मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे परिसरात मोठी वाहतूक कोंडी
वाकण ते कोलेटी परिसरात 3 ते 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
कोकणाकडून मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत भीषण स्फोट झालाय. हा स्फोट इतका भीषण आहे की 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती
उद्या १२ वाजता राज ठाकरे यांचा कल्याण दौरा
मनसे उमेदवारांच्या कार्यलयाला भेट देत घेणार कार्यकर्त्यांच्या बैठका
कल्याण पश्चिम साई चौक ,बेतुरकरपाडा ,संतोषी माता रोड वरील मनसे उमेदवारांच्या कार्यलयाला भेट देणार
राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र उमेदवारांवर वाढते हल्ल्यांच्या घटना पाहता चिंतेचे वातावरण पसरलंय. मालाडमध्ये एका अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना घडलीय.
मुंबईच्या भांडुपमध्ये वॉर्ड क्रमांक 114 मध्ये राज ठाकरे हे राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी आले असता त्या ठिकाणी मनसेमधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनिशा माजगावकर यांनी राज ठाकरे यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच शिवसैनिक आणि मनसैनिक हे राज ठाकरे यांची वाट पाहत होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
पीएमसी आणि पीसीएमसीमधील ढासळत्या नागरी पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांचा वाढता असंतोष ओळखून, ही मोहीम शहरातील पाण्याच्या टँकरपासून ते वाहतुक कोंडीपर्यंतच्या नागरिकांच्या रोजच्या संघर्षावर केंद्रित आहे, केवळ नागरिकांची गैरसोय नाही तर महापालिका यंत्रणा अपयशी ठरल्याचा इशारा या मोहिमेतून देण्यात आलेला आहे.
राज्यातील इतर महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टींचा मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा
तर महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले ते पहा म्हणजे मुख्यमंत्र्यांच मराठी प्रेम कळेल, राजू शेट्टी यांचा मराठी माणसाच्या प्रेमावरून मुख्यमंत्र्यांना टोला
पुण्यातील नागरी समस्यावर बनवले गाणे
राष्ट्रवादी काँग्रेसच विशेष अभियान
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अभियान
१ नळाद्वारे दररोज पाणी
२ ट्रॅफिकमुक्त, खड्डेमुक्त पुणे पिंपरी चिगवड
३ नियमित स्वच्छता
४ हायटेक आरोग्य सुविधा
५ प्रदूषणमुक्त पुणें पिंपरी चिंचवड शहर
अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अंबरनाथ मध्ये भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची अभद्र युतीबाबत राज्यात चर्चा
या युती नंतर काँग्रेस तर्फे 12 नगरसेवकांचे निलंबन होणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर खळबळ
- मध्य नागपूर मधील "भारत माता चौक"वरून तो रोडशो सुरू करण्याचे नियोजन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मध्य नागपुरात असणार मेगा रोड शो
- भारतमाता चौक...ते महाल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा असणार रोड शोचा मार्ग...
- भारत मातेपासून शिवराय पर्यंत असा संदेश या रोड शो रॅलीतून देणार..
- संघ मुख्यालय असलल्या प्रभागातून देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो असणार...
सोलापूर-
मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत भाजपा नेत्यांची तक्रार
चुकीचे कागदपत्रे जोडून सिद्धी वस्त्रे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याची भाजपा नेते सोमेश क्षीरसागर यांची तक्रार
सिद्धी वस्त्रे ह्या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्ष झाल्याने संपूर्ण राज्यात त्यांची चर्चा झाली
नंदुरबार -
संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील मनोरुग्ण, विजय चौधरी यांची जहरी टीका
संजय राऊत राऊत हा नमाजी आणि पाच वेळा वाजणारा भोंगा....
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना एखाद्या चांगल्या मनोरुग्ण तज्ज्ञाला दाखवावे...
उद्धव ठाकरे यांना हे शक्य नसेल तर राऊत यांच्या उपचाराचा आणि रुग्णालयाचा संपूर्ण खर्च भाजप उचलण्यास तयार ...
सततच्या वक्तव्यामुळे संजय राऊत यांची मानसिक स्थिती खालावली....
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका
हर्षवर्धन सपकाळ हे सपकाळ नसून महाराष्ट्रासाठी साप आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची सपकाळ यांची लायकी नाही
काँग्रेस नेत्यांनी आयुष्यभर टक्केवारी चे राजकारण करून महाराष्ट्राची तिजोरी लुटली
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली मर्यादा ओळखून टीका करावी.अन्यथा जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही विजय चौधरी यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना इशार
अजित पवारांचं शिवसैनिकांना घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन
गुरुवार पेठेत शिवसैनिक अजित पवार यांच्या रोड शो ची वाट पाहात थांबले होते
शिवसैनिकांचा पुण्यात अजित पवारांना नमस्कार
शिवसेना कार्यालयाबाहेरून अजित पवार जात असताना घडला प्रकार
पुण्यात सात दरोडेखोरांना आंबेगावमध्ये अटक
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांची कारवाई
आंबेगाव खुर्द येथील दरी पुलाच्या खाली दरोडा टाकण्याच्या तयारीत बेकायदा एकत्र जमलेल्या सात जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली
- भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत
- नागपुरी तर्री पोहा आस्वाद घेत देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत
- उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता स्वागत लॉन येथे तर्री पोहा with देवाभाऊ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅपिड फायर राउंडमध्ये जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देणार
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद आहे
सूर्य आणि चंद्र सोडून सर्वच आश्वासन या जाहीरनाम्यातून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिले आहेत
नेहमीच असे आश्वासन देण्याची सवय आमदार पाटील यांना आहे
तळोदा शहरातील मराठा चौक परिसरात मध्यरात्री घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाढे कुटुंबातील दोन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
घरातील सदस्य गाळ्यात गाढ झोपेत असताना ही घटना घडली.
धनशक्तीविरोधात जनशक्तीची लढाई
भाजपकडून डावलल्याने रूपाली चौधरी थेट अपक्ष रिंगणात
ज्येष्ठ वैद्यकीय डॉ. अवधूत चौधरी यांनी अखेर महायुतीविरोधात घेतला बंडाचा झेंडा
जळगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगतदार
संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सभेचे पहिले टीझर रिलीज.. महापौर हा भाजपचाच बनणार असे टीचर मधून करण्यात आले हायलाईट.. फडणवीसांची होणार सभा.. सभेसाठी भाजपने केला टिझर लॉन्च
ऐन निवडणुकीच्या काळात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का
अंधेरीत मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचा भगवा घेतला हाती
मुंबई महानगरपालिका निवडणुक प्रचार रंग चढला असतानाच मनसेतून इतर अन्य पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ता शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे अंधेरीत मनसेची ताकद कमी झाली आहे
4 ते 5 दिवसापूर्वी मनसेचा अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता
यानंतर अंधेरीत मोठ्या संख्येमध्ये आज मनसेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे...
मात्र या पक्षप्रवेशामुळे अंधेरीतील शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांच्या मताधिक्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता
पतीने दुसऱ्या पक्षातून उमेदवारी दाखल केल्याने नागपुरात एका सुशिक्षित प्राध्यापक महिलेने चक्क माहेरी जाणे पसंत केले. ही वार्ता ताजी असतानाच चंद्रपुरात मात्र एकाच कुटुंबात पती-पत्नी दोन पक्षात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यांनी घरातच महाविकास आघाडी केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्थात एकमेकांविरोधात नव्हे. मात्र एमइएल प्रभाग क्रमांक तीन या एकाच प्रभागात दोन वेगवेगळ्या पक्षांकडून लढत असलेले हे पती-पत्नी चर्चेचा विषय ठरले आहेत. या एम ई एल प्रभाग 3 मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत लोमेश उईके तर त्यांच्या पत्नी बेबीताई उईके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर अध्यक्ष याच प्रभागातील एका दुसऱ्या जागेतून रा. काँ. शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. दोघांचाही प्रचार जोरात सुरू आहे. कुणी कुठून लढावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून कुटुंबावर काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची चिन्ह दिसू लागली आहे.माजी मंञी तानाजी सावंत यांनी भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता राणाजगजीतसिंह पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत असून,“काय म्हणताय धाराशिव? या टॅग लाईन खाली आमदार सावंत यांच्यावर त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून देत टीका केली जात आहे.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काही जुन्या वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेत भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची मोहीम उघडली आहे.
“हाफकिन कोण आहे?”असा प्रश्न आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी विचारला होता त्याचप्रमाणे,“महाराष्ट्राला भिकारी करीन,पण मी भिकारी होणार नाही”या वादग्रस्त वक्तव्याचा ही आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडिया वरती उल्लेख केला जात आहे.
“काय म्हणताय धाराशिव?”या टॅगलाईनखाली भाजप कार्यकर्ते आणि समर्थक तानाजी सावंत यांच्यावर टीका करत आहेत.काही पोस्टमध्ये सावंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे,तर काही पोस्टमध्ये थेट राजकीय आरोप करण्यात येत आहेत
या सगळ्या प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजप यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रोडशो
पुण्यातील गोखले नगर परिसरातून सुरू होणार रोडशो
कुसळकर चौकातून रोडशोला सुरुवात
सावरकरांना मानत नाहीत, तर अजित पवारांना दूर करा, असा राऊत म्हणाले.
- गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, गोंदियाचे आजचे तापमान 7.6 अंश सेल्सियस
- सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचे तापमान राज्यात सर्वात कमी
- विदर्भात थंडीची लाट, अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशांवर
- यवतमाळ मध्ये 9.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद
- उत्तर भारतात थंडीची लाटेचा परिणाम विदर्भावर
- पुढील तीन दिवस थंडी कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर शहरातून शंभर टक्के पुसल्या जातील , अस विधान केलं होतं दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे, तर विलासरावांचे मूळ गाव असणाऱ्या बाभळगाव मध्ये देखील सकाळपासनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय. यावेळी बाभळगाव मधील नागरिक यांनी रवींद्र चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला
नांदेडच्या किनवट तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय.सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिली येथील ही घटना घडली आहे. विक्रम सुरेश मर्शेटवार (वय ३०) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा शिवाजी विक्रम मर्शेटवार अशी मयत बापलेकांची नावे आहेत. राजेश दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा काही वेळातच प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी भवानी मंडपात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन घेतलं यावेळी शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांनी जाहीरनामा अंबाबाई चरणी विधिवत पूजा करून अर्पण केलाय. यावेळी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे 600 रुपयांची तर मागील पंधरा दिवसांत तब्बल 1 हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहे त्याला कारण लासलगावसह देशांतर्गत विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे याशिवाय बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणात सुरू आहे तसेच अरब देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे या सर्व परिस्थितीचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील बाजार समित्यात झालेल्या 20 लाख क्विंटल आवक मागे अंदाजे 175 ते 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, कांद्याला जास्तीतजास्त 2200 रुपये, कमीतकमी 700 रुपये तर सरासरी 1625 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे सतत कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्याने भविष्यात उन्हाळ कांदया प्रमाणे या लाल कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे कठीण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात असून, राज्य व केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जास्तीतजास्त कांदा परदेशात कसा निर्यात होईल यासाठी लक्ष देण्याची मागणी केली कांदा निर्यातदारांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली अन् प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे थेट गुन्हाही दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या कर्मचाऱ्याने मनपा आयुक्तांना पत्र पाठवून, गुन्हा दाखल केल्याने बदनामी झाली आहे. माझ्या जिवाला काही धोका झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी मूलचंद आलासिंग राठोड हे ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने त्यांची स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्ती केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत दारूची वाढती मागणी पाहता सहा जणांच्या टोळीने धुळ्याहून जीवघेण्या बनावट दारूची तस्करी सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू विकणाऱ्या सहा तरुणांना अटक करत कैलासनगर, शहागंजमधील घरांतून दारूच्या १२४८ बाटल्या जप्त करण्यात आला. महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. कमी पैशात दारूविक्री करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली. टोळीकडील दारूच्या काही बाटल्या मिळवल्यानंतर त्यात अतिशय घातक अशी बनावट दारू असल्याचे निष्पन्न झाले.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाकडून लातूर महानगरपालिकेत मोठी ताकद लावण्यात येत आहे, आजच्या काही दिवसापासून लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक भाजपच्या बडे नेत्यांची ये-जा वाढली आहे, दरम्यान आज लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा होणार आहेत,
- माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला शिवसेना प्रवेश
- ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये इन्कमिंगला सुरुवात
- भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी नितीन भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये केला होता प्रवेश
- मात्र ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्यानं नितीन भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
- नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल, प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघड
- प्रभाग क्रमांक १ मधील भाजप उमेदवार वीरेंद्र कुकरेजा ठरले सर्वाधिक श्रीमंत, कुकरेजांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता ₹ 94 कोटी 94 लाखांहून अधिक
- वार्षिक उत्पन्न ₹ 6 कोटींहून अधिक व्यवसायाने व्यापारी, उच्च माध्यमिक, २०१७ मध्ये कुकरेजांची संपत्ती होती सुमारे ₹ 16 कोटी' नऊ वर्षांत तब्बल ₹ 78 कोटींची वाढ
- कुकरेजांचे प्रतिस्पर्धी सुरेश जग्ग्यासी एकूण मालमत्ता ₹ 3 कोटी 14 लाख
- महिला उमेदवारांमध्येही कोट्यधीशांची प्रभाग १० ‘क’ मधून वैशाली चोपडे आघाडीवर,। वैशाली चोपडे यांच्या कुटुंबाची संपत्ती ₹ 58 कोटी 13 लाख
- काँग्रेस उमेदवार सीमा डवरे कुटुंबाची संपत्ती ₹ 1 कोटी 37 लाख
- प्रभाग 23 मधील राष्ट्रवादी (शरद पवार गट) दुनेश्वर पेठेंच्या संपत्तीत घट
- पेठेंची मालमत्ता ₹ 13.91 कोटींवरून घसरून ₹ 12.49 कोटींवर, पेठेंवर ₹ 1.24 कोटींचे कर्ज,
- भाजप उमेदवार नरेंद्र बोरकरांची मालमत्ता वाढली नरेंद्र बोरकरांची संपत्ती ₹ 2.40 कोटींवरून आता ₹ 5.17 कोटींवर
- मनपा निवडणुकीत विकासासोबतच उमेदवारांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकीचे फोन केल्याचा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घाटी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्यावर आरोप केले होते. त्या प्रकरण डॉ. शिवाजी सुक्रे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मुख्य मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत दानवे यांच्या तक्रारीबाबत पुरावे आणि कागदपत्र सादर करण्यासाठी, तर डॉ. शिवाजी सुक्रे यांना अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपावर खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
राज्याच्या गृह विभागाने सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेले आलिशान महिला विश्रांती कक्ष चक्क पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या उपयोगासाठी ताब्यात घेत पोलीस स्टेशन मध्येच महिलांच्या अधिकारावर गदा आणली आहे, स्थानिक बीड जमादार व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी महिला विश्रांती कक्षा मधून आपला कारभार चालवत आहेत, विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील एक नव्हे तर चार ते पाच पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा गंभीर प्रकार सुरू आहे
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं उपचार दरम्यान दुखत निधन झाले... कालं दुपारी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. रात्री उशिरा हल्ला करणाऱ्याला अखेर अटक झाली होती. हल्ला करणार्या तरुणाचं नाव उबेद पटेल असं आहेय.. उबेद पटेल हा 24 मे 2019 मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहाळा गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहेय. 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होतीय. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होतेय. काल दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर हिदायत पटेल मोहाळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असतांना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय. पटेल यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आलेय.
सांगली महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू आहे.भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदारांच्या पत्नी आणि सून देखील रस्त्यावर उतरल्या आहेत.
मिरजेच्या प्रभाग 7 मधील भाजपा उमेदवार बानू जमादार,गणेश माळी,दयानंद खोत आणि उज्वला कांबळे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे आणि सून रसिका खाडे यांनी पदयात्रा काढत उमेदवारांसोबत नागरिकांच्या भेटीगाठी देखील घेतले आहेत.प्रभागात केलेल्या विकासाच्या मुद्दावर भाजपा उमेदवारांकडून निवडणूक लढवण्यात येत आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी अमरावतीत टीका केली... अख्या सोलापूरला प्रणिती शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं होतं सोलापूरच्या मध्यच्या सीटवर काय केलं ते सोलापूरला माहित आहे... एका मुसलमानाचा बळी देऊन शिवसेना उबाठाची सीट गमावून भाजपला सरळ सरळ मदत करण्यात आली असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.... प्रणिती शिंदे जसं बोलतात त्यावर मी काहीच बोलणार नाही.. पण निवडणुका संपल्यावर त्या कुठे जातील हे जग बघून ठरवेल असा दावा त्यांनी केला.... प्रणिती शिंदे ह्या काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील असा दावा सुजात आंबेडकर यांनी केला होता त्या दाव्यावर ते ठाम आहेत...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.