लातूरच्या औसा निलंगा यासह इतर भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे, वादळीवारा आणि गारपिटीने शेती पिकासह अंबा फळबागेला मोठा फटका बसला आहे, तर काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, दरम्यान सायंकाळ पासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं.
रायगडच्या लोणेरेमध्ये सोमवारी पल्लवी मोरे या तरुणीची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर चोवीस तास उलटले तरी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याच बरोबर पोलिसांकडून पाळण्यात येणाऱ्या कमालीच्या गोपनीयतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले. या बाबत गोरेगावमधील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मिय नागरिकांनी संताप व्यक्त केला.
सावंतवाडी मळगाव घाटात एका कारचा भीषण अपघातात झाला आहे. मळगाव घाटातील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार संरक्षक रेलिंग तोडून थेट 20 फुट खोल दरीत कोसळली. कार एका झाडावर आदळल्याने त्यावरील मधमाशांचे मोहोळ उठले. मधमाशांनी अपघातग्रस्तांवर हल्ला केला. या अपघातात सावंतवाडीतील शिरसाट कुटुंबातील ७जण जखमी झाले आहेत.
६.३५ वाजता वाजता लागली असून
सायं. ७.२० वाजता आग विझविण्यात आली
असून अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुळ सुरक्षित असल्याचे घोषित केले.
धाराशिव जिल्ह्यात पाऊस मागील चार दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू
धुळे शहरात वाढत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी आणि नागरिकांच्या संतप्त तक्रारींनी अखेर प्रशासनाचे डोळे उघडले असून, पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वच्छता विभागावर अत्यंत कठोर कारवाई केली आहे, शहरात अचानक केलेल्या पाहणी दरम्यान घंटागाडीची कंत्राटी यंत्रणा असूनही रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा आणि कर्मचाऱ्यांचा कमालीचा निष्काळजीपणा पाहून आयुक्तांनी संताप व्यक्त करीत, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 2 मुख्य स्वच्छता निरीक्षक, 7 स्वच्छता निरीक्षक आणि 7 मुकादम अशा एकूण 16 कर्मचाऱ्यांना त्यांनी जागेवरच निलंबित केले आहे,
मुंबई गोवा महामार्गावरील कळंबनी येथे असणाऱ्या कळंबनी उपजिल्हा रुग्णालयासमोरील एका हॉटेल व घरामध्ये भरधाव वेगातील फॉर्च्यूनर कार शिरली यामध्ये कार सह दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला असणाऱ्या दुकानात ही कार शिरल्याने ही मोठी दुर्घटना घडली असून खेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणालाही इजा व दुखापत झालेली नाही या अपघाताचा अधिक तपास सध्या खेळ पोलीस करत आहेत
आप्पा बळवंत चौकात पीएमपीएल बसचा अपघात
दुकानांमध्ये शिरली.. मोठी जीवित हानी टळली
पी एम पी एम एल ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याची माहिती
दुकानात असणाऱ्या नागरिकांनी आणि दुकानदाराने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला
- शहरातील अनेक भागात गारांचा पाऊस.
- सोलापुरातील होडगी रोड, लष्कर, सात रस्ता, परिसरात गारांसह पावसाची तुफान बॅटिंग
- दिवसभरातील ढगाळ वातावरणानंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात
सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसे करणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
२३ एप्रिल रोजी पार पडणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापार्श्वभूमीवर आज बारामती येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार.
शारदाबाई पवार यांनी संस्कार आणि नीतिमूल्यांचा भक्कम पाया घातला. त्यांचा वाटा केवळ कुटुंबापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या जडणघडणीतही महत्त्वाचा आहे.
पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून विकासाचा पाया रचला गेला आणि खऱ्या अर्थाने अजित पवार यांनी अपार कष्टाने त्यावर कळस चढवला.
पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, आशाबाईंचाही आशीर्वाद आहे.
एवढी गर्दी पाहून माझ्या अंतःकरणात भावनांचा कल्लोळ माजला आहे.
दादांशिवाय सभा होत आहे, हे मन मानत नाही. साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत दादांनीही बारामती उभी केली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना 42 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक
कंत्राटदार दशरथ सुरवते यांच्याकडून लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोची कारवाई
अतिक्रमण विभागाचे बिल काढण्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार
15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान ऐरोली विभागात केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी
तक्रारीनंतर सापळा रचून ACB कडून कारवाई
सोलापूर मनपा, खाजगी हॉस्पिटलमधील 85 अल्पवयीन मातांचा प्रकरण समोर, सोलापूर शहर पोलीस ॲक्शन मोडवर
शहर आणि ग्रामीण भागातील बालविवाहाचे भीषण वास्तव स्वयंसेवी संस्थांनी आणलं उजेडात
सोलापुरात गेल्या दोन वर्षात 85 प्रकरणात पीडित मुली अल्पवयीन असताना विवाह करून सदर मुली गरोदर झाल्यानंतर उपचारासाठी सोलापूर झाल्या होत्या दाखल
कल्याण शहरात गांजा तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून परकरमध्ये गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये गांजा लपवून वाहतूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महात्मा फुले पोलिसांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळावर दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला करणार अभिवादन
कल्याण ते सीएसटी दरम्यान धावणारी जलद लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ थांबवण्यात आली. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी थांबवावी लागली. परिणामी, रेल्वे प्रवासी ट्रॅकवरून चालत स्थानक गाठत आहेत.
लातूरच्या ग्रामीण भागात दिवसेंदिव तापमानात वाढ होत चालली आहे, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी या भागात 42 अंश सेल्सिअस वर तापमानाचा पारा चढला आहे.
उष्माघाताचा पहिला बळी हा औराद शहाजनी येथे गेला आहे.
लक्ष्मण दादाराव भंडारे या 60 वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करताना उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झालाय.
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली असून डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
राज्यव्यापी आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील १२ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग...
जुनी पेन्शन योजना लागू करा, शासकीय विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी भरती बंद करा, यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
जिल्हाधिकारी यांच्याकडून आंदोलनाला परवानगी न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारातच कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू
मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करून देखील शासनाने तोंडाला पाने पुसली त्यामुळे आक्रमक पवित्र घेतल्याची कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
बारामतीतील शारदा प्राणांगण येथे पार पडणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगता सभेला उपस्थितीत राहणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवत आहेत.
सुनील तटकरे प्रफुल पटेल छगन भुजबळ यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेतेही सांगता सभेला उपस्थित राहणार
३ वाजता सभेला सुरुवात होईल
ऑपरेशन टायगरच्या मुद्द्यावरून मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं वक्तव्य केलं. शिवसेनेत भविष्या असल्याने प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. साताऱ्यातील आमदार महेश शिंदे प्रकरणानंतर मंत्री प्रकाश आबिटकर यांचे वक्तव्य केले आहे.
भुसावळ विभागातील पारस-गायगाव-अकोला दरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी 'नॉन-इंटरलॉकिंग' विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज सांगता सभा पार पडणार आहे. दुपारी दोन नंतर बारामती मधील शारदा प्रांगण मध्ये ही सभा पार पडणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे.
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. ‘राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र’च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे यांसह विविध मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग या आंदोलनात दिसून आला.
- अशोक खरातचे कनेक्शन ठाण्यातही उघडकीस..
- ठाण्यातील एक माजी अधिकारी होता अशोक खरातच्या संपर्कात
- महेश अहेर नावाचा वादग्रस्त अधिकारी होता अशोक खरातच्या संपर्कात
- महेश अहेर ने ठाणे मनपातील एका लिपिक महिलेला नेले होते अशोक खरातकडे
- महेश अहेर याने त्या महिलेला अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयात नेले होते
पालघर जिल्ह्यातील तालुक्यातील वाडा तालुक्यातील कोणसई गावातील फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फ़ोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला.
या फटक्याच्या कंपनीत उत्पादन सुरू असताना दारूचा ब्लास्ट झाल्याची माहिती .
दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू तर तीन ते चार कामगार गंभीर जखमी .
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता .
फटाक्यांसाठी लागणाऱ्या दारूचा बेकायदेशीर कारखाना असल्याची स्थानिकांची माहिती .
साताऱ्यात सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला आहे, सरकारी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली.
वारंवार आंदोलणे करूनही शासनाने आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी केली आहे .
या संपाबाबत मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने कामकाजवार परिणाम होण्याची शक्यता आहे
मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोडगा काढतील अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे..
आज पहाटेच्या सुमारास रेवदंडा परिसरात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.
पहाटेच्या वेळी या पावसा दरम्यान बागमळा येथे ताडाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळून खाक झाले आहे.
सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्र. 1,2 व 3 वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. सदर कामानिमित्त गुरूवार दि. 23/04/2026 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून शुक्रवार दिनांक 24/04/2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
21 एप्रिल पासून राज्य सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले असून नंदुरबार जिल्ह्यातही संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य शिक्षण आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला असून हजारो कर्मचारी जिल्ह्यातून संपावर असल्याने शालेय कामकाज आरोग्य विभागातील कामकाज आणि महसुली विभागाचे कामकाज धब्बे झाले आहे आज जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केले असून सरकारने आपल्या प्रलंबित मागण्या लवकर मंजूर कराव्यात असे मागणी केली आहे एकूणच 2024 मध्ये सुधारित निवृत्ती वेतन अधिनियम जाहीर करावा रिक्त जागा त्वरित भराव्यास विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर असून याचा परिणाम थेट शासकीय कामकाजावर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. कणकवली शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे पाऊस सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांचे विक्रीसाठी आणलेले साहित्य भिजून गेले होते. दरम्यान जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात सकाळपासून काळोख दाटून आला होता तर काही भागात गडगडाट सुरू होता. सद्या पाऊस थांबला असलातरी आज सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी काळजी घेण्याच आवाहन करण्यात आलं आहे.
थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील कमला भवानी ग्लोबल काॅर्पोरेशन कारखान्याच्या विरोधात स्वाभीमनी शेतकरी संघटनेच्या वतीने चटणी भाकरी खाऊन आंदोलन केले.
गाळप हंगाम बंद होऊन दोन महिने झाले तरी अद्याप शेतकय्रांना ऊसाचे बिल मिळाले नाही. थकीत रक्कम मिळावी यासाठी कारखान्याचे अध्यक्ष विक्रम बबनराव शिंदे यांच्या माढा तालुक्यातील निमगाव येथील घरासमोर चटणी भाकरी खाऊन आंदोलन केले.
सकाळच्या सुमारास बदलापूरला अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला. महत्त्वाचं म्हणजे काही भागात गारांचा पाऊसही झाला. बदलापुरातील शिरगाव-पनवेल हायवेलगत गारांचा पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात अल्हाददायक गारवा जाणवतोय. मात्र दुपारनंतर पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
शिक्षण क्षेत्राला लातूर पॅटर्नची ओळख करून देणारं व्यक्तिमत्व, माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या
94 व्या वर्षी त्यांनी लातूरच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे फक्त लातूरच नाही तर संपूर्ण राज्याची राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू झालं आहे.
जुनी पेन्शन सुरू करा, ठेकेदार पद्धत बंद करा यासह अन्य मागण्यासाठी सुरू केले आंदोलन
कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आंदोलन
- नाशिकमधील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
- नाशिक महापालिकेवर आज पर्यावरण प्रेमींचा मोर्चा
- तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचा मोर्चा
- गोदावरी नदीतील काँक्रिटीकरणाला देखील विरोध
- पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठींबा
भरधाव कारनं दुचाकीला जबर धडक दिलीये. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना भंडारा - पवनी राष्ट्रीय महामार्गावरील कोंढा या भागात घडली. प्रफुल आखरे (३०) आणि मोरेश्वर सावरबांधे (३५) असं मृत तरुणांची नावे आहेत.
भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरामध्ये असलेल्या मूलचंद कंपाऊंड येथे असलेल्या आॅईल च्या गोदामाला भीषण आग
या गोदामात मोठ्या प्रमाणात आॅईलचे ड्रम
साठवून ठेवले असल्याची असल्याची माहिती
आगीचं कारण अस्पष्ट
आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक
अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल
आगीमुळे धुराचे लोटच्या लोट आकाशात
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. बारामतीत आयोजित केलेल्या सभेला सुप्रिया सुळे जाणार आहेत.
सांगलीच्या वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्या विरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखान्याचे चेअरमन व क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडींची सुपुत्र वैभव नायकवाडी यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे
पुणे -
राज्यात खत बी बियाणे साठेबाजी होऊ नये यासाठी पंधरा हजार कृषी विक्री केंद्राची तपासणी
खते बी बियाणे विक्री केंद्राच्या तपासणीसाठी 34 भरारी पथकाची कृषी विभागाकडून नियुक्ती
खते बी बियाणे आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून राज्यात 34 भरारी घटकाची नियुक्ती करण्यात आली आहे
आत्तापर्यंत पाच हजार दुकानाची तपासणी पूर्ण झाली आहे आणि दोषी आढळलेल्या 104 विक्रेत्याची परवाने रद्द केले आहेत
पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर अकराशे दुकानदारांना कारणे दाखवा नोटीसी देण्यात आले आहेत
750 दुकानदारांवर परवाने निलंबनासह आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे माहिती देण्यात आली आहे
पुणे -
महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद आयुक्त नगरसेवक आमने-सामने
महापालिकेच्या विकास कामासाठी असलेल्या वित्तीय समिती वरून आयुक्त नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा वाद झालाय
सभागृह अस्तित्वात आहे स्थायी समिती आहे तर वित्तीय समिती कशाला हवी नगरसेवकांचा समितीवर आक्षेप
वित्तीय समितीमुळे बजेट मंजूर असून सुद्धा विकास काम होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय
तर वित्तीय समिती नगरसेवकावर अंकुश ठेवण्यासाठी नाही तर अधिकाऱ्यावर अंकुश ठेवून बजेटमध्ये काम करण्यासाठी आहे आयुक्त यांनी स्पष्टीकरण दिल आहे
प्राधान्यक्रम ठरवणे माझा अधिकार वित्तीय समिती बदलले तर दुसऱ्या नावाने समिती कार्य करेल आयुक्तांचा ठाम पवित्रा
मुंबई -
रात्री खर्डी स्टेशनजवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला
तो ब्लॉक ३ वाजता संपून रेल्वे सुरू होणार होता
मात्र हा ब्लॉक ६ वाजेपर्यंत सुरू होता
ब्लॉक सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस बंद राहिल्या
परिणामी आज देखील मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड उशिराने धावत आहे
