Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील दुकानाला लागली आग

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 5th january 2025 : आज मंगळवार, दिनांक ७ जानेवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, संतोष देशमुख हत्या प्रकरण, चीनमध्ये नवा विषाणू, राज्यात थंडी परतली, हवामानात बदल, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Thane : घोडबंदर रोडवरील एका दुकानाला लागली आग

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कापूरबावडी पेट्रोल पंपसमोर पुलाखाली एका दुकानाला आग लागली आहे.

आगीमुळे पुलावरील वाहतूक आणि आसपासच्या दुकानांना धोका निर्माण झाला आहे.

अग्निशन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण करण्याचे काम सुरु आहे.

Manoj Jarange Patil : परळी, नांदेडनंतर आता हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात हिंगोलीत गुन्हा दाखल.

ओबीसी समाजाने पोलीस स्थानकात दोन दिवसांपूर्वी ठिय्या मांडत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.

परळी, नांदेडनंतर आता हिंगोलीमध्ये जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल.

धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे निलंबित - राज्य सरकारचा निर्णय

शासकीय कामात कसूर केल्याप्रकरणी व आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी डव्हळे यांचे निलंबन झाले.

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी यांनी डव्हळे यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना पाठवला होता.

विभागीय आयुक्त मार्फत शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावावर सरकारचा निर्णय.

भुसंपदनाची कामे प्रलंबित ठेवणे, वकीलांना अपमानास्पद वागणुक देणे, कारणे दाखवा नोटीसीला उत्तर न देणे अशा अनेक होत्या तक्रारी.

Pune : बांधकामाच्या ठिकाणी खोदलेल्या डक्टमध्ये पडली महिला

पुण्यातील कर्वेनगर परिसरातील घटना.

संध्याकाळी ७ वाजता झाला अपघात.

बांधकामाच्या ठिकाणी डक्टमध्ये पडून महिला जखमी.

अग्निशमन दलाने महिलेला डक्टमधून सुखरु बाहेर काढलं.

C. Shambhaji Nagar : राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली छत्रपती संभाजीनगरमधील ऑनर किलिंग घटनेची दखल

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली छत्रपती संभाजीनगरमधील ऑनर किलिंग घटनेची दखल. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रशासनाच्या डीजीपीला आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा केल्या सूचना.

Pune : पुण्यातील नामांकित IT कंपनीत महिलेवर कोयत्याने वार

पुण्यातील महिलेवर हल्ला, सहकाऱ्याने केले कोयत्याने वार

येरवडा भागातील नामांकित आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला

मारेकरी महिलेचा सहकारी, पोलिसांनी केली अटक

Santosh Deshmukh Case : धनजंय देशमुख मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत.

Pandharpur : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा रक्षक कंपनीला दणका

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा रक्षक कंपनीला दणका

मंदिर समितीला सुरक्षा आणि मनुष्य बळ पुरवठा करण्याचा ठेका केला रद्द

कंपनीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी भविकांशी गैरवर्तन आणि नियम अटींचा भंग केल्याने घेतला निर्णय

Pune : अटक टाळण्यासाठी बरखास्त IAS पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात धाव

दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अटकेपासूनचे संरक्षणदेखील काढले.

अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने याचिका दाखल केली आहे.

तिच्या विरोधात युपीएससीने दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे.

Dadar : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला, तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केली अटक

काल सकाळी दादर स्थानकात एका तरुणीचे अज्ञात व्यक्तीचे केस कापून बॅगेत भरले.

तरुणीने तक्रार केल्यानंतर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीने त्या तरुणीने केस का कापले होते यामागील कारण अजूनही अस्पष्ट आहे.

Suresh Dhas: सुरेश धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.

मल्टिस्टेट बँक संदर्भात चर्चा झाल्याची माहिती दिली.

Kolhapur : हिंसाचाराच्या घटनेनंतर आता पाच महिन्यांनी विशाळगडावर पर्यटकांना परवानगी

कोल्हापूरातील विशाळगळावर जाण्यास पर्यटकांना परवानगी मिळाली आहे.

विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेनंतर पाच महिन्यांनी विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार आहे.

