Aaditya Thackeray On BJP saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : हा निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग हे समजत नाही; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Lok Sabha Election : जय भवानी हा शब्द काढणार नाही. हे निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग आहे हेच समजत नाहीये, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधला आहे.

Ruchika Jadhav

दिलीप कांबळे, मावळ

जय भवानी हा शब्द काढणार नाही. हे निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग आहे हेच समजत नाहीये, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे आज प्रथमच मुळशीमध्ये आले आहे. येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते प्रचारासाठी कामाला लागलेत. प्रचारासाठी दोन दिवांपूर्वी ठाकरे गटाचं प्रचार गीत प्रदर्शित झालं. त्यामधील जय भवानी हा शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून आदित्य ठाकरेंनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. हे निवडणूक आयोग आहे की भाजपा आयोग आहे हेच समजत नाहीये. देवेंद्र फडणवीस यांना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी द्वेष आहे, असा आरोप देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी केलाय.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन बोलावं, मात्र ते येण्यास तयार नाहीत. तसेच राणे हे नेहमीच आमच्यावर बोलत असतात कारण त्यांना पगार मिळतो, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी राणेंवर देखील हल्लाबोल केलाय.

निवडणूक आयोगाच्या या नोटीसवर उद्धव ठाकरेंनी देखील हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही देखील रामभक्त आहोत हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचं दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारचं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे," असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

MP News : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलीचं निधन, कुटुंबासह पक्षावर शोककळा

SCROLL FOR NEXT