मुंबईच्या भायखळा मदनपुरा येथील ग्राउंड प्लस एक मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात एकूण सात जण जखमी देखील झाले आहेत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे सध्या अग्निशमन दलाकडून या ठिकाणी डेब्रिज उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
अंधेरी कडून वांद्रे च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात झाला. मागील पाऊण तासापासून मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांकडून अपघातग्रस्त गाडी बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ऐन दिवाळी सणाच्या काळात आज मनमाड सह आजू बाजूच्या परिसरात अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या गड गडा सह सुमारे अर्धातास जोरदार पावसाने हजेरी लावली,अचानक झालेल्या पावसाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
दहिसर पूर्व अंबावाडी परिसरात फटाका फोडण्यावरून संजय जायसवाल नावाच्या व्यक्तीला 10 ते 12 जणांनी एकत्र येऊन मारहाण केली. या हल्ल्यात जायसवाल यांचा नाकाचा फ्रॅक्चर झाला असून चार टाके घालावे लागले आहेत.
जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, घटनेची माहिती दिल्यानंतरही दहिसर पोलिसांनी एनसी (गैर-गुन्हा नोंद) दाखल न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात....
नंदुरबार शहरासह परिसरात पाऊस....
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात....
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील धडगाव आणि काकडदा परिसरात पाऊस.....
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ...
मदनपुरा परिसरातील फनुसवाला बिल्डिंग वेल्फेअर असोसिएशनच्या इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी कोसळला. ही इमारत ग्राउंड प्लस एक मजली असून पहिल्या मजल्याचा काही भाग कोसळल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीने लेव्हल-१ कॉल जाहीर केला.
घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व पालिकेचे कर्मचारी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत एकूण सात जण जखमी झाले असून, त्यापैकी दोन जण — गुलाम रसूल (२४) आणि मोहम्मद सय्यद (५९) — यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित पाच जखमींना भाटिया रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
नांदेडच्या कलदगाव येथे संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी बांधवांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी, 'आवश्यक वस्तू कायदा 1955 रद्द करणे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आहे. यासह, रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खते, बियाणे आणि औषधे माफक दरात उपलब्ध करून देणे, तसेच कृषी प्रयोग शाळा प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऐन दिवाळीत राहणार विरुद्ध कडू हा वाद भेटला असून राणाविरुद्ध कडू हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून बच्चू कडू यांना डिवचलं आहे. बच्चू कडू हा चिल्लर आहे याला मी नखांनापासून केसापर्यंत ओळखतो त्याचा एकच नारा आहे बाप बढा ना भैया सबसे बडा रुपय्या असे म्हणत रानांनी बच्चू कडू यांना सुनावल्याच पाहायला मिळत आहे.
बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप...मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात आजही जपली जातेय १५५ वर्षांची प्रथा.
वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील व्यक्तीला किल्ल्यात हिंदी भाषिक सुरक्षारक्षकाने फोटो आणि शूट करायलाच अडविले असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
सुरक्षा रक्षकाने छत्रपतीना किल्ल्यात अडवायचे नाही.. तुम्हाला मराठी बोलता येत नाही आणि तुम्ही मराठी माणसांना, छत्रपतीना अडवतात असा संतप्त सवाल ही छत्रपतींच्या पोशाख परिधान केलेल्या व्यक्तीने केला आहे
वसईच्या किल्ल्यात जोडपे येतात, मद्यपी फिरतात त्यांना तुम्ही अडवत नाहीत, आणि मराठ्यांच्या किल्ल्यात आम्हाला तुम्ही अडवतात असा सवाल ही केला आहे..
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन
१०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बुधवारी सकाळी चिटणीस या चे पुण्यात निधन झाले
इस्रोच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी १९७० च्या दशकापासून केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दशकात देशात खेडोपाडी टीव्ही पोहचले
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केलं. यावेळी वसंत मोरे यांनी एक फ्लेक्स घेऊन त्यावर "देवा आता तूच आमच्या अण्णाला माफ कर" असे लिहित आंदोलन केले. यामध्ये देवा हा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वापरला असल्याचं या फ्लेक्समधून स्पष्ट होत आहे. सध्या पुण्यातील जैन बोर्डींग असतील संदर्भातील विषयाबाबत महाविकास आघाडी कडून मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जोरदार टीका होत आहे.
ऐन दिवाळीत लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा येथे शेतकऱ्यांनी चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला आहे, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पॅकेज जाहीर केलं मात्र खात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नाही, शेतकऱ्याच्या घरात अंधार आहे, तर सरकार फसव आश्वासन देत दिवाळी साजरी करत आहे . दरम्यान आज बलिप्रतिपदा, म्हणजे बळीराजाचा दिवस आणि याच दिवशी शेतकऱ्याला चटणी भाकर खाण्याची वेळ सरकारने आणली आहे म्हणत, लातूर जहीराबाद महामार्गावर मसलगा येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी चटणी भाकर खात सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नाशिक -
- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक
- नाशिक विकास प्राधिकरणाच्या कारवाईला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून उपोषणाला सुरुवात
- अनेक स्थानिकांची घरं आणि दुकानं रुंदीकरणामध्ये जात असल्याने स्थानिक आक्रमक
- शासन भरपाई देणार की नाही, याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम
- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी गावाजवळ आंदोलनाला सुरुवात
रायगड -
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
दिवाळी सुट्टी करिता पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाच्या दिशेने निघाल्याने कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली
मुंबई -गोवा महामार्गावरील माणगाव, खरवली फाटा अणि मुगवलीपर्यंत वाहनांच्या रांगा
नाशिक -
- नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस
- पंचवटीतील अवधूत वाडी भागात वाहनांची तोडफोड
- दारू पिऊन आलेल्या टवळखोरांनी दुचाकींची तोडफोड करत घातला धिंगाणा
- घटनेचा थरार स्थानिकांनी केला मोबाईलमध्ये कैद
- नाशिकमध्ये पोलिसांकडून टवाळखोरांची धरपकड सुरू असतानाही टवाळखोरांचा धुडगूस कायम
शिरपूर बसस्थानक परिसरात पावसाचे साचले पाणी
जैन समाजाची काशी असलेल्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमध्ये काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अचानक आलेल्या या पावसामुळे शिरपूर बसस्थानक परिसरात आणि मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय.
तर काही ठिकाणी चिखल आणि घाण साचल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून,नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नाले स्वच्छ करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे.
सोलापुरात संभाजी आरमार संघटनेची स्मशान सेवेकऱ्यांसोबत दिवाळी साजरी
सोलापुरात संभाजी आरमार संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.
सोलापूर शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र काम करणाऱ्या स्मशान सेवेकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना फराळ, सुगंधी तेल, उटणे, साबण, साडी, टॉवेल, ब्लॅंकेट आदी साहित्य भेट देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा संभाजी आरमार च्या वतीने आज देखील जोपासली जातेय.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील तळा - गाळातील माणसाच्या सेवेचा सन्मान केला होता तोच शिव-विचारांचा धागा संभाजी आरमार जोपासत असल्याच यावेळी सांगण्यात आल.
सातारा -
महाबळेश्वरच्या वेण्णालेक येथे अडकलेली बोट सुखरूप बाहेर काढण्यात पालिका प्रशासनाला यश
स्वतः पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्यासह टीमकडून बचावकार्य
पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास
पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल झालाय.
आज या गुळाचे मुहुर्ताचे सौदे कोल्हापूरच्या बाजार समितीत निघणार आहेत.
यासाठी मोठ्या प्रमाणात ताजा गूळ मार्केट कमिटी मध्ये दाखल झाला आहे.
यावर्षीच्या गुळाला नेमका किती भाव मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
बुलडाणा -
खामगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव आणि परिसर केलाय स्वच्छ
दीपावली च्या दिवशी तलाव परिसर केलाय स्वच्छ..
नव संकल्प फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम..
पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम सर्वत्र पहायला मिळतेय.
पुण्यातील सारसबाग मध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली.
सारसबागमध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून गर्दी झाली होती.
नागपूर -
- काल लक्ष्मीपूजनाच्या निमित्याने शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले
- मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध रस्त्यावर पडलेला फटाक्यांचा कचरा साफ केला
- शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवाळीत दिलेल्या योगदानासाठी त्यांचं कौतुक केलं जातंय
माहूरगडावर दीपोत्सव लक्ष्मीपूजन संपन्न
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर माहूरगडावर मोठी गर्दी
श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
भंडारा -
गजबजलेल्या वस्तीतील घराच्या बाथरूममध्ये शिरली अस्वल
भंडाऱ्याच्या पवनी शहरातील घटना
वन विभागाच्या पथकानं केलं शिताफीनं जेरबंद
नाशिक -
- लक्ष्मीपूजनाला लक्ष लक्ष दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघालं नाशिक
- शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी
- दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने प्रकाशपर्वात उजळला नाशिकचा आसमंत
- नाशिकमधील या प्रकाशपर्वाची ड्रोन दृश्य टिपली आहेत, सिद्धेश सरोदे यांनी
पुणे -
पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह
दिवाळी पाडवा निमित्त सारसबागेत मोठी गर्दी
दिवाळी पाडव्याचा निमित्ताने तरुणाईचा मोठा उत्साह
सारसबागेतील तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी
पुणे -
पुण्यातील तळ्यातील गणपतीच्या आरतीसाठी लोटला जनसागर
पुण्यातील सारसबाग येथील गणपतीच्या आरती चा मोठा उत्साह
गणपतीच्या आरतीला तरुणाईची मोठी उपस्थिती
तरुणाई कडून गणपती बाप्पा मोरयाचा गजर
पुणे -
- लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फर्निचर दुकानाला भीषण आग
- पुण्यातील राजगुरुनगर शहरातील घटना
- शॉक सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
- घटनास्थळी राजगुरुग्नगर परिषदेची अग्निशमन दल दाखल
- आज आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
- आगीत लाखोंचे फर्निचर जळाल्याचा अंदाज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.