Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२५, राज्यातील थंडीला ब्रेक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Yavatmal: यवतमाळ जिल्हा परिषदतील दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचारी रडारवर

यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक,अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम राबवली होती.यात ऑफलाइन प्रमाणपत्र आढळून आले त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी 21 कर्मचाऱ्यांना निलंबित केले या घटनेची शाई वाळत नाही तर पुन्हा यवतमाळ जिल्हा परिषदेत कार्यरत लाक्षणिक दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक,वैश्विक ओळख पत्र सादर केलेले कर्मचारीही रडारवर आले आहे.त्यांच्या प्रमाणपत्राबाबत शहंशाह वाटत असल्याने सियोनी विभाग प्रमुखांकडून त्या कर्मचाऱ्यांची नावे मागितली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यात आता प्रत्यक्ष फिजिकल तपासणीची धास्ती निर्माण झाली आहे

Yavatmal: माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या उमेदवारीवर उद्या अंतिम निकाल

निवडणूक निर्णय अधिकारी,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बाजु मांडण्यासाठी समन्स

पूर्व सूचना न देता वगळले मतदार यादीतून नाव

यवतमाळ नगर परिषदेत माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी नगराध्यक्षपदासाठी केलाय नामांकन दाखल

मतदार यादीत नाव नसल्याचे कारण देत मडावी यांचा अर्ज बाद करण्यात आला होता.या आदेशा विरोधात मडावी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलीये

दरम्यान न्यायालय यावर उद्या अंतिम निकाल देणार,यवतमाळ करांच्या नजरा न्यायालयाच्या निकालाकडे

बदलापुरात भाजप आणि बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

बदलापुरात निवडणुकीचा प्रचार सुरू असताना भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते आपसात भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार बदलापूरच्या आंबेडकर चौकात भाजपची सभा होती. त्याच भागातून बहुजन मुक्ती पार्टीची रॅली जात असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. डीजेच्या आवाजावरून बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. त्यानंतर बहुजन मुक्तीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. हाणामारीच्या या घटनेनं बदलापुरात निवडणूक प्रचाराला गालबोट लागलय.

आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून मंत्री जयकुमार गोरे यांनी निशाणा लगावला होता.

सोशल मीडियावर पोस्ट करून पक्ष चालत नाही तर जनतेमध्ये जावं लागतं असा टोला जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला होता. यावरून रोहित पवार यांनी गोरे यांन प्रतिउत्तर दिला आहे. आम्ही लोकांमध्येच आहे गोरे हे कदाचित नरेंद मोदी किंवा भाजपच्या नेत्यांवर यांच्यावर बोलले असतील असा उपरोधि रोहित पवार यांनी लगावला आहे. तर तुमचा इतिहास हा लोकांसमोर उघडा असून सर्वांना माहीत आहे. अजून बोलून उघडा करू नका, अन्यथा आम्ही लक्ष घातलं तर तुमची अडचण झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रोहित पवारांनी गोरे यांना दिला आहे.

पुणे शहरातील औंध भागात बिबट्याचा एन्ट्री

पुणे शहरातील औंध भागात बिबट्या आढळला. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आढळून स्थानिकांना बिबट्या दिसला. वन विभागाकडून आणि टीम रेस्कु कडून बिबट्याच्या शोध सुरू आहे. पहाटे ४ नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्या ही खुणा मिळून न आल्याची माहिती. बिबट्याचा ड्रोनने शोध घेतला जातोय.

काँग्रेस भाजपची बी टीम, आमदार रोहित पवार यांची टीका

जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसवर थेट टीका करत काँग्रेसची भाजपची बी टीम असल्याचे भाषणात सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा पक्षाच्या उमेदवारांचे मत खाण्यासाठी काही लोकांनी 50 लाख रुपये घेऊन नगराध्यक्षपदाची नगरसेवक पदाची उमेदवारी केली असल्याचा आरोपही त्यांनी जामखेड येथे झालेल्या भर सभेत केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा आमदारकीचा अर्ज भरल्यानंतर तो मागे घेण्यासाठी मला सुद्धा काही लोकांची मोठी काळजी घ्यावी लागली होती.असेही त्यांनी यावेळी भाषणात सांगितले आहे भाजप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी आमदार रोहित पवार यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या मागे नको त्या कटकटी मागे लागण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT