वाल्मीक कराडला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या रुग्णालयात वाल्मीक कराडची वैद्यकीय चाचणी सुरु आहे.
केज पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॅरिगेटिंग करण्यात आले आहे.पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांना येण्यास बंदी घातली आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज पालघर जिल्ह्यात दादरानगर हवेली आणि दिव दमन या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अवैध मद्याच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आज पालघर पोलिसांकडून सीमा भागात तपासणी केली जात आहे . तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अछाड, दादरा नगर हवेली सीमेवरील उधवा तर महाराष्ट्रात येणाऱ्या इतर लहान मोठ्या रस्त्यांवर देखील पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून मध्यरात्रीपर्यंत ही तपासणी कायम राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर पर्यटनस्थळांवर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी गैरप्रकार टाळण्याच्या उद्देशाने फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून फलक लावून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह अनेक ठिकाणी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना लवकरात लवकर अटक करायची मागणी मस्साजोगचे गावकरी करत आहेत. आरोपींना सकाळी दहा वाजेपर्यंत अटक झाली नाही, तर गावकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. यासंबंधित दवंडी गावात देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी उद्याच्या जलसमाधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
२०२४ वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांसह असंख्य पर्यटक मुंबईतील विविध पर्यटनस्थळी जमा झाले आहेत. मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. वर्षाचा शेवटचा सूर्यास्त डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक चौपाटीवर पोहोचले.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पालघरमधील समृद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पालघरमधील केळवा, चिंचणी, डहाणू आणि बोर्डी या किनाऱ्यांवर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबई, ठाणे यांसारख्या महानगरांलगत असल्याने पालघरमध्ये पर्यटकांची मोठी वर्दळ झाली आहे. यंदा परिसरात नेहमीपेक्षा अधिक पर्यटक दाखल झाल्याचे म्हटले जात आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडने पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले होते. त्याला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुण्यातून सीआयडीचे पथक केज न्यायालयाकडे रवाना झाले आहे. न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
वाल्मीक कराडला सीआयडीकडून अटक करण्यात आली आहे. सीआयडीला शरण गेल्यानंतर वाल्मीक कराडला अटक झाली आहे.
Walmik Karad News : सीआयडीने वाल्मीक कराड याची तीन तास चौकशी केली. चौकशीनंतर त्याला मेडीकल चेकअपसाठी औंध येथील रूग्णालयात नेण्यात आले आहे. वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली का? अशी चर्चा सुरू झाली.
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये असलेल्या उजनी जलाशयात पाण्यासाठयातील उथळ पाण्याच्या ठिकाणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचे आगमन शेकडोंच्या संख्येने झाले आहे.
उजनी जलाशयात विविध जातीचे पक्षी अन्न पाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात, त्याप्रमाणे यावर्षीही येऊ लागले आहेत. हिवाळ्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र सध्या उजनीतील पाणी साठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांची पाणथळ जागा उपलब्ध होते आणि विणीच्या हंगामासाठी हजारोच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय दाखल होतात. विदेशातील हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगो पक्षाचे आगमन ल उजनी जलाशयात झाले आहे.त्याची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्षाला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन
- कोविंद यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात कुटुंबीयांसमवेत विधिवत पूजा करून घेतले त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद
- विश्वस्त मंडळासह पोलिसांकडून कोविंद यांच्या दर्शनासाठी करण्यात आलं होतं खास नियोजन
- शिर्डी येथे साई मंदिरातील दर्शनानंतर कोविंद त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना बावीस दिवस ओलांडून देखील पोलिसांनी अटक केली नसल्याने इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय. या सोबतच परभणी घटनेचा देखील ग्रामस्थांकडून निषेध नोंदवण्यात आलाय.यावेळी भिगवण पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अवदा कंपनीतील कर्मचाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपी प्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक होण्याची शक्यता
सध्या वाल्मीक कराड यांची राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे
काही वेळात खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यांना अटक करुन आज सायंकाळपर्यंत केज येथील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता
मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे गावातून तीन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. नवलाख उंबरे येथे मागील सहा महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते. नवलाख उंबरे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहत असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे आली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास केला असता त्यांना हे तीन बांग्लादेशी इसम आढळून आले. या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांच्याकडे बांग्लादेश मधील रहिवासी पुरावे मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हुसेन शेख, मोनिरुल गाठी, अमीरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी इसमांची नावे आहेत. या बांगलादेशी इसमाना भारतीय आधारकार्ड व पॅन कार्ड कोणी दिले याबाबतचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव करत आहेत....
खंडणीच्या गुन्ह्यात अटक नको
वाल्मीक कराड सात आरोपींचा म्होरक्या
धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, हे आधीच सांगत होतो
धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून खाली खेचा
मुंडेंना संरक्षण का देता? अजित पवार यांना सवाल
वाल्मीक कराडसोबत दोन नगरसेवक कशाला?
धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणामध्ये माणगाव येथील काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्याने खासदार तटकरे संतापले. माणगाव बायपासचे रखडलेले काम आणि माणगाव मधील वाहतुक कोंडीचा नागरिकांनी आक्रमकपणे मांडलेल्या भुमिकेनंतर खासदार तटकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
Nashik News : नाशिकच्या मालेगाव शहरात किरीट सोमय्या यांनी काल भेट दिल्यानंतर मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे वास्तव्य असल्याचे जाहीर केल्यानंतर आज मालेगाव मधिल काही सामाजिक संघटनांनी या विरोधात मोर्चा काढत मालेगाव मधिल वाढती गुंडगिरी,रोहिंग्या बांगलादेशी मुक्त मालेगाव झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
वाल्मीक कराडची संपत्ती लवकर जप्त करावी.
देवेंद्र फडणवीस यांच्या अॅक्शनमुळे कराड शरण आला.
खंडणी मागण्यासाठी माणसं कुणी पाठवली.
शरण आलेल्या आकावरही ३०२ गुन्हा लावा.
राज्याचे मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सासवड येथे आयोजित एका कार्यक्रमात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व वायनाड च्या खासदार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याबाबत बोलताना केरळ या राज्याची तुलना थेट पाकिस्तानशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी या ठिकाणी एका सी एन जी रिक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे.सदरचा घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.अग्निशमन दलाचा वतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
वाल्मीक कराड सीआयडी पोलिसांना शरण आल्यानंतर त्याचे अनेक कार्यकर्ते कार्यालय बाहेर दाखल होते. वाल्मीक कराड आरोपी नसून त्यांना बदनाम केले जात असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर फळ खून प्रकरणातील आरोपी बबन गीते त्याला जामीन मंजूर झाला तो मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय.
उद्या सकाळपर्यंत संतोष देशमुख हत्येतील तीन आरोपींना अटक करा, अन्यथा उद्या सकाळी दहा वाजता जलसमाधी आंदोलन करणार, असं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सांगितले.
रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि माणगाव तसेच इंदापूर बायपासच्या कामाबाबत सुनिल तटकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत समाधान कारक उत्तर न दिल्याने तटकरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतले. नियोजन बद्ध पद्धतीने काम होत नाही असा शेरा मारत तटकरे यांनी महामार्गा विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकी दरम्यान उभे रहाण्याची शिक्षा अधिकाऱ्यांना केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची बीड जिल्हा रुग्णालयात रुटिंग चेकअप सुरू..
महेश सखाराम केदार,जयराम माणिक चाटे,प्रतिक भिमराव घुले आणि विष्णू चाटे असं रुग्णालयात आणलेल्या आरोपींचे नावे आहेत
वाल्मिक कराडच्या शोधात सीआयडी कडे महत्वपूर्ण धागेदोरे ..
तांत्रिक विश्लेषणात वाल्मिक कराडचा शेवटचा ठावठिकाणा सीआयडीच्या हाती ..
१७ डिसेंबरला वाल्मिक कराड याच शेवटच ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात ..
पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड झाला फरार..
सीआयडीकडून कराडच्या अटकेसाठी दबाव वाढवण्यात आलाय ..
वाल्मीक कराड 17 तारखेला होता पुण्यात
अकरा दिवसानंतर कराड सरेंडर होण्याची शक्यता
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रासह आंध्र,कर्नाटक,तेलंगणा, गोवा आणि गुजरात मधून भाविक आले असून,पहाटे पासूनच भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याच चित्र दिसून येत आहे.
वाँटरस्पोर्ट्सच्या माध्यमातून साहसी खेळांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती
मोरया वाँटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्र किना-यावर पँरेसिलींगचा थरार
खोल समुद्रात पँरासिलिंगचा थरार अनुभवताहेत पर्यटक
300 फुट उंचीवर जाऊन समुद्राचं विंहंगम दृश्य न्याहाळचा येतं
विस्तीर्ण समुद्र किनारा पँरासिलींगच्या माध्यमातून पर्यटक अनुभवताहेत
सुरक्षिततेची विशेष काळजी इथं घेतली जातेय
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती.. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आजपासून सलग तीन दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेने घेतला आहे.. याबाबतची माहिती अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली तसेच या संदर्भात कार्यवाही न झाल्यास येत्या सात जानेवारीला राज्यातील सर्व सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य हे आझाद मैदानावर धरणे आंदोलन देखील करणार असल्याचे दत्ता काकडे यांनी म्हटले आहे.
आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री गृहामध्ये त्यांची भेट होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संबंधित तपास, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांची बोलणार असल्याचं कळतंय. लवकरात लवकर आरोपींना अटक करावी आणि या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेतल्या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ते करणार आहेत. आजची त्यांची भेट ही महत्त्वाची मानली जातेय. विशेष म्हणजे काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परवा दिवशी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीही मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली होती.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक हे बाहेर रस्त्यावर येत गर्दी करतात. त्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्या आज सायंकाळी पाचनंतर बंद करण्यात येणार आहे.लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
नवी मुंबई शहरात यावर्षी सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेय. यावर्षी साधारण 12,300 नागरिकांना गंडा घालत सायबर चोरट्यांनी तब्बल 270 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केलेय. तर 2023 मध्ये 7000 नागरिकांना सायबर चोरट्यांनी गंडा घालत 67 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. यामध्ये सर्वाधिक प्रकरण शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे दिसून येतात. यावर्षी 40 ते 50 सायबर चोरट्यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले असून सायबर गुन्हेगारी विरोधात जनजागृती करण्याचे सर्वोतोपारी प्रयत्न करण्यात येतं असल्याची प्रतिक्रिया सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी व्यक्त केलेय.
- अनाधिकृत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तब्बल 14 जणांवर आतापर्यंत तडीपारीची कारवाई
- गेल्या काही दिवसांपासून शहरात सर्रासपणे सुरू आहे नायलॉन मांजाची विक्री
- पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत तब्बल 22 गुन्हे दाखल करत 14 जणांवर केली तडीपारीची कारवाई
- वेळ पडली तर मोक्का अंतर्गत कारवाईचा नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा
- नायलॉन मांजा वापरामुळे अनेक जण होतायत जखमी
- नागरिकांनी देखील पतंग उडवतांना नायलॉन मांजा न वापरण्याचं पोलीस आयुक्तांचं आवाहन
Solapur Latest News : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
विठ्ठल दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक भाविक आजच पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांची संख्या वाढल्याने शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास लाॅजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची रांग दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे.
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे भीषण अपघात
राजापूर हातिवले येथील महामार्ग ओलांडताना झाला अपघात
राजापूर तालुक्यातील बारसू येथील जयवंत तुकाराम बगाडे यांचा जागीच मृत्यू
गोव्याच्या दिशेने जाणा-या स्कोडा कार दिली धडक
जयवंत तुकाराम बगाडे यांचा जागीच मृत्यू
डिसेंबर 2019 मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा या गावातील 45 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करताना तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या रितेश उर्फ संजय कराळे या नराधमाला खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. असहाय असलेली व घरात एकटीच असलेली महिलेला रात्रीच्या वेळी घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करताना केलेल्या प्रतिकारात संजय कराळे यांनी या महिलेला जिवानिशी मारलं होतं. यावेळी संजय कराळे याने पुरावाही नष्ट केले होते. मात्र पोलिसांनी शीताफिने तपास करून या आरोपीला अजन्म कारावासाच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले आहे . या खटल्यात शासकीय पक्षाकडून सरकारी वकील रजनी बावस्कर यांनी काम पाहिले.
25 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक अटक करण्यात आली आहे.पोलीस नाईक शेखर पाटणकर असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे.एका बांधकामा दरम्यान बाल कामगाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता,या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडे पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर यांनी 50 हजारांची लाच मागितली होती. त्यामध्ये 25 हजारांची लाचेची रक्कम ठरली होती.या प्रकरणी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर याला अटक करण्यात आली आहे. याच पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी पंधरा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.त्या पाठोपाठ आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.