Santosh Kadam  Saam TV
महाराष्ट्र

Nanded : सैन्यात निवड झालेल्या तरुणाचा गोदापात्रात बुडून मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अपूर्ण

सैन्यदलात (Indian Army) निवड झालेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे

संतोष जोशी

नांदेड: सैन्यदलात (Indian Army) निवड झालेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरूणाचा मित्रांसोबत गोदापात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी (२३ मे) दुपारी सव्वादोन वाजेदरम्यान विष्णूपुरी (Vishnupuri) परिसरातील काळेश्वर मंदिराच्यामागील गोदावरी नदी (Godavari River) पात्रात घडली. देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झालेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nanded Latest Marathi News)

संतोष पंडीतराव कदम (वय २१ ) राहणार वाळकी खुर्द तालुका लोहा असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष याची काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्यात निवड झाली होती. २३ मे रोजी विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी होणार होती. त्यामुळे संतोष हा आपल्या मित्रांसोबत विष्णूपुरी येथे आला होता. वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास तो मित्रांसोबत विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वरांच्या मंदिरात दर्शनासाठी गेला.

यावेळी गोदापात्रातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. संतोष आणि त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पोहत असताना संतोषला पाण्याचा अंदाज आला नाही त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, संतोष याचा मृतदेह गोदापात्राच्या बाहेर काढण्यात आला असून देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झालेल्या संतोष कदम याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : माहिती सादर न करणाऱ्या मुख्याध्यापकांना दणका; निवडणुकीसाठी शिक्षकांची मागविली होती माहिती, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

VIDEO : सरदेसाईंच्या पुस्तकातील दाव्याबद्दल भुजबळांनी केलं खरं खोटं, थेट कारवाईचा ईशारा | Marathi News

Maharashtra News Live Updates:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धुळ्यातील दसरा मैदान येथे सभास्थळी आगमन

House Plants : 'या' झाडांमुळे होऊ शकते त्वचेची ऍलर्जी; खिडकीत असतील तर आजच काढा घराबाहेर

Vadgaon Sheri Politics: पवार विरुद्ध पवार! पुण्यातील वडगाव शेरी मध्ये कोण ठरणार शक्तिशाली?

SCROLL FOR NEXT