पर्यटकांना नियम, अटी घालून गडावर जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

३१ जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपात जोरदार इनकमिंग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपात जोरदार इनकमिंग

संभाजीनगर महानगर पालिकेचे दोन नगरसेवक भाजपात

मंत्री अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली भाजपात केला प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सदैव नगरसेवक भाजपात

नगरसेवक कैलास गायकवाड व नगरसेवक रमेश जायभाये यांनी आज भाजपात केला प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे दोन्ही नगरसेवक भाजपात दाखल

पार्किंग केलेल्या चार चाकी वाहनाला अचानक लागली आग

पार्किंग केलेल्या चार चाकी वाहनाला अचानक भीषण आग

राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील घटना

मारुती व्हॅन घराजवळ पार्किंग केली असता अचानक पेटली

भर वस्तीत घटना झाल्यामुळे गावामध्ये भीतीची वातावरण

लग्नाच्या वाढदिवशीच पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूरात लग्नाच्या वाढदिवशी पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, आर्थिक परिस्थितीमुळे केली आत्महत्या. व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून केली आत्महत्या.

लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान करुन परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या.

जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत

पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत

पुण्यात परिसरात टोळक्याने तरुणाच्या हाताचा पंजा कोयत्याने तोडला

बिबवेवाडी मध्ये कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला

मनगटखाली पंजा तुटल्याने पंजा गमावण्याची तरुणावर वेळ

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेली याचिका मागे घेण्याचा धनजंय देशमुखांचा निर्णय

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांचे बंधू धनजंय देशमुख यांनी केला.

पोलीस यंत्रणेला तंपासात वेळ मिळावा, त्यांच्या तपासात हस्तक्षेप होऊ नये यासाठी याचिका मागे घेण्याचा निर्णय

तपास योग्य रितीने सुरु आहे, पण त्यात विलंब झाल्यास पुन्हा याचिका करु असे धनजंय देशमुख यांनी म्हटले आहे.

HMPV Virus : एचएसपीव्ही व्हायरस संदर्भातील राज्यभरातला आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली तातडीची बैठक.

HMPV व्हायरस संदर्भातला राज्यभरातला घेतला आढावा.

राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांच्यासह प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची घेतली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक.

राज्यातील सर्व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष बेड्स तयार ठेवण्याच्या दिल्या सूचना.

नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्याही दिल्या सूचना.

Solapur : बार्शी तालुक्यातील उक्कडगावात वाघ, बिबट्यांच्या नंतर आता माकडाचा उच्छाद

- बार्शी तालुक्यातील उक्कडगाव परिसरात वाघ, बिबट्यांनंतर आता माकडाचा उच्छाद

- उक्कडगाव येथे उपद्रवी माकड दिवसा थेट घरांमध्ये शिरून अन्नधान्याची नासधूस करत आहे.

- वन विभागाकडे याबाबत तक्रार करूनही अद्याप माकडाचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

CID कार्यालयात वाल्मीक कराड बसून आलेली ती गाडी अखेर पोलिसांनी घेतली ताब्यात

पुणे येथील CID कार्यालयात खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मीक कराड, ज्या स्कॉर्पिओ गाडीतून दाखल झाला, त्या गाडी विषयी चांगलीच चर्चा रंगली होती.याबाबत आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. मात्र आता ती गाडी CID पथकाने ताब्यात घेतली आहे.ही गाडी शिवलिंग मोराळे याच्या पत्नीच्या नावे असल्याचे समजले आहे. यावर मोराळे यांनी या गाडीबाबत माध्यमांशी बोलताना मोराळे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान आता या बाबत नेमकी काय कारवाई केली जाते ? याकडे लक्ष लागलेले आहे.

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ महोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ

तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी प्रारंभ झाला.दरम्यान दुपारी 12.30 वाजता शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विवेक गंगणे यांच्या सपत्नीक हस्ते व देवीचे मुख्य महंत व पुजाऱ्याच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदीरातील गणेश ओवरीत विधिवत घटस्थापना करण्यात आली दरम्यान पुढील 14 जानेवारी पर्यंत महोत्सवात देवीची छबिना मिरवणूकीसह,अलंकार महापूजा सह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणे शांकभरी नवरात्र महोत्सव साजरा केला जातो.

Bachu Kadu : अमरावतीत बच्चू कडूंच्या मोर्चाला सुरुवात

धनगर मेंढपाळांच्या विविध मागण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतमजुरांच्या मागण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहे, अमरावतीच्या गाडगेबाबा मैदानापासून ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे, या मोर्चामध्ये शेळ्या, मेंढ्या व घोडे देखील सहभागी झाले, या मोर्चाला सुरुवात झाली असून बच्चू कडू व महादेव जानकर हे धनगर समाजाचे पारंपरिक वेशभूशेत घोड्यावर स्वार होत मोर्चात सहभागी झाले आहेत, तर घोंगडी घालून बच्चू कडू व महादेव जानकर मोर्चात उतरले आहे.

बीड जिल्ह्याच्या नेत्या असूनही पंकजा मुंडे गप्प का ? आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांचा सवाल

बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ओळखला जातो याच बीड जिल्ह्यात बहुजन समाजाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या होते मात्र तरीही पंकजा मुंडे या शांत आहेत या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटत असून जेव्हा त्यांचा पराभव झाला होता तेव्हा त्या सतत सांगत होत्या की सत्ता मिळाली पाहिजे सरकार यायला पाहिजे आता त्याच पंकजा मुंडे शांत का बसल्या आहेत पंकजा मुंडे यांनी बोलायला पाहिजेल आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या प्रकरणी आवाज उठवा आम्ही तुमच्याकडे एक मागणी करतो की तुम्ही एक महिला नेता आहात तुम्ही मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांना भेटा आणि याप्रकरणी आवाज उठवा असे आवाहन आरपीआयचे खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Maharashtra Live Update : धनंजय मुंडे धाराशिवचे पालकमंत्री नको, मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड यांच्याशी असलेले धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी बीडमध्ये होत आहे.तसेच त्यांच्या पालकमंत्री पदालाही विरोध होत आहे.धनंजय मुंडे धाराशिवचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर बीड पाठोपाठ आता धाराशिव मधूनही धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध होत आहे. बीडचा बिहार केला,धाराशिवचा बिहार नको.आम्हाला धनंजय मुंडे पालकमंत्री नको असा निवेदन सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

Jalna News: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन फाशी द्या, १० जानेवारीला जनआक्रोश मोर्चा 

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करुन फाशी द्या

यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जालन्यात 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा

Hingoli News:  HMPV व्हायरसमुळे हिंगोलीत आरोग्य विभाग सतर्क

HMPV व्हायरसमुळे हिंगोलीत आरोग्य विभाग सतर्क

पुढील आदेशा पर्यंत सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस यांनी घेतला आढावा

Maharashtra Breaking Live Marathi Headlines : 50 हजार रुपये घेऊन ही अतिक्रमण नियमाकुल न केल्याने शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयात विष प्राशन

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती पन्नास हजार रुपये घेऊन देखील गटविकास अधिकाऱ्याने अतिक्रमण नियमाकूल न केल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. खामगाव येथील पंचायत समिती कार्यालयात येऊन या शेतकऱ्याने विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. वीस प्राशन केल्यानंतर तब्बल दोन तास हा शेतकरी पंचायत समिती आवारात पडून होता. अखेर पोलिसांनी विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केल आहे. या शेतकऱ्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या कृत्यामुळे पंचायत समिती कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Nashik News : चारचाकी गाडीतून होत होती गांजा तस्करी,  पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले

नाशिक गांजा तस्करी करणाऱ्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून एकास ताब्यात घेतले आहे तर चौघे पळून गेले आहे

Maharashtra Live Update : लक्ष्मण हाकेंवर कारवाई करावी; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. यातूनच हाके यांनी प्रति मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे. हाके समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या लक्ष्मण हाके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी केली आहे.

HMPV चे पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

HMPV चे पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात hmpv ची परिस्थिती उद्भवल्यास मागील काळातील कोव्हिड रुग्णालय सज्ज असून 100 बेड बुलढाणा येथे रुग्णालय तर खामगाव येथे 50 बेड चे रुग्णालयात तयार आहे ... शिवाय जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार असून 1500 ऑक्सिजन सिलिंडर, २० ड्युरा सिलिंडर , सुद्धा तयार आहे .. तसेच कोविड लॅब सुद्धा सज्ज ठेवण्यात आली असून त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असून औषध साठा ही जिल्ह्यात पुरेशा आहे .. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात ही रुग्णाची व्यवस्था ही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांनी दिली आहे.

कुणी म्हणाले फिरू देणार नाहीत - का हे रस्ते तुमचे आहेत का ? तुम्ही ठेका घेतलाय का लोकांचा ? तुम्ही लोकांना अडवणार असाल तर तुम्हाला लोक फिरू देतील का ? यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, 

पुणे विमानतळ प्रशासनाला अजून कुठलेही अलर्ट नाही

चीनमध्ये थैमान घालत असलेला HMPV विषाणू चा भारतात दाखल झाला आहे. देशात त्याचे काही रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे.मी सध्या उभा आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर ज्या ठिकाणी देशातून आणि विदेशातून अनेक नागरिक ये जा करत असतात.पुणे महानगरपालिका सतर्क मोड वर गेले असूनपुणे महानगरपालिकेने 50 बेडचे विलगीकरण कक्ष तयार केला आहे.मात्र पुणे विमानतळ प्रशासनाला अजून कुठलेही अलर्ट आलं नसल्याने या ठिकाणी तपासणी होत नाही.पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाची बैठक झाली.मात्र लोहगाव विमानतळावर प्रवाशाची तपासणी सुरू केलेली नाही.याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल अस महापालिका अधिकारी यांनी सागितले आहे

कॅब चालकाने मालकाला लावला पावणेचार लाखांचा चुना!

