Ladki Bahin Yojana google
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: ६० किलो रांगोळीचा वापर करुन ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची अनोखी कलाकृती

Ladki Bahin Yojana MahaRangoli: महायुतीच्या विजयात "गेमचेंजर' ठरणाऱ्या लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात महत्त्वाची घोषणा केली आहे.

Dhanshri Shintre

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबरमधील 'लाडकी बहीण योजने'च्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिली.

महायुतीनं निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील मदत १५०० रुपयांवरून २११०० रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप हा हप्ता देण्यात आलेला नाही. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरसाठीचा हप्ता हिवाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारली आहेत. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर महारांगोळी याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात साकारली आहे.

१२ सेमी उंचीच्या डायसवर २८८ फूट आकाराची (१२ बाय २४ फूट) ही सुबक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथे लाडक्या बहिणींची प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकृती रेखाटल्या असून रांगोळी कलावंत सुनील तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील पाच कलाकारांनी ६० किलो रांगोळीचा यासाठी उपयोग केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT