकडे मागणी

पुण्यातील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील अनियमितता आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाबाबत चौकशी करून कारवाईची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विजय कुंभार यांनी केली आहे.

Ahilyanagar News : पाथर्डीत बैलाच्या हल्ल्यात लहान मुलगा झाला जखमी

पाथर्डी शहरातील साईनाथ नगर भागात सुमित कळसकर ही व्यक्ती आपल्या गाडीवर लहान मुलांना घेऊन जात असताना अचानक एका बैलाने त्यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात त्या व्यक्तीसह त्याच्यासोबत असलेल्या चिमुकल्यालाही बैलाने लक्ष्य केले.

मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करत बैलाला हाकलून लावले.

मात्र बैलाच्या या हल्ल्यात छोट्या मुलाला दुखापत झाली असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे.

Nashik News : नाशिकमध्ये आशा वर्करवर ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

निफाड तालुक्यातील कानळदच्या आशा वर्करचा ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

१८ ऑक्टोबरला ड्युटी दरम्यान घडला संताप जनक प्रकार

आशा वर्कर यांनी दिवसभर गर्भवती महिलांना देवगाव, निफाड आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्याची सेवा बजावली

रात्री परतताना ॲम्बुलन्स चालकाने केलेल्या गैरवर्तनाची तक्रार

आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेचा निषेध, आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी.

महिला आरोग्यसेवकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी.

आशा वर्कर समाजाच्या आरोग्यरक्षक असून त्यांचा सन्मान आणि सुरक्षितता धोक्यात

घटनेमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह

Pandharpur : मंगळवेढा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच आमने सामने येणार

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज रंगे पाटील हे एकत्र येणार आहेत

हा कार्यक्रम 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे दुपारी एक वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे भोस,ले पालकमंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे आदी उपस्थित राहणार आहेत.

Panvel Blast News : पनवेल मधील सेक्टर ४ मध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

नविन पनवेल मधील सेक्टर ४ मध्ये आग

सिलेंडर चा स्पोट झाल्याने बंगल्यामध्ये आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पनवेल अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल.

आगीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

आग विझवण्यात आली आहे

Satara News : डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल

डॉक्टर आत्महत्या प्रकरणी २ जणांवर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यातील एक व्यक्ती हा पोलिस उपनिरीक्षक असून दुसरी खाजगी व्यक्ती आहे

संबंधित पोलिस उपनिरीक्षक हे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत

संबंधित पोलिस उपनिरीक्षक हे फरार असल्याची माहिती

यातील दुसरी व्यक्ती ही पोलिस विभागातील नसल्याची माहिती

Kalyan News : कल्याणमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात राडा

दिवाळीच्या उत्साहात कल्याणच्या चिकणघर परिसरात काल उशिरा रात्री फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे.

फटाके फोडण्यास विरोध केल्याने वाद वाढत गेला आणि पाहता पाहता रस्त्यावरच हाणामारी झाली.

या झटापटीत काही जणांनी एकमेकांवर कुंड्या फोडल्याचीही व्हायरल व्हिडिओत समोर आले आहे.

Pune: दिवाळीत पुणे शहरात आगीच्या ६८ घटना

यंदाच्या दिवाळीत पुणे शहरात विविध ठिकाणी आगीच्या तब्बल 68 घटना घडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी छोट्या आणि मोठ्या स्वरूपाच्या आग फटाक्यांमुळे लागलेल्या होत्या. अग्निशामक दलाने वेळीच यावर नियंत्रण आणलेले होते. दिवाळीत लागलेल्या आगीमुळे कुठेही मोठे दुर्घटना घडली नसून जीवितहानी ही झालेली नाही.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट....

अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात....

सातपुडा परिसरात गेल्या एक तासांपासून पाऊस...

परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता...

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता

मंगळवेढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील येणार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता

26 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण...

भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी दिले जरांगेंना यांना ही निमंत्रण.....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जारंगे पाटील एकाच व्यासपीठावर येणार असल्याने मंगळवेढ्यातील कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष...

Satara: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत वंजारी समाज आक्रमक

संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबाबत वंजारी समाज आक्रमक

सातारा प्रकरणा बाबत वंजारी समाज आक्रमक

गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302 चा गुन्हा दाखल करावा

तिने सांगूनही तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे.

जय भगवान महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला

Satara: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे  आदेश

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

दोन्ही पोलिसांचे निलंबन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

० कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना वाहतूक कोंडीचा फटका

० कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी

० माणगाव शहर ते तिलोरे फाटापर्यंत वाहनांच्या रांगा

० दिवाळी सुटीसाठी चाकरमानी आणि पर्यटक निघाले कोकणात

० वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कोंडीचा फटका

० पुण्याहून येणाऱ्या रोडवर देखील ४ किलोमीटरच्या रांगा

Akkalkot: अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांची आलोट गर्दी

दिवाळी सुट्टी निमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांची आलोट गर्दी

- दिवाळीच्या सुट्ट्या निमित्त अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची मोठी गर्दी

- महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आणि तेलंगणातून हजारो भाविक अक्कलकोट मध्ये दर्शनासाठी दाखल

- वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरात पहाटेपासूनच लांबच लांब रांगा

- दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोट मंदिरे ट्रस्टच्या वतीने विशेष दर्शनाची सोय

- शनिवार, रविवारच्या निमित्ताने आणखी भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता

Dahisar: दहिसरमध्ये महिला टोळीकडून दुकान ताब्यात घेण्यासाठी व्यवसायिकावर हल्ला

दहिसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एस. व्ही. रोडवरील जय अंबे माता मंदिरासमोर असलेल्या दीपक इंटरप्रायझेस या दुकानावर मालवणीहून आलेल्या महिलांच्या टोळीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० ते २० महिलांचा गट दुकानात घुसला आणि तिथे उपस्थित व्यक्तीवर हल्ला करून व्यवसायिकाला मारहाण केली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दुकानावर जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न कोणी आणि का केला, याचा तपास पोलीस सुरू आहेत.

जिल्हा बँक अध्यक्षाला महायुतीवर बोलण्याचा अधीकार काय? राजन तेलींचा सवाल

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत युती होणार नाही हे बोलण्याचा अधिकार जिल्हाबँक अध्यक्षाला नाही असा टोला नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी लगावला आहे. स्वताला जिल्हापरिषद उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्हाबँक अध्यक्षांनी अशी स्टेटमेंट करू नये. तो अधिकार जिल्हाध्यक्ष व जिल्हाप्रमुखांचा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष जर बोलत असतील युती होणार नाही तर ठीक आहे मात्र

अजून महायुतीच्या बैठकाच झाल्या नाहीत तर कोणीही उठून स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत असेल तर ते चुकीच असल्याचा टोला ही राजन तेली यांनी नितेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या जिल्हाबँक अध्यक्ष मनिष दळवी यांना लगावला आहे.

Nanded: नांदेडमध्ये राबवला एक दिवा बळीराजासाठी उपक्रम

नांदेडमध्ये राबवला एक दिवा बळीराजासाठी उपक्रम

मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिर परिसर निघाला उजळून.

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीतून शेतकऱ्याला उभारी मिळावी यासाठी घालण्यात आल साकडं.

Kolhapur: ऐन दिवाळीमध्ये गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

कोल्हापूर -

ऐन दिवाळीच्या सणांमध्येच गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

पाच ते सहा चोरट्यानी मध्यरात्री दुकानांचे शटर उचकटून मारला रोख रकमेवर डल्ला

अनेक दुकानांमध्ये व्यापाऱ्यानी ठेवलेली रक्कम घेऊन चोरटे पसार

दुकानाचे शटर उचकटत असताना पाच चोरटे सीसीटीव्ही कैद

Nashik: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई, भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

नाशिक -

- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई - विशेष मोहिमेत अनेक फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई

- भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम, आठ प्रमुख स्थानकांवर तपासणी

- भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिकरोड, खंडवा, अकोला, बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी

- ९४८ बिनतिकीट आणि अनियमित प्रवाशांवर कारवाई

- कारवाईत तब्बल ६.६६ लाखांचा दंड वसूल

Amravati: अमरावतीच्या मोर्शी कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ 

अमरावती -

मोर्शी कृषी कार्यालयात शासकीय कर्मचारी आढळून आला मृतदेह

आज संध्याकाळी 8 वाजता मोर्शी येथील कृषी कार्यालयात विनोद राऊत कनिष्ठ लिपिक या कर्मचारी मृतदेह आढळून आला असून, शरीरावर घाव असल्याने मर्डर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी मोर्शी पोलीस दाखल झाली असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.

Ratnagiri: मुंबई- गोवा महामार्गावर शोधावी लागतेय सावली, 16 वर्षात 20 टक्केच वृक्ष लागवड

रत्नागिरी -

मुंबई -गोवा महामार्गावर शोधावी लागतेय सावली

महामार्गावर 16 वर्षात 20 टक्केच वृक्ष लागवड

रत्नागिरी जिल्ह्यात 99 हजार झाडांच्या लागवडीचं उद्दिष्ट

केवळ 9 हजार रोपांची झालीय लागवड

16 वर्षात जिल्ह्यात चौपदरीकरणाचं 85 टक्के काम पूर्ण

पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात 68 हजार झाडांची झाली होती कत्तल

पळस, वड, पिंपळ, आंबा अशा विविध जातीच्या झाडे जमीनदोस्त झाल्याचा सर्वेक्षण समितीचा अहवाल

त्यामुळे महामार्गावरचा प्रवास होतोय भकास

वृक्ष लागवडीबाबत ठेकेदारही उदासीन

Pune: पुण्यातील  शनिवारवाड्यावर किन्नर समाजाने केलं आंदोलन

पुणे -

शनिवारवाड्यावर आता किन्नर समाजाने केलं आंदोलन

शनिवार वाड्याच्या गेटवर किन्नर समाजाने गोमूत्र आणि गंगाजल टाकून केला निषेध

मुस्लिम महिलांच्या नमाजनंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आता किन्नर समाजाने गोमूत्र आणि गंगाजल टाकून केला निषेध

मुस्लिम महिला वाड्याच्या आत नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवार वाड्यावर किन्नर समाजाने केलं आंदोलन

Sangli: राजे विजयसिंह डफळे हे डफळे घराण्याचे वंशज

सांगली -

राजे विजयसिंह डफळे हे डफळे घराण्याचे वंशज

राजे विजयसिंह डफळे हे जतचे राजे होते.. तसेच कारखान्याचे ही संस्थापक होते..

कर्नाटक आणि जत भागामध्ये त्यांचं घराण्याला मानलं जातं होते.

2010 मध्ये शेतकऱ्यांना आणि दुष्काळी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कारखाना सुरू केला होता.

Pune: आजपासून पुढील २ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे -

आजपासून पुढील २ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई, पुण्यासह कोकणातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील काही भागात पुढील २ दिवस पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर यासारख्या जिल्ह्यांना येलो अलर्ट

नागपूर, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा २ दिवस राहणार पावसाचे

हवामान शास्त्रज्ञांकडून अंदाज व्यक्त

Pune: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

पुणे -

रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी वापरलेल्या गाडीबद्दल रवींद्र धंगेकर यांनी केला खुलासा

महापौर असताना मोहोळ यांची गाडी एका बिल्डरच्या नावाने असल्याचं केलं ट्विट

गाडीचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धंगेकर यांनी केली मोहोळ यांच्यावर टीका

Nashik: पुढील ३ दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट

पुढील ३ दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट जाहीर केलाय.

आजपासून ३ दिवस हा अलर्ट देण्यात आलाय.

मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.

यामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी येणारे ३ दिवस मात्र नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांसाठी एकच औषध निरीक्षक

यवतमाळ जिल्ह्यात औषध विक्री दुकानांची संख्या दोन हजारांवर आहेत तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन खात्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी असून जिल्ह्यात एकही औषधी निरीक्षक कार्यरत नाही,दोन्ही पदे रिक्त असून सहाय्यक आयुक्त औषधी यांच्याकडे अमरावती विभागाचा कारभार सोपविण्यात आलाय त्यामुळे दोन हजार औषध दुकानांची तपासणी करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT