Cyclone Akwan Effect in Maharashtra  
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सावट? चक्राकार वाऱ्यांमुळे राज्याचं तापमान अचानक बदललं; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

Cyclone Akwan Effect in Maharashtra : अक्वान चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. चक्राकार वाऱ्यांमुळे उत्तरेकडील थंड वारे अडकल्याने राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Maharashtra Weather Update : दिवाळीनंतर राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी सुरू झाली होती. पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण 'अक्वान' चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडखळले आहे. त्यामुळे राज्यातील गारठा काहीसा कमी झाला असून कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हजेरी लावल्याने आणि राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात थंडी वाढल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात गारठा कायम असताना उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अंशतः ढगाळ हवामान झाले. आज राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 'अक्वान' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

'अक्वान' चक्रीवादळाचे अवशेष असलेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि परिसरावर सक्रिय होते. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात परिसरात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तरेकडील थंड वारे पुन्हा अडखळल्याने, तसेच अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे.

काल जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ८ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात प्रत्येकी १०.४ अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, सातारा येथे १३ अंशांपेक्षा कमी, पुणे येथे १४ अंशांपेक्षा कमी आणि जेऊर, महाबळेश्वर, वाशीम येथे १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली

किमान तापमानासह कमाल तापमानात देखील वाढ होत असून,काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी आणि सांताक्रूझ येथे प्रत्येकी ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वरच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : खासदार रामराव वडकुते यांचे पार्थिव दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! मुंबई, पुण्यासह राज्यभरात आज रिक्षा बंद; नेमकं घडलंय तरी काय?

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ८ जणांनी गमावला जीव; पंतप्रधान मोदींकडून तातडीने मोठी घोषणा

Monday Horoscope : आर्थिक संकटातून बाहेर पडणार ५ राशी! नोकरी-व्यवसायातही मिळणार यश; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Beed Accident: रेसच्या नादात भाजप नगरसेवकाच्या मुलाने घेतला दाम्पत्याचा जीव; अपघाताचा थरारक CCTV Video आला समोर

SCROLL FOR NEXT