"डंके की चोट पर दहावा" म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी केलं अनोखं चड्डी आंदोलन... Saam Tv
महाराष्ट्र

"डंके की चोट पर दहावा" म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी केलं अनोखं चड्डी आंदोलन...

"डंके की चोट पर दहावा" म्हणत, बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं

विनोद जिरे

बीड : "डंके की चोट पर दहावा" म्हणत, बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. आतापर्यंत शर्ट, बनेल काढून आंदोलन केले होते. मात्र, आज अंगावरील शर्ट, पॅन्ट, बनेल काढत शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी चड्डी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेल्या 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यात संप सुरू असून याची दखल सरकार अन शासन घेत नाही.

हे देखील पहा-

याअगोदर देखील आम्ही आंदोलन केले आहे, अगोदर शर्ट काढले, नंतर बनेल काढली, आता पँट काढली आहे. त्यामुळे आता जर यानंतर दखल घेत नसेल, तर अंतरवस्त्र काढून आंदोलन करू. असा संतप्त इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आणि जर हे करूनही काही झाले नाही, तर सरकारने माजी आमदार- खासदारांचे पगार थांबवून त्यांचे एसटी महामंडळात दाखल करून घ्यावे. अन त्यांना आम्हाला जेवढा पगार दिला जातो तेवढाच द्यावा. अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT