A young farmer died due to electric shock in Savargaon area of Akola district Saam TV
महाराष्ट्र

Akola News: पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला, घरी परतलाच नाही; २८ वर्षीय तरुणाला मृत्युने कवटाळलं

Satish Daud

Akola Farmer News

शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अकोला जिल्ह्यातील सावरगाव परिसरात गुरुवारी (२८ डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. वैजनाथ वासुदेव डोलारे, असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वैजनाथ डोलारे हा बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या नायगाव येथील रहिवासी आहे. त्याने अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातल्या सावरगाव येथील शेतशिवारात बटाईने शेती केली होती. या भागात वन्यप्राणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

त्यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांनी (Farmers) पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास मृत वैजनाथ आपल्या शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेला असता, त्याला विद्युत प्रवाहाचा जबर शॉक लागला.

यामध्ये वैजनाथ याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी वैजनाथला बांधवावर पडलेले बघितले आरडाओरड झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. वैजनाथ अत्यंत होतकरू शेतकरी होता. त्याच्या अचानक निघून जाण्याने डोलारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT