Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 20 नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, बिहार सरकार स्थापन, दिल्ली स्फोट अपडेट, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, महायुती, महाविकास आघाडी राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Bihar Government: बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत

ते या सोहळ्यासाठी पाटण्याला रवाना झाले आहेत

ते सुमारे अडीच तास पाटण्यामध्ये राहतील

बिहार निवडणुकीत आदित्यनाथ यांनी ३१ सभा घेतल्या

योगींनी ज्या ज्या जागांवर सभा घेतल्या त्यापैकी २७ जागांवर एनडीए उमेदवारांनी विजय मिळवला

Nanded:  क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना

नांदेड -

क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना

विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे जोरदार आंदोलन

Nashik: नाशिकच्या मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक -

मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद

अप्पा शिंदे यांच्या मळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर

वन विभागाकडून लावण्यात आला होता पिंजरा

याच बिबट्याने यापूर्वी या भागातील अनेक कुत्रे केले होते फस्त

अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या झाला जेरबंद

मोरे मळा परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास ..

Pune: रुपाली ठोंबरेंनी माधवी खंडाळकर यांना पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

पुणे -

रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकर यांना पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

रूपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद पेटणार

१० कोटींची नुकसान भरपाई देण्यासाठी पाठवली कायदेशीर नोटीस

काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांच्या बद्दल माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट लिहिली होती

त्यावरून दोघींमध्ये बराच वाद झालेला होता

यावरूनच आता रुपाली पाटील यांनी खंडाळकर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे

Kolhapur: चुटकीवाल्या भोंदू मंत्रीकाच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची छापे

कोल्हापूर -

चुटकीवाल्या भोंदू मंत्रीकाच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची छापे

चुटकीवाला भोंदू मांत्रिक वाई मध्ये असल्याचं कळताच सातारा आणि वाई इथं कोल्हापूर पोलिसांचे छापे

रात्री उशिरा कोल्हापूर पोलिसांनी मारले छापे

पोलीस येणे अगोदरच चुटकीवाला बाबा गायब पोलिसांची शोध मोहीम सुरू

चुटकी वाजवून भूत काढणाऱ्या मांत्रिकाचा साम टीव्हीने केला होता पर्दाफाश

Amravati: सुर्जी नगरपरिषदमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी दोन जणांना दिले एबी फॉर्म

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषदमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी दोन जणांना दिले एबी फॉर्म

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईने निवडला गोंधळ.

प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवकाच्या सर्वसाधारण जागेसाठी भाजपाने दोन उमेदवारांना दिले होते एबी फॉर्म..

सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता भाजप कडून एबी फॉर्म....

सचिन जायदे यांचा उमेदवारी अर्ज ठरवला अवैध त्यामुळे अजय पसारी यांची उमेदवारी कायम..

Ahilyanagar: शिर्डी शहरातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

अहिल्यानगर -

शिर्डी शहरातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार

माऊली नगर भागातील बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत बिबट्यांचा मुक्तसंचार बनला चिंतेचा विषय

शिर्डी शहरातील उपनगरात पिंजरा लावावा, नागरिकांची मागणी

Pune: खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

पुणे

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी मोहोळ यांची गडकरी यांच्याशी चर्चा

नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, याबाबत दोघांमध्ये मध्ये चर्चा

अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर बैठकीतील मुद्द्यांबाबत सुद्धा मोहोळ यांनी दिली गडकरी यांना माहिती

Nagpur:  सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त भाजप युवा मोर्चातर्फे पदयात्रा

नागपूर -

- सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त भाजप युवा मोर्चातर्फे पदयात्रा

- नागपूर, जयपूर, मुंबई आणि दिल्ली या देशाच्या प्रमुख शहरांमध्ये नजीकच्या राज्यातील युवा येणार एकत्र.

- युनिटी मार्च मध्ये देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातील चार युवा सहभागी होणार असून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्याचा नेतृत्वात निघणार यात्रा.

- नागपूर मधून चारशे युवक वाहनाने मध्यप्रदेश मार्गाने गुजरातला जाणार आहेत. यात्रेत विविध उपक्रमही राबवले जाणार.

Nagpur: नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी

नागपूर -

- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी

- विधानसभेच्या एक जुलै 2025 च्या मतदार यादीवर आधारित असणार यादी

- 27 नोव्हेंबर पर्यंत ही यादी मनपाच्या झोन कार्यालयात तसेच मनपाच्या संकेतस्थळावर असणार उपलब्ध

- नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला प्रशासकीय वेग, पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा आराक्षण मर्यादा ओलांडल्यानं याचिकेत काय निर्णय लागतो यामुळे धाकधूक वाढली आहेय...

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 61 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपल

यवतमाळ जिल्ह्यात 61 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपल

यवतमाळ जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात 61 हजार हेक्टवर पेरणी झाली

यामध्ये हरभरा,गहू,मक्का,जवस आणि ज्वारीच्या पिकाचा सर्वाधिक समावेश आहे

येत्या काही दिवसात हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात हरभरा लागवडीचे आणि गव्हाचे क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Nashik Tourism : ट्रेकर्सनी आवर्जून भेट द्यावा असा नाशिकमधील ट्रेकिंग पॉइंट, हिवाळी ट्रिपसाठी परफेक्ट

Renuka Shahane : 'तेव्हा आईची खरी किंमत कळते...', रेणुका शहाणेंनी सांगितले आईचं महत्त्व, पाहा VIDEO

Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

Lemon Water Benefits: सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या, शरीरात होतील जबरदस्त बदल

SCROLL FOR NEXT