Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र पाऊस, हवामान अपडेट्स, दिवाळी, आज भाऊबीज, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune : कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

निवडणुकांच्या तोंडावर अनेकदा राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणले जाते. अशा परिस्थितीत, अतुल खूपसे पाटील यांचा हा उपाय कार्यकर्त्यांना दिलासा देणारा आणि सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे संदेश देणारा ठरत आहे.

या संदर्भात अतुल खूपसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, "शेतकरी आणि वंचित घटकांसाठी आवाज उठवल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्याची भीती नेहमीच असते. या आधुनिक साधनांचा वापर करून आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि सत्य लोकांसमोर ठेवू."

अतुल खूपसे पाटील यांच्या या अभिनव उपक्रमामुळे, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकजण या पद्धतीचे कौतुक करत असून, इतर कार्यकर्त्यांनाही यामुळे प्रेरणा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Pune News : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेल्या महिला भाविकांना भाऊबीजच्या निमित्ताने 10 रुपयांची नोट भेट

पुण्यासह राज्यात आज भाऊबीजेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय. याच निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक महिला भाविकेला ओवाळणी म्हणून १० रुपये देण्यात येतायत.

दिवाळीच्या निमित्ताने सकाळपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. दरवर्षी यंदा सुद्धा श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट कडून सकाळपासून हा उपक्रम राबवण्यात येत असून महिला सुद्धा ही ओवाळणी घेण्यासाठी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करताना दिसतायत.

Beed : जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार, मुंडे भावंडांना मराठवाड्यातून आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे.

मराठवाड्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे.. या निवडणुकीत मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याचा दावा बाळासाहेब सानप यांनी केला आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे असे हे बाळासाहेब सानप यांनी म्हटले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती जागावर जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना एक प्रकारे आव्हान आहे

Nashik News : भाऊबीजेच्या दिवशी मनमाड मध्ये रंगली रेड्यांची टक्कर

दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मनमाड शहरातून संध्याकाळी रेड्यांना सजवून त्यांची गवळी समाजाकडून मिरवणूक काढली जाते.त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी गवळी समाज व दुध उत्पादक विक्रेते यांच्या कडून रेड्यांच्या झुंजीच आयोजन केले जाते.

वर्षभर रेड्याला खाऊ घातल्या नंतर त्याची किती ताकद आहे हे आजमावण्यासाठी या टकरींचे आयोजन केले जाते.यात जो रेडा टक्कर जिंकतो त्याच्या मालकाला सन्मानित केले जातो.

गेल्या अनेक वर्षां पासून मनमाड शहरात ही परंपरा गवळी समाजाकडून पाळली जात असून रेड्यांची झुंज पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी

माणगाव शहर ते खरवली फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा

दिवाळी सुट्टीसाठी चाकरमानी आणि पर्यटक निघाले कोकणात

वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कोंडीचा फटका

पुण्याहून येणाऱ्या रोडवर देखील 4 किलोमीटरच्या रांगा

Thackeray Brothers : भाऊबीजेनिमत्त ठाकरे बंधू एकत्र बहिणीच्या घरी दाखल

भाऊबीज सण हा भाऊ बहिणीसाठी महत्त्वाचा सण मानला जातो

भाऊबीजेनिमत्त ठाकरे बंधू एकत्र बहिणीच्या घरी दाखल झाले आहेत

Sambhajingar : RSSवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने निदर्शने

आरएसएसवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने निदर्शने सुरू

क्रांती चौकात विविध आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनाकडून निदर्शने

धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आरएसएस अग्रेसर असल्याचा आरोप

Raigad News : आदिवासी भगिनींकडून मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेची ओवाळणी

भाऊबीजेच्या सणानिमित्ताने आज मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांना ओवाळणी केली. पारंपरिक रितीरिवाजानुसार करण्यात आलेल्या या ओवाळणी कार्यक्रमात भगिनींनी आपल्या हातांनी मंत्री गोगावले यांना तिलक लावून आरती करून ओवाळणी केली.

या वेळी आदिवासी भगिनींनी परतबागेतील केळी आणि विविध भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली. मंत्री भरत गोगावले यांनीही या भगिनींच्या प्रेमळ भावनेचा सन्मान करत त्यांच्या सुखसमृद्धीची शुभेच्छा दिल्या.

गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू, असा विश्वास यावेळी मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. ग्रामीण आणि आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द त्यांनी दिला.

Shirdi News : शिर्डीत बोगस मतदारांचा आकडा 15 हजारांपर्यंत जाईल - बाळासाहेब थोरात

संगमनेर मतदारसंघाच्या ग्रामीण भागात साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर विखे पाटलांनी थोरात यांच्यावर टीका करत या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हंटले होते.

बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा मतदार यादीतील घोळाबाबत नवा दावा करत संगमनेर शहरातील आकडा जोडला तर बोगस मतदारांची संख्या 15 हजारांपर्यंत जाऊ शकते असा आरोप केलाय.

निवडणुकीत घोटाळे घालण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाने आणली असून मतदार याद्यांमधील घोळ हा त्यातलाच एक फंडा असल्याचे म्हंटले आहे.

Jalna News : जालन्यात बंजारा समाजाचा 7 दिवसापासून आमरण उपोषण

हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी जालना शहरात मागच्या सात दिवसापासून विजय चव्हाण या बंजारा समाज बांधवाचं आमरण उपोषण सुरू आहे.

मागच्या काही दिवसापासून राज्यभरात एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला.प्रशासनाकडून मागण्या संदर्भात कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे बंजारा समाज बांधवांतर्फे 25 तारखेला जालन्यामध्ये जेलभरो आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी दिली आहे.

Beed News : आमदार सुरेश धस यांची हजारो वंचितांसोबत दिवाळी साजरी

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांचे कुटुंबीय गेली पाच पिढ्यान् पासून दिवाळी सण हा वंचित बांधवांना सोडत साजरा करत आहेत. हिच धस कुटूंबांची परंपरा आज हि आमदार सुरेश धस यांनी सुरू ठेवली आहे. काल दिपावली पाडवा निमित्त आपल्या आष्टी येथील निवासस्थानी हजारो वंचित बांधवांना सोबत दिवाळी साजरी केली आहे.

यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले की पालावरील ज्या व्यक्तींच्या जिवनातील अजून पहाट झालीच नाही आशा व्यक्तीनं सोबत दिवाळी साजरी करत आहे. शेतकऱ्यांच्या धैयाला सलाम करायला हवा आहे, मोठ्या धैयाने शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली आहे.

100 टक्के नाही पण थोडयाफार शेतकऱ्यांच्या खात्यात लक्ष्मी पूजनाला पैसे झाले आहेत आणि होतात पण असं आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.

Pune News : फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरलेल्या कोल्ह्याचा महामार्गावर अपघात

दिवाळीच्या सणामुळे गावागावांत फटाक्यांचा आवाज सुरू असतानाच, काल रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खुटवड वस्ती परिसरात एक जखमी कोल्हा आढळून आला.

प्राथमिक अंदाजानुसार, दिवाळीच्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कोल्हा घाबरून गावातून बाहेर पळत आला आणि महामार्गावर आल्यावर वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला.

Hingoli:  स्वबळाचा नारा दिलाय आता फेरबदल नाही, शिवसेना नेत्याचं मोठं विधान 

हिंगोली -

हिंगोलीत स्वबळाचा नारा दिलाय आता फेरबदल नाही

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आदेश मिळाल्यानंतरच निर्णय घेतला

शिवसेना जिल्हा परिषद, पंचायत आणि नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवणार

आचारसहिता लागणे आधीच हिंगोलीत भाजप शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात

Mumbai: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

मीरा भाईंदर -

काशिमीरा परिसरात मोठी दुर्घटना गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

ग्रीन व्हिलेज बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर घडली धक्कादायक घटना.

घर बंद असताना गॅस लिकेजमुळे संपूर्ण घरात भरला गॅस...

तरुणीने दरवाजा उघडून लाईट लावल्यावर झाला स्फोट तरुणी मोठ्या प्रमाणात झाली जखमी दवाखान्यात केले दाखल

फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरु आहे.

Sangli: आमदार गोपीचंद पडळकरांनी साजरी केली भाऊबीज

सांगली-

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केला.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीकडुन भाऊबीज साजरी केली.

बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर याना पारंपरिक पद्धतीने औक्षण करत भाऊबीज साजरी केली यावेळी दोघा भावा बहिणीचे अतूट नाते दिसून आले.

Kalyan: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

फक्त ५० रुपयांच्या खंडणीसाठी आरोपीचा दुकानदारावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला!

हल्लेखोर सराईत गुन्हेगार; एमपीडीएखाली दीड वर्ष तुरुंगात राहून नुकताच सुटलेला आरोपी पुन्हा सक्रिय!

Ratnagiri: सलग आलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरूवात

रत्नागिरी -

सलग आलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरूवात

रत्नागिरीती हॉटेल्स, रिसॉर्टस पर्यटकांनी हाऊसफुल्ल

पर्यटकांची किनारपट्टी भागातल्या हॉटेल्स, रिसॉर्टसला सर्वाधिक पसंती

कर्दे, हर्णे, गुहागर, गणपतीपुळे, तारकर्ली, मुरुड किनारपट्टीवरची हॉटेल्स फुल्ल

Pandharpur: अकलूजमध्ये म्हशी पळवण्याची शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली

अकलूजमध्ये म्हशी पळवण्याची शर्यत

दिवाळीच्या निमित्ताने अकलूजमध्ये म्हशी पळवण्याची शर्यत मोठ्या उत्साहाने पार पडली.

येथील गवळी समाजाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

अकलूजचे माजी सरपंच शिवतेज मोहिते पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

Nagpur: दिवाळीच्या सुट्टयात विद्यार्थीनीसाठी अंशकालीन न्यायालयाने सुनावणी घेत दिला दिलासा

नागपूर -

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिवाळीच्या सुट्टयात विद्यार्थीनीसाठी अंशकालीन न्यायालयाने सुनावणी घेत दिलासा दिला.

- जातपडताळणी समिती विरोधात असलेला दावा मान्य करत तात्पुरता दिलासा दिला...

- विद्यार्थिनी पल्लवी घरत हिची जात माना असून ती अनुसूचित जमातीमध्ये मोडते...

- अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तिला तात्पुरता प्रवेश देण्यात आला होता.

- मात्र माना अनुसूचित जमातीच्या जातीचा दावा जात पडताळणी समितीने फेटाळला...

- कागदपत्रे प्राप्त करताना तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने प्रवेश रद्द होण्याच्या मार्गावर होता.

- या विरोधात विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.

- उच्च न्यायालयाने तिच्या प्रवेशाला संरक्षण प्रदान देत दिलासा दिला... प्रवेश होण्यापासून संरक्षण मिळालं..

Nagpur: गोंदिया नगर परिषदच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टात आव्हान, 2 याचिका झाल्या दाखल

नागपूर -

- गोंदिया नगर परिषदच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टात आव्हान, 2 याचिका झाल्या दाखल

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल

- याचिकेत अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप

- या संदर्भात विशाल अग्रवाल अशोक चौधरी आणि जहीर नाजीर अहमद यांनी एक तर शकील हमीद मंसुरी यांनी एक अशा दोन याचिका करण्यात आल्या दाखल

- 12 नोव्हेंबर ला होणार अंतिम सुनावणी, न्यायालय नेमका काय निर्णय घेतात, याकडे लक्ष...

Nagpur: नागपूरची हवा प्रदूषित, दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकाने 204 चा टप्पा गाठला

नागपूर -

- नागपूरची हवा प्रदूषित, दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकाने 204 चा टप्पा गाठला

- हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीच्या पावलावर नागपूरचे पाउल

- नागपूर मधील सिव्हिल लाईन्स परिसर सर्वाधिक हिरवळ असलेला परिसर असताना सुद्धा या परिसरातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत पोहोचली

- या शिवाय शहरातील इतर भागातील देखील हवेची गुणवत्ता श्रेणी खराब वर राहिली

Kolhapur: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश 

कोल्हापूर -

नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने पुढच्या २० दिवसांत सादर करा

हाय पावर कमिटीचे नांदणी मठ आणि संबंधितांना निर्देश

नांदणी मठ,हाय पवार कमिटी, वनतारा आणि पेटा यांच्या डॉक्टरांच्या कमिटीने 31 ऑक्टोबरला वनतारा मध्ये जाऊन महादेवी हत्तीन जॉइंट इन्स्पेक्शन करण्याची ही दिले निर्देश

महादेवी संदर्भात आज हाय पॉवर कमिटी समोर झाली सुनावणी

29 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

Washim: वाशिममध्ये गोदामात साठवून ठेवलेले सोयाबीन जळून खाक

वाशिममध्ये गोदामात साठवून ठेवलेले सोयाबीन आगीत जळाले

वाशिम शहरातील पाटणी चौकात असलेल्या एका गोडाऊनमध्ये शेतातील काढनी नंतर साठवून ठेवलेल्या चाळीस क्विंटल सोयाबीनला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडलीये.

शॉर्ट सर्किटमूळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होतीये.

आगीची माहिती मिळताच वाशिम नगरपालिकेचे अग्निशमन दल एका बंबासह घटनास्थळी दाखल झाले होते.

आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत होते मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे..

Mumbai: फटक्यांमुळे चारकोप सेक्टर- 2 मध्ये इमारतीला आग

चारकोप सेक्टर- 2 मध्ये इमारतीला आग

फटाक्याच्या आतषबाजीमुळे लागली आग

अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

Navi Mumbai: भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने अतिवृष्टी भागात दिवाळी किटचे वाटप

नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने अतिवृष्टी भागात दिवाळी किटचे वाटप

म्हात्रे यांच्या सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात सात लाख रुपयाच्या दिवाळी किटचे वाटप

Wardha: वर्धाच्या शिवाजी महाराज चौकात अडीच हजार दिव्यांनी साकारले शिवलिंग 

वर्धा -

- वर्धाच्या शिवाजी महाराज चौकात अडीच हजार दिव्यांची आरस

- अडीच हजार दिव्यांनी साकारली चौकात शिवलिंग

- 'एक दिवा शिवभक्तांचा, शिवकन्यांचा आपल्या जाणता राजासाठी' या घोषवाक्य खाली उपक्रम

- मागील पाच वर्षांपासुन सुरु आहे उपक्रम

- वर्धा विभाग मोहीम अंतर्गत कार्यक्रम

- कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती

- पहिल्या वर्षी पाचशे दिवे लावत करण्यात आली होती उपक्रमाची सुरवात, पाचवा वर्ष असल्याने अडीच हजार दिव्यांची आरस

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करूत देण्यात आला जयघोष

Nashik: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, पाडव्याच्या रात्री निघाली रेड्यांची मिरवणूक

नाशिक -

- नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला

- पाडव्याच्या रात्री नाशिकमध्ये निघाली रेड्यांची मिरवणूक

- पारंपरिक रेड्यांच्या मिरवणुकीतही उलटलं नाशिक पोलिसांच्या कारवाईचं प्रतिबिंब

- मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी सुरू आहे राजकीय गुन्हेगारांविरोधात पोलिसांची ऑपरेशन क्लीन अप कारवाई

- नाशिककरांकडून होतंय पोलिसांच्या कारवाईचं स्वागत

- नाशिकच्या पारंपरिक रेड्यांच्या मिरवणुकीत रेड्यांना सजवतांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा संदेश देण्यात आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Kuchipudi Dance History: 'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, भाऊबीज साजरी करण्यासाठी जयजयवंती यांच्या घरी पोहचले; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT