Samruddhi Mahamarg Accident Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! भीषण अपघातात युवकाचा मृत्यू, 3 जण गंभीर

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, साम टिव्ही

Amaravati News: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून या मार्गावर गंभीर अपघात घडत आहेत. आज( २२, जानेवारी) पुन्हा एकदा समृद्धीवर भीषण अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. (Samruddhi Mahamarg)

मिळालेल्या माहितीनुसार, वेगवान महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख आहे मात्र समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून यावर अपघातांची मालिका सुरू आहे आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील हद्दीत वेरना कारचा अपघात झाला आहे.या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात गाडी डीवाईडरला धडकल्याने झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Car Accident)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. महामार्गावर भरधाव वेगाने वाहने जात असल्याने अपघात घडत असल्याच्या चर्चा होत आहेत. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे, ज्यामुळे वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By- Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT