आरोपी महेश तरारे आणि पोलीस अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

धक्कादायक! दारुच्या उधारीचे पैसे मागायला गेला अन् जिव गमावून बसला

दारुचे उधारीचे पैसे मागायला गेलाा आणि जीव गमवुन बसला. केवळ 1200 रूपयाची उधारी बाकी होती ती मागायला गेला आणि जिव गमावून बसला.

अभिजीत घोरमारे

भंडारा: दारुचे उधारीचे पैसे मागायला गेलाा आणि जीव गमवुन बसला. केवळ 1200 रूपयाची उधारी बाकी होती ती मागायला गेला आणि जिव गमावून बसला. उधारीचे पैसे मागायला गेल्याने एका युवकाला चांगलेच महागत पड़ले आहे. पैसे मागायला आला म्हणून रागाच्या भरात पैसे मागणाऱ्या छातीत चाकू खुपसुन त्याच्या खून करण्याची घटना भंडारा शहरात चांदणी चौक येथे इंदिरा गांधी वार्डत घडली आहे. विक्की भुरे वय 22 वर्षे असे मृतकाचे नाव असून महेश तरारे वय 32 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मृतक विक्की आपले दारुच्या उधारीचे पैसे मागण्यासाठी आरोपी महेश कड़े गेला होता. दरम्यान उधारिच्या पैशावरुण त्यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की,आरोपी महेशने आपल्या जवळील चाकू काढून विक्कीच्या छातीत खुपसला. यावेळी चाकूचा वार गंभीर लागल्याने विक्की रक्त्याच्या थारोल्यात पडला. परिसरातील नागरिकांनी विक्कीला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान त्याच्या मृत्यु झाला. ह्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पसार आरोपी महेषच्या शोधात लागली. अवघ्या काही तासात आरोपीला अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जीवापेक्षा पैशा मोठा झाल्याचे चित्र उभे झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fitness After 40 : चाळीशी ओलांडली? मग फिटनेस तपासण्यासाठी फक्त ४ व्यायाम ठरतील बेस्ट

Pitru Paksha: पूर्वजांचे श्राद्ध न केल्यास कोणत्या अडचणी का निर्माण होतात?

Shocking News: बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले, संतापलेल्या पोलिसाने ऑन कॅमेरा धू धू धुतला

Manoj jarange patil protest live updates: राहुरी येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन...

Accident News : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोनजण जखमी

SCROLL FOR NEXT