अंबरनाथमध्ये ओला उबेर कॅब चालकाने मालकाचे सुमारे पावणेचार रुपये थकवल्याचा प्रकार समोर आलाय. मालकाने थकीत रकमेची मागणी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कार मालक अजय शर्मा यांनी चालकाविरोधात न्यायालयात धाव घेतलीये.

सांगली : बस आणि ट्रकचा अपघात, 19 प्रवासी किरकोळ जखमी

सांगलीच्या मिरज तानंग फाटा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ आज सकाळी बस आणि 14 चाकी अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये कवठेमंकाळ शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थी सह 19 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Live Update :बांग्लादेशी नागरीकाला रत्नागिरीतून जन्म दाखला

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून एका बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून ही बाब समोर आली. मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी चौकशीमध्ये त्याच्याजवळ रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्म दाखला दिल्याचे आढळले. दरम्यान या प्रकारामुळे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहीती समोर आलीय.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने अड्यापर्यंत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. लोक पेनिक होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारच्या वतीने आज दुपारीच्या सूचना येतील,त्याप्रमाणे कारवाई केली जाईल असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय.

कांदा दरवाढ आणि दूध दर प्रश्नावरून खासदार सुळेंच बारामतीत आंदोलन

कांदा आणि दूध दरवाढ संदर्भात पुण्याच्या बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. बारामती शहरातील तीन हत्ती चौकात हे आंदोलन करण्यात येत आहे.यामध्ये खासदार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते सहभागी झालेत.

पाण्याच्या कनेक्शनवरून हाणामारी, महिलांनाही धमकी....घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोन्या बैलाचे मालक जयेश पाटील आणि धरम पाटील यांनी दादागिरीचा कळस गाठला आहे. पाण्याच्या नळ कनेक्शनवरून झालेल्या वादात 31 वर्षीय चंद्रकांत ठाकुर यांना बेदम मारहाण केली असून त्यांच्या कुटुंबातील महिलांच्या अंगावर काठी उगारत धमकावण्यात आले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत

crime News : पुणे नगर जिल्ह्यात चोरी करणा-या सराईत चोरांच्या टोळीला मुद्दामालासह अटक

आळेफाटा येथील कार चोरीचा तपास करत असताना आळेफाटा पोलीसांना सराईत चोरांच्या टोळीला अटक केली यावेळी तीन जणांच्या टोळीने मागणीनुसार चोरी करत असल्याचे समोर आले असुन पुणे आणि नगर जिल्ह्यातील ९ पोलीस स्टेशन हद्दीतुन ४ कार १७ दुचाकी आणि ४३ टायर चोरी केले या सर्व गुन्ह्यांचा तपास करत तीन आरोपीसह मुद्दामाल आळेफाटा पोलीसांनी हस्तगत केलाय.

Pune : पुणे महापालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा साडेसात कोटीचा निधी पडून

कोरोनाच्या काळात पुणे महापालिके च्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळावे म्हणून विविध कंपन्यांनी सीएसआर मधील आहेत.त्यापैकी साडेसात कोटी रुपयांचा निधी अजूनही न वापरता हा बँक खात्यात पडून आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२० मध्ये नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी, २०२१-२२ मध्ये ३.१० कोटीची देणगी मिळाली. २०२०-२१ मध्ये यातील एक पैसाही महापालिकेने खर्च केला नाही, तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये खाट आणि ऑक्सिजसाठी खर्च केले. शिल्लक रकमेवर महापालिकेला आत्तापर्यंत ७० लाख रुपये व्याज मिळाले असून, कोरोना सीएसआर खात्यात ७.४३ कोटी रुपये पडून आहेत.

Maharashtra Live Update : चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन पार पडणार

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन पार पडणार

१६, १७, १८ जानेवारी रोजी कार्यक्रमाचं नियोजन

ह्याच पर्यावरण संमेलनाच्या वित्तीय नियोजनासाठी देवगिरीवर उपमुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांची भेट

ह्या पर्यावरण विषयक संमेलनाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ, विद्यार्थी यांची देखील उपस्थिती असणार

अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ह्या संमेलनासाठी ठेवलेला राखीव निधी अधिकाऱ्यांना वर्ग करण्याचे निर्देश

Crime News: रायगडात 73 टक्के बलात्‍कार अल्‍पवयीन मुलींवर

रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांमध्‍ये लक्षणीय वाढ झाली असून मागील वर्षात बलात्काराच्या 107 घटना समोर आल्या. यात धक्‍कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील 74 प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या बलात्‍कारांच्‍या गुन्‍हयात 73 टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी निगडीत असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील काही वर्षांपर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे वर्षाला ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक १०० हून अधिक गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉक्‍सोअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

चंद्रपूरमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील तीन दुकाने रात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना cctv मध्ये कैद झाली आहे. यामध्ये २ लाख १५ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. चंद्रपूर-नागपूर रोडवरील वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसुत इंटरप्राईजेस, चांडक मेडिकल आणि जनार्धन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. मुख्यमार्गावरील दुकाने फोडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

Maharashtra Live Update : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

विरार चिंचोटी पासून नायगाव पर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा

गुजरात कडून मुंबई कडे येणाऱ्या लेन मध्ये वाहतूक कोंडी

वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू

१० ते १५ किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी

कोरोनानंतर सरकार अलर्ट मोडवर असून आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहे.... याचिका दाखल करो अथवा न करो, सरकार आवश्यक उपाययोजना आणि काळजी करत आहे.
आशिष जैयस्वाल, राज्यमंत्री

डोक्यात नारळ पडून एकाचा मृत्यू, मुरुड बाजार पेठेतील घटना

मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील व्यक्तीचा डोक्यात नारळ पडून मृत्यु झाला. जयेश पांडुरंग गीते असे 48 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. देवपूजेसाठी मुरुडच्या बाजारात शहाळे आणण्यासाठी गेला असता झाडावरून नारळ त्याच्या डोक्यात पडून तो गंभीर जखमी झाला त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सांगली : घरफोडी करणारी टोळी जेरबंद 

घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला सांगलीतल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.तिघांना अटक करत त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चार लाख 64 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चोरीतील सोन्याच्या दागिन्यांचे विक्री करण्यासाठी मिरजेच्या मार्केट यार्ड येथे काही तरुण येणार असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली आहे. तर यावेळी एक जण पसार झाला आहे. तर या टोळीकडून 4 गुन्हे उघडकिस आले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Nanded : भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहरण झालेल्या मुलाचा सहा वर्षानंतर शोध

नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यात भाग्यनगर पोलिसांना सहा वर्षानंतर यश आले आहे. दरम्यान 2019 मध्ये नांदेड शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पहाटे साडेआठच्या सुमारास नवजिवननगर छत्रपती चौक बालसुधारगृहातुन अंकुश गव्हाणे या मुलाचे अज्ञात आरोपीन आपहरण केल होत.दरम्यान या संदर्भात भाग्यनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. भाग्यनगर पोलिस गेल्या सहा वर्षापासून आपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अशाळे गाव उल्हासनगर येथून सहा वर्षापुर्वी आपहरण झालेल्या मुलाची ताब्यात घेऊन त्याची सुटका केली आहे.

HMPV व्हायरस प्रसाराच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर

बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात१०० बेड तर खामगाव येथे ५० बेड चे विलगिकरण कक्ष तयार.

जिल्ह्यात आठ ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लांट तयार.

प्रशासनाने HMPV व्हायरस प्रसार रोखण्यासाठी केली मोठी तयारी.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांची माहिती.

Nashik : जमिनीलगतच्या उघड्या डीपीने घेतला ३ वर्षाच्या चिमुकल्याचा बळी

नाशिक जमिनीलगतच्या उघड्या डीपीने घेतला ३ वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतलाा नाशिकरोडच्या सुभाष रोड येथील जियाउद्दिन डेपो लगत वजन काट्या मागील परिसरात साडेतीन वर्षाचा अफाण हा खेळत असताना जमिनीलगत असलेल्या विद्युत डीपीला त्याच्या हाताचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून अफान हा सहा फूट दूर फेकला गेला आणि या विजेच्या धक्क्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. काल ही घटना घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली असून या उघड्या डीपी अजून किती जीव घेणार आहे, असा संतापजनक प्रश्न नागरिकांनी केलाय महावितरणच्या उघड्या डीपींकडे महावितरण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय.

Santosh Deshmukh Case :  सरपंच संतोष देशमुख कुटुंब मुंबईकडे रवाना

बीडमध्ये घडामोडींना वेग

सरपंच संतोष देशमुख कुटुंब मुंबईकडे रवाना

रात्री 8 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

हत्या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, अशी मागणी करण्याची शक्यता

शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार

सांगली पाटबंधारे कार्यालय वारणाली येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करणे बाबत अधिकारी यांच्या सोबत आमदार डॉ सुरेश खाडे यानी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता यावेळी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला. आणि 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश अधिकारी यांना दिले आहेत. तर सर्व पाजर तलाव भरून घेण्याची आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. याचा लाभ शेतीसाठी शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच दहा तारखे रोजी सर्व लाभ धारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

maharashtra cabinet : आजच्या कॅबिनेटमधूनच ई-कॅबिनेटचा शुभारंभ

आजच्या कॅबिनेटमधूनच ई-कॅबिनेटचा शुभारंभ

बैठकीतील प्रस्तावांचे टीपण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करुन दिली जाणार

मंत्र्यांना प्रस्तावाला आक्षेप किंवा सूचना द्यायची असल्यास तशीही व्यवस्था असणार

दरम्यान, आज पूर्णपणे ई-कॅबिनेट होणार नसून चाचणी म्हणून टॅब देत प्रयोग होणार

ई-कॅबिनेटवर पूर्णपणे शिफ्ट होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार

ई-कॅबिनेटची ही संकल्पना एनआयसीच्या मदतीने राबवली जाणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई-कॅबिनेटची संकल्पना राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर

Pune News : पुण्याच्या भोरमध्ये नगर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम

भोर शहरातल्या रस्त्यावरील वहीवाटीसाठी अडचण ठरणारी अतिक्रमणं नगरपालिकेनी हटवली

नगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं केली कारवाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी स्वतः कारवाईवेळी उपस्थित राहत कर्मचऱ्यांकडून करवून घेतली कारवाई..

यावेळी काही नागरीकांनी विरोध केल्यामुळं काहीकाळ तणावही निर्माण झाला होता

वहीवाटीसाठी अडचण ठरणारी अतिक्रमणं नगरपालिकेनी हटवल्यानं शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास..

Nashik News : नाशिकच्या निफाडमधील पारा घसरला

- नाशिकच्या निफाडमधील पारा घसरला

- आज निफाडचा पारा ९.३ अशांवर

- येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

- वाढत्या थंडीनं द्राक्ष बागायतदार धास्तावला

- वातावरणात झालेला बदल शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा

- तर नाशिकमध्ये १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Solapur : ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर टीका

- ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर टीका

- संजय गायकवाड म्हणजे गद्दार गटातील पिसाळलेला आमदार आहे

- संजय गायकवाड मुळात तू 50 खोक्यावर विकला जाऊन शेण खाण्याचे काम केले

- संजय गायकवाड म्हणजे तमाशातील नाच्या आहे

- त्यामुळे मतदारांना नावे ठेवण्याची तुझी लायकी नाही

Solapur News :सोलापूरकरांना विमानप्रवासासाठी आणखी दोन महिने करावी लागणार प्रतीक्षा

येत्या 2 महिन्यात शंभर टक्के विमानसेवा सुरु होणार असल्याचा आमदार देवेंद्र कोठे यांचा दावा

मागच्या कांही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे रखडली आहे सोलापूरची विमानसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ स्वतः लक्ष घालून विमानसेवेसाठी प्रयत्न करत असल्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सोलापूर विमानतळाचे करण्यात आले होते उदघाटन

Dharashiv : परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे रेडकावर बिबट्याचा हल्ला 

परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे बिबट्याने म्हशीच्या रेडकावर हल्ला केल्याची घटना घडली,यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही नागरिक करत आहेत.गेल्या दोन अडीच महिन्यापासून भूम, परंडा, वाशी, कळंब, धाराशिव तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे,त्यामुळे पाणी असून सुद्धा शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही अशी परिस्थिती आहे त्वरित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Washim :  वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १६ जानेवारीला संपुष्टात येणार

वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, तसेच सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १६ जानेवारीला संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना मुदतवाढ दिली जाईल का, की प्रशासकांची नियुक्ती केली जाईल, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. अनेकांनी मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी, शासन स्तरावर अजून याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या निर्णयामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या कामकाजावर आणि ग्रामीण भागातील विकास योजनांवर कसा परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Live Update : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून दोन भाजपच्या महिला नगरसेविका भिडल्या

फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा पेटला,चार दिवसापूर्वीच मिरारोडमध्ये फेरीवाल्या गुंडाकडून एकचा गोळी मारून हत्या करण्यात आली

गोळीबारची घटना ताजी असताना,फेरीवाल्या मुद्द्यावरून दोन नगरसेविका मध्ये चांगलीच जुंपली

मिरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मध्ये भर रस्त्यात शिवीगाळ

भाजपच्या दोन्ही नगरसेविकेची एकमेकांन विरोधात नया नगर पोलिस ठाण्यात तक्रार

Nashik : नाशिक महापालिकेतील ५५ कोटींचं भूसंपादन प्रकरण

- ५५ कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनाचे चौकशी करण्याचे आदेश

- नाशिक महानगरपालिका देणार अहवाल

- माजी आयुक्तांसह काही लोकप्रतिनिधी देखील अडचणीत येण्याची शक्यता

- बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी रातोरात ५५ कोटी रुपयांचे धनादेश काढल्याचा ठपका

- तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांच्या अडचणीत वाढ

- शासनाने सविस्तर अहवाल मागवत दिले चौकशीचे आदेश

- भाजपा आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशीची केली होती मागणी

- प्रकरणाच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या सादरीकरणाचे शासनाकडून आदेश

weather update :  बुलढाणा जिल्ह्यातील पारा घसरला.. कडाक्याची थंडी.

बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरला असून आज 9 अंशावर आला आहे त्यामुळे जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे... थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार असेलही मात्र मानवी शरीरावर यांचा विपरीत परिणाम होता आहे.. सर्दी खोकला ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहे. HMVP नावाचा व्हायरस पुढे आला आहे त्याची भीती लोकामध्ये वाढली आहे

Pune Live News : पुण्यातील पाच शिवसेनेचे नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार

विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट असे एकूण शिवसेनेचे 5 नगरसेवक व शिवसैनिक कार्यकर्त्यासह दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशमुंबई अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, मा. चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच पुण्यातील सर्व आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश करणार

Palghar News : आरोग्यवस्थेचा ढिसाळ कारभार

पालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचा ढिसाळ कारभार हा दिवसेंदिवस समोर येतोय . त्यातच आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघर मधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे . या सगळ्या प्रकारानंतर जिल्हा निर्मितीच्या दहा वर्षानंतर ही पालघर मधील आरोग्यवस्था आजही खिळखिळी असल्याच समोर आल असून आरोग्य व्यवस्था सुधारण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत असल्याचा आरोप आता केला जाऊ लागला आहे .

Maharashtra Live Update: ऑलिव्ह रिडले कासवाची 20% घरटी महाराष्ट्रात

डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानूसार २०२३-२४ मध्ये देशभरातील ऑलिव्ह रिडले कासवाच्या सर्वेक्षणानुसार 20 टक्के कासवांची घरटी ही महाराष्ट्रात आढळलीत.तसा अहवाल देखील वनविभागाला देण्यात आलाय.त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर याठिकाणी ही घरटी सर्वाधिक आढळलीयत. राज्यातील समुद्रकिनारा असलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा अभ्यास करण्यात आला होता त्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अधिक आढळली. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वायंगणी ही घरट्यांची मुख्य स्थळे असल्याचेही भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात म्हटलेय.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर पिकविम्यासाठी पुन्हा आक्रमक

बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1 लाख 26 हजार 269 शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या 70 हजार 831 शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. 'त्या' शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 233 कोटी 83 लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी रविकांत तुपकरांनी लावून धरली आहे.

Pune Latest News : ८ हजार ३१६ शाळांची नोंदणी

आरटीई अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ८ हजार ३१६ शाळांनी नोंदणी केली असून एकुण १ लाख १ हजार ४७४ प्रवेश आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवलेले असतात. प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते.

यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर म्हणजेच डिसेंबर मध्येच सुरु करण्यात आली आहे. १८ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांच्यी नोंदणीसाठी आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात राज्यातील एकूण ९ हजार १३८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली होती. त्यानुसार १ लाख २ हजार ४३४ जागा उपलब्ध झाल्या होत्या.

Pune News : पुणे महापालिका बांधणार चार हजार घरे

पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी २ हजार ९१८ घरे बांधल्यानंतर आता दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेने सुरु केली आहे.

या नव्या योजनेत शहराच्या बाणेर, कोंढवा, धानोरी, हडपसर येथे बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये घर मिळणार आहे. महापालिकेने ४ हजार ६० घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

Pune Election : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांची मुदत संपल्याने तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.

लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागातील छोट्या छोट्या समस्याही सुटणे अवघड झाले आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

Pune Live News : पुणे महापालिकेने तयार केला ५० खाटांचा विलगीकरण कक्ष

देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरु केल्या आहेत.

रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे. पण महापालिकेने दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही.त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

Pune News : वाहतूक पोलिसांचा पीएमपी चालकांना दणका

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 877 चालकांना दहा लाखाचा दंड

निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे,सिग्नलचे उल्लंघन,ओव्हरटेक करणे आधी विविध कारणासाठी वाहतूक पोलिसांनी पीएमपीच्या 877 चालकांना सुमारे दहा लाखात रुपये साधारण आकारला आहे

या पीएमपीच्या भाडेतत्त्वाचे बचालक असून त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात केली जाणार आहे

weather update : आणखीन दोन दिवस थंडीचा जोर राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा जोर वाढवून, राज्यात पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट आहे. हिमालयात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. काही भागात दाट धुकेही पडत आहे.

Pune Live News Update : 122 साखर कारखान्यांकडे 1 हजार 685 कोटी रुपये थकीत

राज्यातील यंदाच्या 2024-25 च्या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 1 हजार 685 कोटी रुपये थकीत आहेत. शेतकर्‍यांना 1 हजार 163 कोटी रुपये मिळाले आहेत.तर 30 कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिली. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

साखर आयुक्तालयाच्या 15 डिसेंबर अखेरच्या पंधरवडा अहवालानुसार राज्यात 152 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होता.त्यांनी सुमारे 85.13 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. ऊस तोडणी वाहतूक खर्चासह देय एफआरपीची रक्कम 2 हजार 848 कोटी रुपये होती. त्यापैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर कारखान्यांनी 1 हजार 163 कोटी रुपये जमा केलेले आहेत. म्हणजेच देय एफआरपीच्या सुमारे 40.84 टक्के रक्कम शेतकर्‍यांना मिळाली आहे. मात्र, अद्यापही 1 हजार 685 कोटी रुपये थकीत असल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्याची होणार आर्थिक गणना

यवतमाळ जिल्ह्याची 2025 - 26 ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समन्वय समितीचे स्थापन करण्यात आली असून या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीत एकूण 18 सदस्य असणार आहे त्यात सह अध्यक्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे.

Tuljapur News : तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी

तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज शाकंभरी महोत्सवाला सुरुवात झाली दरम्यान देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे.भिंतीवर लावण्यात आलेले ग्रॅनाईट काढत मूळ दगडांना ब्रशिंग व सेंड ब्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात आलेला आहे.पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मुंबईतील सवानी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे.

Tuljapur News : मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज सिंहासनावर विराजमान

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची आठ दिवसाची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली आहे.देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून 14 तारखेपर्यंत हा शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.दरम्यान देवीची मुर्ती ही चल मुर्ती आहे त्यामुळे देवीचे सिंहासन व संपुर्ण गाभारा गोमुख तिर्थाने धुवुन घेण्यात आला व त्यानंतर पहाटे विधिवत पुजा करून तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा छोटा दसरा असतो त्यासाठी आज दुपारी घटस्थापना करत विधिवत पूजा केली जाते.

Bachu kadu News : अमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज आंदोलन

अमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज वाडा आंदोलन

महादेव जानकर सुद्धा आंदोलनात होणार सहभागी

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या,मेंढपाळ धनगर बांधवाच्या समस्या सोडवा, दिव्यांगाना सम्मानजनक मानधन, शेतमजूरांना न्याय द्या यासाठी बच्चू कडू आक्रमक

सकाळी 11 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर होणार आंदोलन

राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांचे विधानसभा निवडनुक नंतर पहिलंचं आंदोलन

अमरावती विभागीय आयुक्त कार्याललयावर असणार पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त

Latur News : आज संपूर्ण लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन

बीड येथील सरपंच संतोष देशमुख तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण लातूर जिल्हा भरामध्ये ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे... जिल्हाभरातील प्रमुख महामार्गावर हे चक्काजाम आंदोलनाच आयोजन करण्यात आले आहे... सकाळी दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

Maharashtra Live Update: लाडके भाऊ होणार बेरोजगार,फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कालावधी संपणार

महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 22 हजार 565 युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून शासकीय विभागांमध्ये नियुक्ती दिली त्यामुळे या प्रशिक्षणार्थींना दरमहा दहा हजार रुपये मानधान सुरू झाले मात्र सहा महिन्याचा कालावधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार असून लाडक्या भावांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.मुद्दत वाढ देण्याची मागणी लाडके भाऊ करताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT