विद्यार्थी संघटनांकडून दिवे लावून आंदोलन करण्यात येत आहे
IIT मुंबईच्या मुख्य गेट बाहेर दिवे लावून आंदोलन सुरू
दुष्काळाची बनावट यादी प्रसारित करणाऱ्या विरोधात कार्यवाही होणार
हिंगोलीत कृषी मंत्री दत्ता भरणे यांची साम टीव्हीवर माहिती
खोट्या आणि खोडसाळ माहिती मुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने कार्यवाहीचे आदेश
NASHIK BREAKING -
- त्र्यंबकराजाच्या प्रतिमेवरून आक्षेप नाही, मात्र प्रतिमा तयार करण्याआधी सांगायला हवं
- आमची मतं विचारात घ्यायला हवी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांचं स्पष्टीकरण
- मुखवटा तयार करताना त्यात अवयव, चिन्ह अथवा काहीही त्रुटी राहू नये, अशी आखाडा परिषदेची भूमिका
- तर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यावर पुरोहित संघ वर्चस्व दाखवत असल्याचा देखील आरोप, नाव न घेता हरिगिरी महाराजांचा आरोप
- महापौर यांनी या नामकरणाला मनपा कडून परवानगी दिली
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपूल निर्मिती साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले
- या उड्डाणपुलाचे निर्माणकार्य NHI आणि राज्य सरकार कडून करण्यात आले आहे
- ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण
- ध्वजारोहणासाठी १२ वाजून २ मिनिटांचा मुहूर्त
- ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना देण्यात येणार निमंत्रण
वाशिम जिल्ह्यात पावसाच्या खंडाने खरीप पिके आहेत संकटात...
पाच तालुक्यांतील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार..
मालेगाव तालुक्यातील झोडगा येथून पाहणी दौऱ्याला केली सुरुवात ..
या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हजेरी
पुढे सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा, खेरडा गावांमध्येही करणार पाहणी..
सोयाबीन, तूर, कपाशीच्या नुकसानीचा घेणार आढावा
शेतकऱ्यांशी बांधावरच साधणार थेट संवाद...
दौरा चार तास उशीरा पोहोचल्यामुळे पुढील रात्रीचे अंधारात दौरा पुढे बघावं लागणार..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांत नागपूरातील उड्डाणपूलाला आद्य सरसंघचालक डॅा. केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव
इंदोरा - दिघोरी उड्डाणपूलावर डॅा. केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव आणि फोटो लागला.
८ महिन्यांच्या चिमुकली अचानक बेपत्ता...
संशयित इसमानेही केली आत्महत्या.. ....
नांदगावच्या मन्याड चौकी येथील घटना...
बेपत्ता मुलगी न सापडल्याने गुंता वाढला...
बेपत्ता मुलीचे आजोबांकडे संशयाची सुई...
आजोबा बेपत्ता झाल्याने संशय बळावला.
शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता बिबट्याचा वावर शेतशिवारापुरता मर्यादित न राहता थेट गावांपर्यंत पोहोचला आहे, बिबट्याने झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला केला असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे, अर्थे गाव परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्र्यंबकेश्वरचे साधू महंत बैठक सुरू होताच आक्रमक
त्र्यंबक राजाच्या प्रतिकृतीवरून साधू महंत भडकले
बैठकीत ठेवलेल्या त्र्यंबक राज्याच्या मुखवट्यावरून साधू महंत संतप्त
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांच्या समोरच गोंधळ
मावळ कोर्टात पुणे ग्रामीण पोलिसांनी सादर केलं दोषारोपपत्र
आतापर्यंत केलेल्या तपासाच्या अनुषंगाने तब्बल 5000 पानांचं दोषारोपपत्र सादर
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना केली आहे अटक
केतन अगरवाल ची होणारी पत्नी सिया गोयल तिचा प्रियकर आणि मित्र अशा तीन जणांना अटक
दोषारोप पत्र सादर केल्यानंतर आता विशेष सरकारी वकिलांची होणार नियुक्ती
केवळ व्हॉट्सॲपवर मालकाच्या मुलीचा डीपी पाहिला आणि अकाउंटंटने तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये दोन अनोळखी खात्यांमध्ये वळते केले. अकाउंटंटने केलेल्या गंभीर चुकांमुळेच सायबर भामट्यांनी कंपनीला एवढा मोठा गंडा घातल्याचे समोर आले. छत्रपती संभाजीनगरमधील गारखेड्यातील एका इन्फ्रा कंपनीत हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली येथून पोटेगावला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर उलटल्याची घटना आज घडली आहे. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर दोन्ही बाजूंच्या अप्रोच रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. याच ठिकाणी पोटेगावकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटली. जखमींना हात, पाय आणि चेहऱ्याला दुखापत झाली असून सर्वांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावी मुक्कामी आले आहेत.त्यांचा या दरे गावात देखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.आज सपत्नी गणेशाची पूजा करत आरती केली.यावेळी मोठ्या संख्येने गावातील लोक,कार्यकर्ते उपस्थित होते.आज घरातील गणेशाचे विसर्जन देखील करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे गणपती उत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवासासाठी १८ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यानच्या 'मेन लाईन'वर दिनांक २३/२४.०९.२०२६ (बुधवार/गुरुवारची रात्र), दिनांक २४/२५.०९.२०२६ (गुरुवार/शुक्रवारची रात्र) आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ (शुक्रवार/शनिवारची रात्र) या दिवशी चालवण्यात येतील.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सहयोग सोसायटी येथे सुरू आहेत मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे
परळीच्या रेल्वे हक्कासाठी धनंजय मुंडे मैदानात; रेल्वे अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले
परळी मुंबई रेल्वे झालीच पाहिजे असा दम देत, रेल्वेचे नियम सांगत अधिकाऱ्याची कान उघडणी केली.
आमरण उपोषणाला ठाम पाठिंबा, मुंबई रेल्वेसह सर्व मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली.
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात लावण्यात आले होते अमित शहा यांच्या स्वागताचे फलक
दौरा रद्द झाल्यानंतर लगेचच फलक हटवण्याचे काम सुरू
प्रकृती अस्वस्थामुळे दौरा झाला रद्द
विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने अमित शहा हुबळीतून दिल्लीच्या दिशेने रवाना
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महायुतीच्या हालचाली गतिमान
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय
आमदार अमल महाडिक यांची माहिती
कोल्हापूर मधील एका खाजगी हॉटेल मध्ये भाजप आमदार खासदार यांच्या सोबत गोकुळ निवडणुकी बाबत केली चर्चा
गोकुळ निवडणुकीसाठी महायुती मध्ये भाजप ला सर्वाधिक जागा घ्या
भाजप नेत्यांची चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रही मागणी
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर आरबीआय कडून बडतर्फ ची कारवाई करण्यात आली आहे मागच्या दहा वर्षापासून बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक होते, त्यामुळे आरबीआयचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावरील बडतर्फेची कारवाई करण्यात आली,
राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे कोरडा दुष्काळ पाहणे दौरा करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत, नांदेड मध्ये दुष्काळ दौरा करण्याआधी प्रशासकीय बैठकीत दत्ता भरणे यांनी चक्क अधिकाऱ्यांनी आणलेल्या काजू बदाम चा आस्वाद घेतला आहे.
त्यामुळे कोरड्या दुष्काळात काजू-बदामाची मेजवानी घेणाऱ्या कृषिमंत्री भरणे यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव परिसरात दत्ता भरणे यांचा बारा वाजून पंधरा मिनिटांनी नियोजित दुष्काळ पाहणी दौरा होता मात्र एक वाजून गेला तरी दत्ता भरणे इथे पोहोचले नसल्याने शेतकरी ताटकळले आहेत.
तर कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी खुशाल काजू बदाम खावे मात्र आमच्या एक टाईम जेवण्याची व्यवस्था करावी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा अशा संतप्त प्रतिक्रिया हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी दिल्या आहेत
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली बैठक
उद्या गोकुळ संदर्भात अर्ज दाखल करण्याच्या बैठकीत देण्यात आल्या सूचना
कोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होणार कोण माघार घेणार याबद्दल गुप्तता पाळण्यात आली
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर आहेत. तिवसा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक भागातील सोयाबीनचे पीक करपले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बावनकुळे यांनी नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीची माहिती घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नवापूर शहरात अन्न व औषध प्रशासनाने फरसाण मार्ट आणि स्वीट्सच्या दुकानावर धडक कारवाई केली. कारवाईत पुनर्वापर केलेल्या टिनमध्ये साठवलेले तब्बल 1,586 किलो संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आले. यामध्ये 268 किलो पामोलीन आणि 1,318 किलो सोयाबीन तेलाचा, एकूण 2 लाख 69 हजार 756 रुपये किमतीचा साठा आहे. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, खरीपातील सोयाबीन पूर्णपणे करपून गेले आहे. गौरी-गणपतीचा सण घरात असतानाही शेतकरी महिलांना शेतात राबावं लागत आहे. करपलेलं सोयाबीन जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगी पडावं, यासाठी त्याची काढणी करून गंजी लावण्याची लगबग सुरू आहे. “सणाचा आनंद नाही, लक्ष्मीपुढे ठेवायला धान्यही नाही,” अशी व्यथा भाटशिरपुरा येथील शेतकरी महिलांनी व्यक्त करत सरकारकडे मदतीची मागणी केली.
विदर्भात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत असून सरकारने तातडीने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली. शेतकऱ्यांसमोरील संकटाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट ओढावण्याची शक्यता असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि डोंगराळ भागात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. भुईमूग आणि सोयाबीन पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असून, पावसाअभावी पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्या संकटातून सावरून उभ्या केलेल्या पिकांना आता कडक उन्हाचा तडाखा बसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याची एक बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून ही यादी व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, व्हायरल यादीमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
गणरायाच्या आगमनानंतर राज्यभरात घरोघरी गौराईचेही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात आगमन झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात सुवर्णा समीर माळवे यांच्या घरी गौराई पूजनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. विविध धार्मिक आणि ग्रामीण जीवनशैलीची प्रचिती देणारे आकर्षक देखावे तसेच गौरी-गणपतीसमोरील सुंदर सजावट लक्षवेधी ठरली. गौराई पूजनासाठी शहरातील महिलांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांनीही आवर्जून उपस्थिती लावली. एकंदरीतच गौराईच्या आगमनाने परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नाणीजधाम येथील रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ नागपूर ते नाणीजधाम या वसुंधरा पायी दिंडीचे यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. वसुंधरा पायी दिंडीच्या निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणाची करु रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा अशा घोषणा करत वसुंधरा पायी दिंडीत सुमारे दोन हजार भाविक भक्तगण सहभागी झाले आहेत.
कल्याण ग्रामीणलगतच्या सांगरली-खिडकाळी भागातील ग्रामस्थांना डोंबिवलीतील निळजे नदीपात्रातून दगडांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रिक्षासाठी ६० रुपये खर्च होत असल्याने नागरिक पर्यायी मार्ग टाळतात.
अमरावती शहरातील गोपालनगरातील भारतमाता चौक ते जीवन विकास विद्यालय रोडवरील पवननगर क्रमांक २ परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात तब्बल २० ते २५ मोकाट कुत्री टोळक्याने फिरताना दिसत असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे.
गणेशोत्सवामध्ये कोकणात गणपती बाप्पाच्या चरणी आकर्षक सजावट केली जाते. मागील काही वर्षात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 'पर्यावरणपूरक सजावट' गणेशभक्त करतात. कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील शेखर पिळणकर यांनीही आपल्या बाप्पाचे स्वागत पर्यावरणपूरक देखाव्याची सजावट करून केले आहे. पिळणकर कुटुंबियांचा गणराय नारळात विराजमान झाला असून यासाठी वापरण्यात आलेल्या सजावटीच्या वस्तू या संपूर्ण पर्यावरणपूरक आहेत. या देखाव्यातून पिळणकर कुटुंबियांनी गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.
मागील काही काळात चोपडा शहरातील गणेशोत्सव संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत खास ठरत आहे. गणपती आगमन सोहळ्यापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या भव्य उंच मूर्ती आणि गुलालाची तुफान उधळण यामुळे चोपड्याच्या गणेशोत्सवाला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपड्यात पाचव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात व अतिशय उत्साहात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शहरातील सर्वच गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक एकाच मार्गाने जात असल्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तळेगाव दाभाडे येथील काळोखे परिवाराने घरगुती गौरीच्या स्वागतासाठी साकारलाय ‘पर्यावरणपूरक निसर्ग संवर्धन’ हा अनोखा देखावा. वृक्षतोड, वाढतं प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडता समतोल याकडे लक्ष वेधत, ‘निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा’ हा महत्त्वाचा संदेश या देखाव्यातून देण्यात आलाय. गौरीच्या भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत काळोखे परिवाराने साकारलेल्या या अनोख्या संकल्पनेमागची नेमकी कल्पना मोठ्या प्रमाणावर होणारी जंगल तोड वृक्षांची नासाडी आणि पृथ्वीचा समतोल वाढतं प्रदूषण, घटतं वनक्षेत्र आणि निसर्गाचा बिघडता समतोल... या गंभीर प्रश्नांवर ‘निसर्ग वाचवा, पर्यावरण जपा’ असा संदेश या देखाव्यातून देण्यात आलाय...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या ठिकठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. आजकालच्या गणेशोत्सवात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात डीजे आणि आधुनिक संगीताच्या ठेक्यावर थिरकताना दिसते. मात्र, याला छेद देत सांगली जवळील बुधगाव येथे पारंपारिक लोककलेचा वारसा जपणारा सोंगी भजनाचा रंगतदार कार्यक्रम पार पडला.
पुणे जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दुधाच्या दरवाढीमुळे दिलासा मिळतोय. खाद्याचे वाढते दर आणि कमी बाजारभावामुळे अडचणीत आलेल्या दुग्ध व्यवसायाला आता वाढलेल्या दरामुळे आधार मिळतोय.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजावर पुन्हा एकदा मोठे संकट ओढावले असल्याची कृषी विभागाची आकडेवारी समोर आलीय. १४ सप्टेंबर २०२६ अखेरच्या शासकीय आकडेवारीनुसार मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल दीड पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे पिके वाळून चालली आहेत. त्यामुळं खरीप पिकांच्या उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा अंदाज कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलाय. ही आकडेवारी १४ सप्टेंबर पूर्वीची आहे. त्यानंतर परिस्थिती भीषण आणि भयावह होत चालली आहे.
अमरावतीच्या इर्विन चौकातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा हा गणपती संपूर्ण विदर्भाचे आकर्षण ठरत आहे.मुंबईच्या लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेल्या या विदर्भाच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक रोज रांगा लावत असतात.या मंडळाला 48 वर्षे पूर्ण होत आहे... या विदर्भ राजाची विसर्जन मिरवणूक ही संपूर्ण विदर्भात अतिशय आकर्षक व पाहण्यासारखी असते. जिल्ह्यातील सर्व गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पाच दिवसानंतर या विदर्भाच्या विसर्जन केलं जातं. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील जे नागरिक बाहेर राहतात ते देखील या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आवर्जून येत असतात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांत तब्बल २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक भागांत पिके वाळण्यास सुरुवात झाली असून सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळताच पंचनामे सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्यात यंदा ६.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी १.१८ लाख हेक्टरवरील पिके वाळल्याची माहिती आहे. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या १९ टक्के क्षेत्राला पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, मका यासह खरीप पिकांना सध्या पावसाची गरज असताना अनेक महसूल मंडळांत सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ पुरेसा पाऊस झालेला नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच वाळत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता आहे. नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर वाळलेल्या पिकांचे क्षेत्र आणि नुकसानीची तीव्रता स्पष्ट होणार आहे.
- बुटीबोरीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग, जाम वेळीच लक्षात आल्यान जीवित हानी नाही, मात्र बस जळून खाक, बसमध्ये असलेले 35 प्रवासी सुखरूप
- चंद्रपूर-बुटीबोरी मार्गावरील बोरखेडी रेल्वे परिसरातील घटना, घटनेनंतर वाहतुकीचा झाला होता खोळंबा..
राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते दिवसभर मालेगाव,वाशिम, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील गावांना भेट देऊन पिक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
यात दुपारी २ वाजता झोडगा, ता. मालेगाव, दुपारी २.३० वाजता सुपखेला, ता. वाशिम , दुपारी ३ वाजता वरुड बुद्रुक, ता. मंगरूळपीर
त्यानंतर सायंकाळी ३.४५ वाजता कुपटा, ता. मानोरा आणि सायंकाळी ४.३० वाजता खेरडा, ता. कारंजा (लाड) येथे पिक परिस्थितीची पाहणी करून सायंकाळी ५ वाजता कारंजा (लाड) येथून अकोला
देशभरातील विविध आगीच्या दुर्घटना तसेच अलिकडेच दिल्ली, मुंबई, अमरावती याठिकाणी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टिने रुग्णालये, पीजी, क्लासेस यांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांना देताच अग्निसुरक्षाविषयक पाहणी सुरु केली आहे. या आदेशानुसार अग्निशमन प्रमुखांनी पीजी होस्टेल अग्निसुरक्षाविषयक यंञणेची पाहणी करण्यास सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीनिमित्त यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. तर, ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, ज्येष्ठ नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सातासमुद्रापार टेक्सासच्या भूमीत ढोल-ताशांचा गजर, टाळमृदंगाची साथ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या ‘मानाचा पहिला- श्री कसबा गणपती’ची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा पार पडला असून, अमेरिकेत दहा दिवसांसाठी कसबा गणपतीची प्रतिकृती विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आश्वासित केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात अॅड. शेलार बोलत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.