कामावर जाणाऱ्या नागरिक आज देखील उशिराने
मुंबई -
ट्रॉमा केअर रुग्णालयात कंत्राटी कामगारांचा बेमुदत संप
जोगेश्वरी पूर्वेतील ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण
130 हून अधिक कंत्राटी कामगारांचा पाचव्या दिवशीही संप सुरू
3 महिन्यांचा पगार थकीत, 27 महिन्यांचा PF प्रलंबित
महिला कामगारांचा मोठा सहभाग, रुग्णालयातच ठिय्या
प्रशासनाचे 15 दिवसांत तोडग्याचे आश्वासन हवेतच
कंत्राटदारांची बिले मंजूर, पण कामगारांचा पगार रखडला
मनसे व भारतीय कामगार सेनेचा संपाला पाठिंबा
संपामुळे रुग्णसेवा आणि स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता
नाशिक -
- भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ
- नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
- जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर होती 32 बनावट खाती
- बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक
- अशोक खरातसह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल
रत्नागिरी- राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयांना कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ
ठाणे पुणे रत्नागिरी नागपूर मनोरुग्णालयातील कर्मचारी संपावर
रत्नागिरी मनोरुग्णालयातील पन्नासून अधिक कर्मचारी संपात सहभागी
कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा, वारसा हक्काने मुलांना नोकरीत सामावून घ्या, रिक्त पदे तादरीने भरा, कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी करा अशा प्रकारच्या विविध मागण्यासाठी पुकारलाय संप
मनोरुग्णालयातील किचन विभाग, मनोरुग्णालयातील स्त्री आणि पुरुष वार्ड वर परिणाम
बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची सांगता सभा
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे
23 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होत असून या निवडणुकीची सांगता सभा बारामती येथील शारदा प्रांगण येथे होत आहे
या ठिकाणी सभेची पूर्ण तयारी झाली आहे
नाशिक –
- अंबडच्या नवनाथ नगर परिसरात हत्येचा थरार
- दारू पिताना मित्रांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात
- दोन मित्रांनी कोयत्याने सपासप वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत विशाल हिवराळेचा मृत्यू
- संशयित आरोपींना लगेचच अटक, MIDC पोलिसांची तात्काळ कारवाई
- पोलिसांकडून पुढील कारवाईला सुरुवात
अमरावती -
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींच लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच प्रकरण
मुख्य आरोपी अयान अहमद, हुजेर खान सह काही आरोपींची आज सात दिवसांची पोलीस कोठडी संपणार....
आरोपी अयान अहमदला पोलीस आज दुपारी अचलपूरच्या न्यायालयात हजर करनार...
आरोपींच्या सखोल चौकशीसाठी पोलीस न्यायालयाला आणखी पोलीस कोठडी वाढवून मागणार...
तर दुसरीकडे आठ दिवसात एकच पिडीत समोर आल्याने पोलिसांसमोर अनेक आव्हाने....
न्यायालयात आरोपींचे ही वकील बाजू मांडणार...
नाशिक -
- तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी
- नाशिकच्या जेलरोड परिसरातील पारा अव्हेन्यू सोसायटीतील घटना
- रोप तुटल्याने लिफ्ट कोसळून आदळली
- ३ महिन्यांच्या बाळंतिणीसह चार जण जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू
- महिलेच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाल्यानं करण्यात आली शस्त्रक्रिया
- दोन महिन्यांपासून लिफ्टमध्ये बिघाड असून रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
- बिल्डरसह लिफ्ट कंपनीवर राहिवाश्यांकडून निष्काळजीपणाचे आरोप
नाशिक -
- नाशिकमधील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
- नाशिक महापालिकेवर आज पर्यावरण प्रेमींचा मोर्चा
- तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचा मोर्चा, सकाळी 11 वाजता निघणार मोर्चा
- पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठींबा, मनसेच्या पाठिंबामुळे मोर्चाला राजकीय रंग
यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यात वादळ वाऱ्यामुळे तीळ पिकाचे नुकसान
जिल्ह्यात रात्री दरम्यान अचानक वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने लावली हजेरी
वादळ वाऱ्यामुळे शेतातील तीळ अक्षरश: शेतात पडलाय आडवं, ती उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान अचानक वादळ वाऱ्यांचा विजांचा कडकडाट अवकाळी पावसाने लावली हजेरी, दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी..
कल्याण -
अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हालपण मारणार,
केडीएमसी आयुक्त महापौर, सभापती काहीतरी करा.
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकांची महासभेत विनवणी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.