Neral Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Neral Crime News : शिकारीला जंगलात नेलं, डोक्यात गोळी घालून तरुणाला जमिनीत पुरलं; बायकोच्या बॉयफ्रेंडचं भयंकर कृत्य

Neral Crime News : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या तरूणाची त्याच्या बायकोच्या प्रियकरानेच हत्या केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Neral Crime News Update : कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवपाडा गावात भयंकर घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या तरूणाची त्याच्या बायकोच्या प्रियकरानेच हत्या केली.

शिकारीसाठी जंगलात नेऊन तिथे डोक्यात गोळी घातली आणि हत्येनंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. ही घटना उघड झाल्यानंतर नेरळ परिसरात खळबळ उडाली आहे.

नेरळ पोलिसांनी शनिवारी तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश तुपे (वय २४) आणि अरुणा मुरबे (वय ३६) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. सचिन मुरबे (वय ३८) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

सचिन मुरबे हा कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील रहिवासी होता. रिक्षा चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. १५ जुलै रोजी सचिन मुरबे हा बेपत्ता झाला होता. त्याबाबत त्याची पत्नी अरुणा हिनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सचिन आणि ऋषिकेश हे दूरचे नातेवाइक आणि मित्रही होते.

पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी सचिन आणि संशयित आरोपी ऋषिकेश हे दोघे आरी जंगलात शिकारीसाठी गेल्याची माहिती कॉन्स्टेबल प्रवीण लोखंडे यांना मिळाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, शिकारीसाठी सोबत नेलेल्या बंदुकीची गोळी झाडून सचिनची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलातच खड्डा खोदून पुरला. त्यानंतर त्याचे दोन्ही फोन जंगलातील ओढ्यात फेकून दिले. कुदळ आणि फावडा वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते, असेही आरोपीने सांगितले.

ज्या ठिकाणी सचिनला पुरले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला नेले. सचिनचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का

'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT