Tiger Video Wardha News चेतन व्यास
महाराष्ट्र

Video: गडद अंधारात भर रस्त्यात बसला होता वाघ; वाघाची डरकाळी ऐकून कारमधल्या सगळ्यांचीच उडाली भंबेरी

Tiger Viral Video: कारच्या हेडलाईटच्या उजेडात वाघ अगदी स्पष्टपणे दिसत होता. वाघाने कारला पाहताच जोरदार डरकाळी फोडली, ज्यामुळे कारमध्ये बसलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

वृत्तसंस्था

चेतन व्यास, वर्धा

Wardha Tiger Video: घनदाट जंगल, रात्रीची वेळ आणि गडद अंधार, सामसूम रस्ता, रातकिड्यांचा किर्रर्र आवाज आणि अशा भयानक वातावरणातला प्रवास... अंगावर काटा येईल असं हे चित्रं. पण थांबा अशात जर कारसमोर चक्क वाघ आला तर त्या कारमधील लोकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करुनच अंगावर काटा येतो. अशीच घटना घडली आहे वर्धा जिल्ह्यात. (Tiger Video News)

वर्धा जिल्ह्याच्या बोर अभयारण्यातून काही प्रवासी आपल्या कारमधून जात होते. रात्रीची वेळ आणि जंगल परिसर असल्याने सगळीकडे संपूर्ण गडद अंधार होता. कारच्या हेडलाईट्सच्या उजेडात गाडी पुढे जात होती. अचानक चालकाने ब्रेक लावला आणि गाडी थांबवली. गाडीच्या समोर पाहतोय तर काय, चक्क एक वाघ (Tiger) ऐटीत ठाण मांडून बसला होता.

पाहा थरारक व्हिडिओ -

कारच्या हेडलाईटच्या उजेडात वाघ अगदी स्पष्टपणे दिसत होता. वाघाने कारला पाहताच जोरदार डरकाळी फोडली, ज्यामुळे कारमध्ये बसलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली. वर्धा जिल्ह्याच्या बोर अभयारण्य भागातील सेलू-गरमसुर-मासोद परिसरातील रस्त्याचा असल्याची चर्चा आहे. (Tiger Video Wardha News)

वाघाला पाहताच कारमधील सगळेजण अवाक झाले. त्यातल्या एकाने धाडस करत कारमधूनच आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात या वाघाचा व्हिडिओ (Viral Video) शूट केला. यावेळी अंगावर काटा आणणाऱ्या वाघाच्या डरकाळीचा आवाजही यात रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडिओची मात्र वनविभागाने अद्यापतरी पुष्टी केली नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT