Thane Crime News
Thane Crime News Saam TV
महाराष्ट्र

Thane News: स्थानिक गुंडाच्या धमकीने तरुण घाबरला, उचललं टोकाचं पाऊल; ठाण्यातील धक्कादायक घटना

विकास काटे, ठाणे

Thane News : ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकमान्य नगर पाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने स्थानिक गुंडांनी केलेल्या मारहाणी आणि धमकीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. (Latest Marathi News)

मनीष शर्मा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या पश्चात त्याची पत्नी व तीन मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषचे ठाणे (Thane) शहरातील लोकमान्य नगर येथे राजा शिवाजी शाळेच्या जवळ एक दुकान होते. या दुकानात त्याच परिसरात राहणाऱ्या काही गुंडांनी तोडफोड करून मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी मनीषकडे पैशांची मागणी देखील केली. या भीतीतूनच मनीषचे आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

याआधी सुद्धा परिसरातील स्थानिक गुंडांनी अनेक व्यापाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी व्यापारी आणि मयताच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी वर्तक नगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT